Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ७

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ७

आर्यव्रत काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला. तो जागेवरून उठला, त्याने दरवाजा मधून आत डोकावून पाहिले, ती सोफ्यावर झोपून आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होती. त्याने रूम मधली लाईट बंद केली आणि पुन्हा आपल्या बेडवर येऊन आडवा झाला.

’ तिच्या बोलण्यातूनही असेच वाटत की, तिच्या मनाविरुद्ध हे लग्न झालं आहे. तरीही उद्या एकदा उठल्यावर आपल्याला या विषयावर तिच्यासोबत जे काय आहे ते सरळ बोलायला पाहिजे. ’ आर्यव्रत मनामध्ये काहीतरी विचार करत शांतपणे झोपून जातो. तिकडे श्रेयसा ची ही तशीच काहीशी अवस्था असते. आताही तिच्यासाठी जागा नवीनच असते परंतु आधीपासूनच झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यात पूर्ण शरीर दिवसभराच्या पूजेमध्ये दमून गेल्यामुळे तिला लवकर झोप लागते.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या रूमच्या दरवाजावर थाप ऐकवाल्याबरोबर त्या दोघांनाही जाग आली.

" ते तुझी चादर घे आणि बाहेर बेड वर येऊन बस , दरवाजा उघडल्यावर बाहेरची व्यक्ती असेल त्यालाही असे दृश्य दिसायला नको.  " आर्यव्रत उठून तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला...

" ओके... " श्रेयसा ही पटकन उठली आणि बाहेर बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. आर्यव्रत ने पुढे जाऊन रूमचा दरवाजा उघडला.

" दादा , वहिनी तुम्हा दोघांनाही खाली बोलावले आहे. " आरोही त्याच्याकडे पाहून निरोप देऊन तिकडून निघून जाते. श्रेयसा भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे पाहते तर आठ वाजून गेले असतात. ती मला मध्येच स्वतःला शिव्यांची रांगोळी वाहू लागते.

" हे लग्न तुलाही जबरदस्ती करावे लागले ना ? " आर्यव्रत दरवाजा बंद करून येतो आणि तिच्यापासून काही अंतरावर उभा राहून तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विचारतो.

" हो, हे पण अशा व्यक्तीसोबत ज्याला मी ओळखतही नाही. हे लग्न मला मान्य नाही. " श्रेयसा नाराज स्वरात म्हणाली.

" माझंही हेच मत आहे. घरच्यांसाठी वडिलांनी दिलेल्या वचनासाठी मला फक्त हे लग्न करावे लागले परंतु हे लग्न मी कधी स्वीकारू शकत नाही. मी तुला माझ्या आयुष्यामध्ये बायकोची असलेली जागा कधीच देऊ शकत नाही आणि तुझ्याकडून ही तशी काही अपेक्षा नाही. " आर्यव्रत तिच्याकडे पाहून सरळ शब्दात म्हणाला.

" मी पण नवरा म्हणून तुझा कधी विचार करू शकत नाही. तर मग आपण एक करार करूया का ? " श्रेयसा त्याच्याकडे पाहून त्याला विचारते.

" कोणता करार ? " आर्यव्रत

" आपण जे हे जबरदस्ती च लग्न केलं आहे ते लग्न फक्त आपल्या घरच्यांना आणि सगळ्यांना दाखवण्यापूर्तीच मर्यादित असावे. आपलं आयुष्य मात्र आपण आपापल्या मार्गाने जगायचं. " श्रेयसा टक लावून त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली.

" ठीक आहे. खरंतर मलाही हेच हवं होतं. तू माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची लुडबुड करायची नाही.  मी ही तुझ्या आयुष्यामध्ये करणार नाही. " आर्यव्रत ला ही आपल्या मनावर असलेला भार हलका झाल्यासारखा वाटू लागला.

सध्या त्या दोघांच्याही मनामध्ये नियतीने बांधून दिलेल्या या लग्न गाठी मुळे राग,  नाराजी निर्माण झाली होती. या बंधनातून त्यांनी आपापला मार्ग निवडला होता परंतु नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं.

आर्यव्रत आणि श्रेयसा दोघांनीही आपापली तयारी केली आणि खाली निघून आले. आर्यव्रत चे आई वडील आणि घरात असलेली काही पाहुणे मंडळी त्या दोघांची वाट पाहत होते.

" या बसा सुनबाई , आम्ही सगळे नाश्ता करण्यासाठी तुमचीच वाट पाहत होतो. आज कालच्या मुलींना लवकर उठण्याची सवय नाही, पण हे सगळं त्यांच्या माहेरी ठीक वाटतं. सासरी आल्यावर तरी आपल्या वागण्यामध्ये थोडा बदल करावा.  " आर्यव्रत ची काकी श्रेयसा कडे पाहून तोंड वाकड करत म्हणाली.

" काही नाही ओ जाऊ बाई... तसेही आता प्रत्येकाला वेगवेगळी सवय असते. आपली आरोही सकाळी लवकर कॉलेजला जाते म्हणून ती लवकर उठते. आमच्या श्रेयसा ला घरी येऊन अजून दोन दिवसही झाले नाही.  त्यात लग्नाची गडबड , काल झालेल्या पूजेची गडबड , बिचारी पोर दमली  असेल ना... थोडा आराम केला म्हणजे बरं वाटेल तिला.  " रेवती पटकन आपल्या सुनेची बाजू घेऊन म्हणाली.

" बाळा,  तुला व्यवस्थित झोप आली ना ? आर्य च्या रूम मध्ये तुला तुझ्या आवडीनुसार काही बदल करायचे असतील तर आम्हाला सांग आपण करून घेऊ. ती रूम तुला तुझ्या हक्काची ही वाटली पाहिजे. " आर्यराज तिच्याकडे पाहून काळजीने विचारतात. आर्यव्रत आपल्या वडिलांच्या मुखातून निघणाऱ्या त्या सौम्य शब्दाकडे मात्र डोळे वटारून पाहू लागतो.

’ आपल्या सोबत बोलताना असे शब्द का निघत नाही आणि आता ही काल आलेली मुलगी, हिच्यासोबत किती प्रेमाने बोलत आहे. ’ आर्यव्रत आपल्या वडिलांकडे पाहून मनामध्ये विचार करू लागतो. श्रेयसा त्यांच्याकडे पाहून काही न बोलता फक्त हलकेच गालात हसते.

" तिला आधी नाश्ता करून घेऊ द्या. कालपासून तिने व्यवस्थित काही खाल्लं नाही. आणि आर्य आता नाश्ता झाल्यावर तिला घेऊन गावदेव करून या. " रेवती तिला बसवत आर्यव्रत कडे पाहून त्याला सांगतात.

" मम्मी अजूनही तुमचे झाले नाही का ? मला ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम आहे. मी असा जास्त दिवस सुट्टी घेऊन नाही बसू शकत. " आर्यव्रत नाराजीच्या स्वरात आपल्या आईकडे पाहून म्हणाला.

" लग्न झालेल्या जोडप्याने गाव देव करायचे असते आणि तुझ्या ऑफिसचे ते आम्हाला काही सांगू नको. घरचा स्वतःचा हक्काचा बिझनेस असताना देखील ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा हट्ट तुमचा होता. " आर्यराज थोड्या कडक शब्दात त्याच्याकडे पाहून म्हणाले.

’ आता थोड्या वेळापूर्वीच आपल्या वडिलांच्या मुखात अगदी सोम्या वाटणारे शब्द आता आपल्यासाठी अंगार बरसत होते. ’ आर्यव्रत ने नकारार्थी मान हलवली आणि शांतपणे नाश्ता करायला बसला.

" आर्य दोन्ही गावांमध्ये असणारे देवाचे मंदिर सगळीकडे जावा. नारळ , ओटी देऊन दोघांनीही जोडी ने आशीर्वाद घ्या. तुमच्या गाडीमध्ये ओटीचे सगळे सामान आधीच ठेवलेले आहे. " रेवती त्या दोघांकडे पाहून म्हणाली.

ते दोघेही घरच्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर गाडीमध्ये जाऊन बसले. घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गावाच्या सगळ्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी ओटी भरली आणि आशीर्वाद घेतला. संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ते दोघेपण घरी परत आले. तिला घरी सोडून थोड्या वेळात आर्यव्रत आपल्या कामासाठी बाहेर निघून गेला.

श्रेयसा ला तिच्या सासू ने आराम करण्यासाठी रूममध्ये पाठवले होते, म्हणून ते रूम मध्ये येऊन बसली. काल तो समोर असल्यामुळे तिला रूम कडे व्यवस्थित लक्ष देता आले नाही आज मात्र रूममध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूला ती व्यवस्थित आणि निरखून पाहत होती. त्या रूम ची सगळी साज सजावट आणि त्या रूममध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूकडे पाहून आर्यव्रत ची आवड खूप क्लासिक आणि युनिक आहे हे तिच्याही लक्षात आले.

स्टडी रूम मध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवली होती. संपूर्ण रूम त्याने स्टडी रूमसाठी वापरला होता. पुस्तकांचे रॅक, ठेवण्याची पद्धत, खूप छान होती. प्रत्येक रॅक च्या बाजूला एक छोटी यादी लिहिलेली होती त्यानुसार त्या खाण्यामध्ये कोणती कोणती पुस्तके आहे त्याची नाव त्यावर दिसून येत होती.

श्रेयसा ने वाचण्यासाठी आपल्या आवडीचा एक पुस्तक बाहेर काढले आणि ते घेऊन ते सोफ्यावर बसून शांतपणे वाचू लागली. पुस्तक वाचताना तसेच तिला झोप लागली आणि तिच्या सोफ्यावर झोपून गेली. तिला जाग आली तेव्हा संध्याकाळची सहा वाजले होते.


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all