डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ६
ते दोघेही एकमेकांच्या नजरे मध्ये पाहण्यात इतके गुंग झाले होते की, काही क्षणासाठी त्या नजरेच्या मोहा मध्ये अडकून गेले होते. अजूनही आर्यव्रत ने आपल्या एका हाताने तिच्या कमरेला पकडून ठेवले होते आणि तिचे दोन्हीही हात त्याच्या उघड्या छातीवर विसावलेले होते.
अचानक आर्यव्रत ला काहीतरी जाणवले आणि त्यांनी झटका लागल्यासारखं तिला आपल्यापासून दूर केले. त्याच्या अशा वागण्याने श्रेयसा ही भानावर आली आणि त्याला असे टॉवेलवर पाहून पटकन पाठ फिरवून उभी राहिली.
तिच्या वागण्याने त्याचेही लक्ष स्वतःवर गेले आणि आपण फक्त कमरेला टॉवेल बांधलेला आहे हे पाहून त्याने बाजूला बेडवर असलेले कपडे उचलले आणि बाथरूम मध्ये निघून गेला. श्रेयसा ला त्या रूममध्ये उभा राहण्याचीही इच्छा होत नव्हती परंतु तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. तिचे लक्ष बाजूला असलेल्या कपाटाच्या कोपऱ्यात गेले तिकडे तिच्या दोन बॅग ठेवलेल्या होत्या.
" माझ्या रूममध्ये माझ्या परमिशनशिवाय कोणीही आलेले मला अजिबात आवडत नाही. " आर्यव्रत जसा आपला नाईट ड्रेस घालून बाहेर आला त्याने तिरकस पने तिच्याकडे पाहून रागीट स्वरात तोंडातून शब्द बाहेर काढले.
" मलाही हाऊस नाही आहे अशा अनोळखी घरामध्ये अनोळखी माणसांच्या रूममध्ये जाण्याची. " त्याचा रागीट आवाज ऐकून तेवढ्याच रागात तिनेही उत्तर दिले.
" मग आता इकडे, माझ्या रूम मध्ये काय करत आहेस ? " तिच्या शब्दातला राग पाहून त्याचाही राग अनावर झाला.
" तुमच्या आईने जबरदस्ती मला इकडे पाठवले. माझ्या बॅग ही इकडे पाठवल्या आहेत आणि आज पासून मला याच रूम मध्ये राहायचे आहे असेही सांगण्यात आले आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आत्ता खाली जाऊन तुमच्या आई सोबत बोलू शकता. " श्रेयसा ने बोलून चालत आपल्या बॅग च्या दिशेने जाऊ लागली. तिने आपली बॅग उघडण्यासाठी हातात घेतली होती.
" थांब... " अचानक आर्यव्रत चा शब्द ऐकून दोन क्षणासाठी ती पण तशीच शांत उभी राहिली.
" ते sss तुला आता यावेळी रूमच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही. तुझी बॅग तिकडे तशीच ठेव आणि तू ही इकडे रूम मध्ये झोप. " ती बाहेर गेली आणि तिने आपल्या आईला जाऊन सांगितले , तर आपले आई-वडील पुन्हा आपल्या रूममध्ये येऊन तांडव करायला कमी करणार नाही असा विचार करून त्याने माघार घेतली.
" मी इकडे झोपायचं ? " अचानक त्याचा बदललेला स्वर ऐकून श्रेयसा ने आश्चर्याने मागे वळून त्याच्याकडे पाहून विचारले.
" होsss म्हणजे या रूममध्ये... तिकडे तो स्लाइडिंग चा दरवाजा आहे ना तो उघडला की आत मध्ये छोटा स्टडी रूम आहे आणि तिकडेच एक सोफा पण आहे... तू तिकडे झोपू शकतेस. " आर्यव्रत तिला एका बाजूला इशारा करत सांगतो.
" ओके... " श्रेयसा ने होकार दिला आणि आपल्या हातात आपली एक बॅग उचलून तिथे दरवाजाच्या जवळ येऊन उभी राहिली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याकडून तो दरवाजा काही उघडला जात नव्हता.
तिचा तो निरार्थक प्रयत्न पाहून आर्यव्रत हलकाच गालात हसला आणि हळूहळू तिच्या दिशेने पुढे येऊ लागला. तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला तरीही ती अजून तो दरवाजा कसा उघडणार या प्रयत्नामध्येच गुंग झाली होती.
" एक मिनिट... " त्याच्या आवाज आपल्या जवळून आल्याने ती शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. त्याने दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या चौकोनी बॉक्स वर आपले बोट ठेवले आणि अचानक तो दरवाजा उघडला. श्रेयसा च्या ही लक्षात आले की या दरवाजाला फिंगरप्रिंट लॉक आहे.
" असे होते तर माझ्याकडून एवढी मेहनत कशाला करून घेतली आधीच स्वतः पुढे येऊन तुमच्या फिंगर लॉक ने हा दरवाजा उघडून द्यायचा होता ना... " श्रेयसा आपला राग दाखवत म्हणाली.
" हम्म... " आर्यव्रत बोलून तो दरवाजा परत बंद करणार इतक्यात घाबरून श्रेयसा ने त्याला थांबवले. तिच्या चेहऱ्यावर भीती पाहून तोही काळजीने थांबला आणि तिच्याकडे पाहू लागला.
" ते sss ते... दरवाजा बंद करू नका. " श्रेयसा भीतीने इकडे तिकडे पाहत त्याला म्हणाली.
" का sss काय झालं ? एकटीला झोपायची सवय नाही का ? " तिच्या चेहऱ्यावर भीती पाहून अचानक त्याच्या मनामध्येही तिच्याबद्दल काळजी निर्माण झाली.
" नाही म्हणजे ते sss तो तुमचा दरवाजा, त्याला फिंगर लॉक आहे. " श्रेयसा हळू आवाजात म्हणाली.
" हो मग.. " तिला काय म्हणायचे आहे तेच त्याला नक्की समजत नव्हते.
" ते तुम्ही जर दरवाजा बंद केला तर परत तुमच्या फिंगर शिवाय तो ओपन होणार नाही आणि मग जर तुम्ही विसरून गेलात की, मी आत या रूममध्ये झोपलेली आहे तर मग मी या रूम मध्येच लॉक होऊन जाईल. " श्रेयसा ने आपल्या मनामध्ये आलेली भीती त्याला सांगितली. पण तिच ते निर्मल बोलणं ऐकून त्याला हसावं की रडावं हेच समजत नव्हतं.
" ते काय आहे ना हा दरवाजा बाहेरून उघडण्यासाठी फिंगर लॉक ची गरज लागते परंतु एखादा माणूस जर आत जाऊन बसला तर तो आतून हे हँडल फिरवून सहज दरवाजा उघडू शकतो. " आर्यव्रत ने त्या दरवाजाकडे पाहत तिला सांगितले बोलताना त्याच्या चेहऱ्यावर हलके स्मित होते.
" ते मला माहित आहे, सांगण्याची गरज नाही. तरीही तुम्ही तो दरवाजा बंद करू नका. " श्रेयसा ला ही आपली चूक समजली परंतु तिला ती मान्य करून घ्यायची नव्हती.
" ठीक आहे... हा दरवाजा असा उघडा राहू दे.. उद्या आपण तुझे फिंगर लॉक याच्यामध्ये ऍड करून घेऊया मग तर तुला या दरवाजाची भीती वाटणार नाही ना ? " त्याने मुद्दामून तिची मस्करी करत तिला विचारले.
" हो sss तसेही मला कोणाची भीती वाटत नाही. " श्रेयसा आपल्या चेहऱ्यावरची भीती लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
" हो sss ते समजलं. खूप रात्र झाली आहे. आता आपण थोडा आराम करूया का ? " आर्यव्रत तिचा तो कॉन्फिडन्स पाहून नकारार्थी मान हलवत म्हणाला.
" ते मला फ्रेश व्हायचे होते आणि कपडेही चेंज करायचे होते. " श्रेयसा
" बाथरूम कोणत्या दिशेला आहे ते तर आता तुला समजलेच असेल. हा दरवाजाही उघडाच आहे. " आर्यव्रत बोलून आपल्या बेडवर जाऊन बसला.
श्रेयसा ने तिकडे स्टडी मध्ये आपली बॅग खाली ठेवली आणि उघडली. त्यातून आपले नाईटचे कपडे बाहेर काढले. तिकडे सोफ्यावर बसूनच आपल्या अंगावर असलेले सगळे दागिने काढून बाजूच्या टेबलवर ठेवले. आपले कपडे आणि टॉवेल घेऊन ती त्या रूममधून बाहेर आली आणि सरळ बाथरूम मध्ये गेली.
आर्यव्रत ने तिच्यासाठी आपल्या रूमची लाईट चालू ठेवली होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी टाईमपास करत होता. थोड्यावेळाने श्रेयसा फ्रेश होऊन, तिने नेसलेली साडी हातात घेऊन तिचे नाईट चे कपडे घालून बाथरूम मधून बाहेर आली.
श्रेयसा ने ट्रॅक पॅन्ट आणि लूज टी-शर्ट घातले होते. केस धुतल्यामुळे मोकळे सोडले होते, नुकतीच अंघोळ करून बाहेर आल्यामुळे तिचा चेहरा अगदी फ्रेश आणि टवटवीत दिसून येत होता. आर्यव्रत ची नजर तिच्यावर गेली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदाच तो तिच्या चेहऱ्याला इतका निरखून पाहत होता. ती दिसायला खरच खूप सुंदर होती.
" माझे काम झाले आहे. तुम्ही तुमच्या रूमची लाईट बंद केली तरी चालेल. " श्रेयसा स्टडी रूमच्या दरवाजाच्या जवळ उभी राहून म्हणाली आणि त्याच्याकडे न बघताच आज निघून गेली.
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा