Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ५

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ५

" श्रेया, आता तुझं लग्न झालं आहे. आत्ता हेच तुझे घर आहे आणि आर्यव्रत तुझा नवरा. " सुरभी वैतागलेल्या स्वरात म्हणाली.

" हो आई, मला माहित आहे सारखं सारखं तेच सांगायची गरज नाही. " श्रेयसा

" तुझं बोलणं ऐकूनच सारखं सांगण्याची गरज वाटत आहे. " सुरभी बोलत असते की तेवढ्यात त्यांना रेवती समोरून येताना दिसते तश्या त्या दोघी ही शांत होतात.

" तुम्हा माय लेकीला  बोलताना डिस्टर्ब तर केले नाही ना मी ? " रेवती त्यांच्या जवळ येऊन विचारते.

" नाही... आमच काय नेहमीच बोलणं होतं. " सुरभी लगेच विषय बदलत त्यांच्याकडे पाहून म्हणाली.

" मी हे विचारायला आले होते की, तुम्ही बाहेर सगळ्यांसोबत जेवण करणार आहात की इकडेच जेवण घेऊन येऊ दे. " रेवती

" नाही. आम्ही फक्त मुलीला भेटायला आलो होतो. जेवण नाही करू शकत. " सुरभी

" जुन्या रीती परंपरा अजून किती दिवस जपून ठेवणार आहात. हे घर जसं आत्ता तुमच्या मुलीच आहे तस ते तुमच ही आहे. तुम्ही दोघी पण इकडेच गप्पा मारत बसा, मी जेवण इकडेच मागवून घेते. " रेवती

" तुम्ही पण इकडेच आमच्या सोबत बसा. " सुरभी आनंदाने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते. आपल्या लेकीला एवढ चांगल सासर आणि इतकी समजूतदार सासू मिळाली याचाच तिला आनंद होतो.

" हो... " रेवती बोलून तिकडून निघून जाते.

" श्रेया बेटा, तुझ्या सासरची माणसं खरच खूप चांगली आहेत ग. आधी तर मलाही थोड टेन्शन येत होतं,  पण जेव्हापासून त्यांना ओळखत आहे त्यांचा स्वभाव खूपच चांगला वाटत आहे. तू पण आता मागच सगळ विसरून नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात कर. " सुरभी आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करते.

श्रीकांत ही बाहेर काही वेळ आर्यराज आणि आर्यव्रत यांच्यासोबत गप्पा मारत बसलेले असतात. आर्यव्रत त्यांच्या बोलण्याची पद्धत, समजूतदारपणा आणि शब्दांमध्ये लपलेली आपुलकी पाहून त्यांनाही छान वाटते. आपल्या मुलीसाठी आपण योग्य मुलगा निवडला आहे याचे समाधान वाटू लागते.

बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नंतर श्रीकांत आणि सुरभी त्यांचा निरोप घेऊन तिकडून निघतात. निघताना आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही जोडीने त्यांच्या पाया पडतात.

पूजा, गाव जेवण या सगळ्या गोंधळामध्ये संध्याकाळ कशी होऊन गेली कोणालाही समजले नाही. आता घरामध्ये काही जवळचीच मंडळी तेवढी शिल्लक होती.  श्रेयसा आणि आरोही एका बाजूला एकमेकींसोबत छान गप्पा मारत बसलेले असतात. रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्रच केलेले असते. जेवण झाल्याबरोबर आर्यव्रत आपल्या रूममध्ये निघून जातो.

" तेsss खूप थकल्यासारखे वाटत आहे. मी पण आत रूम मध्ये जाऊन आराम करू का ? " श्रेयसा रेवती जवळ येऊन तिला हळू आवाजात विचारते.

" हो बाळा. मी तर थोड्या वेळापूर्वीच तुला सांगणार होते परंतु तुम्ही दोघी तुमच्या गप्पांमध्ये रंगल्या होत्या म्हणून काही बोलले नाही. " रेवती लगेच हसून होकार देते. तिचा होकार मिळाल्या बरोबर श्रेयसा तिला काल सांगितलेल्या रूमच्या दिशेने जाऊ लागते.

" श्रेयसा, अग तू तिकडे कुठे चालली आहे ? " रेवती तिच्याकडे पाहून तिला विचारते.

" त्या रूममध्ये. माझे सामान त्याच रूममध्ये आहे ना. " श्रेयसा

" हो sss आज आपल्या घरात पूजा होती म्हणून तुझे सामान एका दिवसासाठी फक्त त्या रूममध्ये ठेवण्यात आले होते,  पण आता तुझे सामान तुझ्या रूममध्ये शिफ्ट केले आहे.  तुला आजपासून वर आर्यव्रत च्या रूम मध्ये राहायचे आहे. " रेवती

" काय? " श्रेयसा पूर्णपणे गोंधळून तिच्याकडे पाहू लागते.

" आपल्यामध्ये लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत नवरीला नवऱ्याच्या रूममध्ये जाऊ देत नाहीत म्हणून तुला एक दिवसासाठी त्या रूममध्ये राहायला सांगितले होते, पण आता तुम्हा दोघांना एकत्र राहायला पाहिजे ना. आरोही , जा बरं तुझ्या वहिनी ला दादाच्या रूममध्ये सोडून ये. " रेवती एक नजर श्रेयसा कडे पाहून आरोही ला सांगते.

" चला वहिनी, मी तुम्हाला दादाची रूम दाखवते. " आरोही लगेच तिचा हात पकडून तिला घेऊन पायऱ्या चढू लागते. श्रेयसा तिच्यासोबत पायऱ्या चढत असते परंतु तिचे हातपाय मात्र थरथर कापू लागतात.

आतापर्यंत तिला फार काही वाटले नव्हते, पण आता त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्यासोबत राहायचे.  हे ऐकूनच तिच्या पोटामध्ये गोळा आला होता. ज्या व्यक्तीला आपण नीट ओळखतही नाही त्या व्यक्तीसोबत त्याच्याच रूममध्ये कसे काय राहू शकतो. तिच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले.

’ आपण असे डायरेक्ट त्याच्या रूममध्ये गेलो तर त्याला काय वाटेल ? तो आपल्याबद्दल काय विचार करेल? आपल्यासोबत नीट बोलेल का ? आपल्याला तिकडे पाहून अपमान तर करणार नाही ना ? ’ तिला त्याच्यासमोर जाण्याची भीती वाटू लागली.

" वहिनी, ही दादाची रूम आहे. तुम्ही जावा आत. मी आता माझ्या रूममध्ये जाते. Good night. " आरोही बोलून तिकडून निघून जाते. 

श्रेयसा बराच वेळ विचार करत बाहेर दरवाजा मध्येच उभी असते. पण अजून अशी किती वेळ ती बाहेरच उभी राहणार होती कधीतरी तिला आत जावे लागणारच होते. स्वतःच्या शरीराची होणारे थरथर थांबवण्याचा प्रयत्न करत हळूच तिने आपला हात पुढे करत दरवाजा ला हलकाच स्पर्श केला, दरवाजा लॉक नसल्यामुळे लगेच पुढे गेला.

" श्रेया, थोडी हिम्मत कर. " स्वतःला बोलत तिने हळूच दरवाजा थोडा अवघडला आणि आत डोकावून पाहिले. रूमच्या आत मध्ये अंधार पसरलेला होता.

’ रूम मध्ये कोणी नाही आहे का ? ’ मनामध्ये विचार करत श्रेयसा हळूच आत आली. रूमच्या आत मध्ये सगळीकडे अंधार पसरलेला असल्यामुळे तिला त्या रूम मध्ये काही व्यवस्थित दिसत नव्हते.

श्रेयसा अजून ही सकाळी नेसलेल्या साडी वरच होती. दिवसभर गावातल्या मंडळींच घरामध्ये येणं जाणं चालू होते त्यामुळे तिलाही साडीवरच दिवसभर रहावे लागले होते , पण आता मात्र तिला थकवा जाणवत होता. कधी एकदा आपल्या बॅगमधून नाईट सूट काढून फ्रेश होऊन कपडे चेंज करते असे तिला वाटत होते. तिकडे पसरलेले अंधारामुळे तिला काही दिसत नव्हते त्यामुळे ती इकडे तिकडे पहात लाईटीची बटन शोधत होती.

आर्यव्रत ने नेहमीप्रमाणे आपला नाईट सूट घालण्यासाठी बेडवर काढून ठेवला होता आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला होता. त्याला रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची सवय होती. आंघोळ करून कमरेला टॉवेल बांधून तो आपल्या धुंदीतच बाथरूम मधून बाहेर आला.

अचानक एकमेकांना धडक झाल्यामुळे श्रेयसा ने खाली पडण्याच्या भीतीने पटकन हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. आर्यव्रत ही पूर्णपणे गोंधळून गेला होता त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्या धक्क्यामुळे खाली पडू नये या काळजीने त्यानेही त्या व्यक्तीच्या कमरेमध्ये हात घालून तिला सावरण्याचा प्रयत्न केला.

रूममध्ये अंधार असल्यामुळे दोघांना एकमेकांचे चेहरे तर दिसत नव्हते परंतु ते एकमेकांचे इतके जवळ होते की त्यांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर येऊन आदळत होते. आर्यव्रत ने कपडे न घातल्यामुळे श्रेयसा चे दोन्ही हात त्याच्या उघड्या छातीवर होते आणि तिच्या त्या नाजूक हातांच्या स्पर्शाने त्याचे हृदय 100 च्या स्पीडने धडधड करत होते.

आर्यव्रत ने आपल्या एका हाताने तिला घट्ट पकडून तुला दुसरा हात हवेत उंचावला आणि रूमची लाईट लावली. जसा रूममध्ये प्रकाश पडला तशी त्या दोघांची नजरा नजर झाली.

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all