डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग १२
श्रीकांत आणि आर्यव्रत बाहेर हॉलमध्ये बसून त्यात दोघींची ही वाट पाहत असतात. आर्यव्रत घरी निघण्याच्या तयारीत असतो. श्रेयसा बाहेर आली की, आपण निघावे असा त्याचा विचार असतो.
श्रेयसा आणि तिची आई सामान घेऊन बाहेर येतात आणि समोर असलेल्या टेबलवर ठेवतात. सुरभी श्रेयसा ला आर्यव्रत च्या बाजूला बसायला सांगते, तशी ती त्याच्या बाजूला जाऊन बसते.
त्यांच्या घरी काम करणाऱ्या काकी त्यांच्या हातात औक्षण करण्यासाठी ताट आणून देतात... सुरभी श्रेयसा ला हळद कुंकू लावते आणि श्रीकांत पुढे येऊन आर्यव्रत चे औक्षण करतात. ते दोघे पण त्यांच्या हातात त्या बॅग देतात..
" तुम्ही खूप जास्त करत आहात.. एवढे सगळ देण्याची काही गरज नव्हती ? "त्यांचा पाहून चार पाहून आर्यव्रत ला खूपच अवघडल्यासारखे वाटू लागले...
" काही नाही जावईबापू... आपल्या घरची रीतच आहे तशी... आमचा जावई पहिल्यांदाच घरी आला आहे तर त्याच्या मानपानामध्ये काही कमी पडायला नको.. " श्रीकांत भोळेपणाने म्हणतात.
" नाही ओ मामा, खरंच हे खूप दिलं आहे आणि मला एवढ्या सगळ्याची काही गरज नाही. तुम्ही मला तुमच्या घरचा जावई मानत असला तरी, माझ्यासाठी तुम्ही माझ्या आई-वडिलांप्रमाणे आहात आणि माझ्या आई-वडिलांनी हक्काने मला फक्त आशीर्वाद द्यावा , एवढीच माझी इच्छा आहे... तुमच्या मुलीला आमच्या घरी कशाचीही कमी पडणार नाही , याची जबाबदारी आता माझी आहे. मला माहित आहे, आपल्या या दोन घराण्यामध्ये आधीचे वाद होते त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडी भीती वाटत असेल, पण तुम्ही निश्चिंत रहा... भूतकाळात असणाऱ्या वादांचा तिच्या भविष्यावर काहीही परिणाम होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. माझे आई वडील ही तिला अगदी स्वतःच्या मुलींप्रमाणे वागवतील... " आर्यव्रत त्यांच्याकडे पाहून पण शांतपणे सांगत असतो.
" नाही जावई बापू, तुम्ही विचार करू नका... आमच्यासाठी पण तुम्ही आधी आमच्या मुलाप्रमाणे आहात... आमच्यासाठी आता कोण करत आहे ? तुम्ही आणि श्रेयसा दोघेच आहात. " श्रीकांत यांना आर्यव्रत चे बोलणे ऐकून खूप भरून येते. आपल्या नशिबाने आपल्याला खूप चांगला जावई मिळाला आहे असे वाटू लागते. लग्न ठरवताना एवढा विचार केला नव्हता पण आता मात्र आपण एक चांगलं घराणं पाहून आणि चांगला मुलगा पाहून आपल्या मुलीचे लग्न केले आहे असा विचार करून त्यांचे मनही निश्चिंत होते...
" खरंच तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर फक्त शगुन म्हणून अकरा रुपये आणि तुमचा आशीर्वाद एवढच माझ्यासाठी पुरेस आहे.. या सगळ्याची काहीही गरज नाही. " आर्यव्रत शांतपणे त्यांच्याकडे पाहून म्हणाला..
" हो , पण हे सगळं तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांसाठी घेतले होते... आपल्या गावामध्ये ही रीतच आहे. जावई जेव्हा पहिल्यांदा घरी येतो तेव्हा हे सगळं करावे लागते.. असे नाही म्हणू नका. गावातल्या लोकांना समजले तर ते नाव ठेवतील." सुरभी आनंदाने मन भरून म्हणाली. खरंतर त्याचं बोलणं तिलाही मनापासून आवडलं होतं पण तरीही गावांमध्ये राहत असल्यामुळे त्याच्या रीत भात करणे गरजेचे वाटत होते.
" नाही... या रुढी, रिती, परंपरा या खर तर आपल्यासारख्या मोठ्या घराण्यातून चालू होतात आणि मग प्रत्येक लोकांना त्या कराव्या लागतात. अशावेळी ज्यांची हे सगळं करण्याची खरंच परिस्थिती नसते त्यांनाही लोक दिखाव्यासाठी कर्ज काढून या सगळ्या रीती कराव्या लागतात आणि मला हेर नको आहे.. या सगळ्यासाठी मी जेव्हा स्वतःपासून सुरुवात करेल तेव्हाच हळूहळू गावामध्ये हा बदल दिसून येईल ना... " आर्यव्रत
" श्रेयसा तू तरी काही सांग त्यांना... " सुरभी आता पूर्णपणे गोंधळून जाते , आत्ता काय बोलावं तेच तिला समजत नाही...
" आई... ते अगदी बरोबर बोलत आहे. या सगळ्याची खरच काही करत नाही आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्याला आधी स्वतः पासून करायला पाहिजे, मगच आपण ती गावकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो. या सगळ्यांमध्ये मीही त्यांच्यासोबत आहे. " श्रेयसा आनंदाने एक नजर त्याच्याकडे पाहून आपल्या आई-वडिलांना समजावून सांगू लागते...
" ठीक आहे, जशी तुमची इच्छा... " त्या दोघांचं बोलणं ऐकून शेवटी श्रीकांत स्वतः माघार घेतात. त्या दोघांचे औक्षण करून श्रीकांत रीत म्हणून त्यांच्या हातात अकरा रुपये शगुन ठेवतात...
आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही खाली वाकून आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतात...
" सदा सुखी रहा... तुमचा संसार असाच आनंदाने आणि सुखाने बहरू दे. " ते दोघे पण भरभरून आशीर्वाद देतात... त्यांचा निरोप घेऊन श्रेयसा आणि आर्यव्रत आपल्या घरी जायला निघतात. दोघेपण गाडीमध्ये जाऊन बसतात. श्रीकांत आणि सुरभी त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आलेले असतात. गाडी चालू होते आणि त्यांच्या घराच्या दिशेने पुढे जाऊ लागते.
" आज आपल्या जावईचं बोलणं ऐकून खरंच मन खूप प्रसन्न झालं.... देवाच्या कृपेने आपल्या श्रेयसा ला चांगला मुलगा नवरा म्हणून लाभला आहे... " सुरभी आनंदाने आपल्या नवऱ्याकडे पाहून त्यांना सांगते..
" हो ना.... इनामदारांच घराणं जेवढ मोठ आहे , त्यांचे संस्कारही तेवढे चांगले आहेत हे आज खात्रीने सांगता येते. " श्रीकांत म्हणाले.... दोघेही आनंदाने एकमेकांसोबत गप्पा मारत घरात गेले....
" थँक्यू... " बराच वेळ गाडीमध्ये शांतता पसरली होती शेवटी त्या शांततेचा भंग करत श्रेयसा म्हणाली...
" कशाबद्दल ? " आर्यव्रत ने एक नजर तिच्याकडे पाहून विचारलं.
" आज तुम्ही जे काही सांगितले.. मला छान वाटले. ते गिफ्ट त्यांनी मनापासून आणले होते पण अशा रीती मलाही आवडत नाही. " श्रेयसा
"आपल्याला जर आपल्या गावासाठी काही करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. मगच आपण गावामध्ये तो बदल घडवून आणू शकतो आणि मला माझ्या गावामध्ये अजून खूप काही बदल घडवून आणायचे आहे मी त्याच्यासाठीच प्रयत्न ही करत आहे. " आर्यव्रत
" मला स्वतःच्या करिअर सोबत गावासाठी ही काही करायला मिळाले तर आवडेल त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी गरज वाटेल मला सांगा , मी तुमच्या या कामांमध्ये तुमच्या सोबत असेल... कायम.. " श्रेयसा
" हो... आपल्या गावातल्या तरुण पिढीने जर प्रत्येकाने असे ठरवले तर गाव बदलायला जास्त वेळ लागणार नाही.. " आर्यव्रत
ते दोघे पण आज एकमेकांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात. काही वेळातच ते घरी पोहोचतात. घरी आदित्य राज आणि रेवती त्या दोघांचीही वाट पाहत असतात.
" अरे, आला तुम्ही... आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. " रेवती त्या दोघांना येताना पाहून पुढे येते. तिच्या दोघांनाही दारातच उभा करून आधी त्यांच्यावरून भाकरी तुकडा ओवाळून त्या दोघांचीही नजर काढते..
ते दोघे पण आत येऊन खाली हॉलमध्ये बसतात... चौघे पण हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात... तिकडेच त्यांचा चहा नाश्ता होतो... श्रेयसा आज स्वतः त्यांच्यासमोर आर्यव्रत चे कौतुक करून त्याने जे काही केलं ते सगळं सांगू लागते.. आदित्यराज आणि रेवती दोघेही आपल्या मुलाचे कौतुक ऐकून आनंदी होतात...
" माझा महत्त्वाचा कॉल येत आहे.. ऑफिस मधून आहे... तुमचं चालू द्या... " आर्यव्रत बोलून तिकडून बाजूला निघून जातो आणि आपला फोन उचलून त्यावर बोलू लागतो...
" जा बाळा, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर... जेवण झाल्यावर मी तुला खाली बोलावते... " रेवती तिच्याकडे पाहून म्हणाली...
" नाही आई, मी पटकन फ्रेश होऊन येते आणि तुम्हाला मदत करते... " श्रेयसा बोलून आनंदाने आपल्या रूममध्ये निघून जाते....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा