स्पर्धा
इच्छा तिथे मार्ग भाग पहिला
संध्याकाळचे सहा वाजले होते. नीताच्या ज्युनिअर आणि सीनिअर च्या मुलांचा क्लास चालू होता. जास्त नाही फक्त सात मुल खाली सतरंजीवर बसली होती. त्यांच्या बाजूलाच ती पण अगदी तल्लीन होऊन त्यांना शिकवत होती.
नीता मागच्या चार वर्षा पासून ट्युशन घेत होती. त्या पूर्वी ती एका सी. ए.कडे जॉब करत होती. पण लॉकडाऊन मध्ये तिला नोकरी सोडावी लागली. कारण तिचा दहा वर्षाचा मुलगा रोशन आणि त्याची ऑनलाईन शाळा. तिचा नवरा राजेंद्र बँकेची नोकरी असल्याने तिला काही तिला काही प्रोब्लेम नव्हता . तिने पुन्हा नोकरीचा विचार सोडून दिला. पण नंतर तिला फारच कंटाळा यायला लागला. एकदा तिच्या घरी रोशनचा मित्र राज त्याच्या छोट्या भावाला घेऊन आला होता.
रोशन आणि राज त्यांचा अभ्यास करत होते.तर छोटा त्याच्या मध्ये बसला होता.
"राज नाव काय रे ह्याच."
"क्रिश नाव आहे ."
"काकी ,तो ऐकतच नव्हता. रोशन दादा कडे जायचं म्हणून रडत होता. त्याला पण अभ्यास करायचा आहे ."
"कोणत्या स्टँडर्डला आहे."
" ज्युनिअर ला आहे ."
"काकी ,तो ऐकतच नव्हता. रोशन दादा कडे जायचं म्हणून रडत होता. त्याला पण अभ्यास करायचा आहे ."
"कोणत्या स्टँडर्डला आहे."
" ज्युनिअर ला आहे ."
"अच्छा. तुम्ही करा .मी त्याचा अभ्यास घेते. क्रीश इकडे ये."
तिने क्रिश ला एक कोरा कागद दिला आणि दुसऱ्या कागदावर अल्फाबेट लिहून दिले.
तिने क्रिश ला एक कोरा कागद दिला आणि दुसऱ्या कागदावर अल्फाबेट लिहून दिले.
"हे असं लिहून काढ.तुझा अभ्यास."
अस सहा दिवस रोज क्रीश येत होता.आणि नीता त्याला काहीतरी अभ्यास देत होती.
सहाव्या दिवशी राज ची आई सकाळीच त्यांच्या घरी आली.
'रोशन ची मम्मी ,तुम्हाला एक विचारू का. "
अस सहा दिवस रोज क्रीश येत होता.आणि नीता त्याला काहीतरी अभ्यास देत होती.
सहाव्या दिवशी राज ची आई सकाळीच त्यांच्या घरी आली.
'रोशन ची मम्मी ,तुम्हाला एक विचारू का. "
'हो. विचारा ना.काय झालं"?
"'तुम्ही क्रिश चा ट्युशन घ्याल का?. जेव्हापासून इथे यायला लागला आहे त्याच्या ट्युशन ला जायचं नाही म्हणत आहे. तुमच्याकडे अभ्यास करायला यायचं आहे. "
"अहो.पण मी कस काय मला काही अनुभव नाही."
खरतर नीता सुध्दा काहीतरी काम करायचा विचार करत होती. नुसत बसून तिला सुध्दा कंटाळा आला होता.पण काय करायचं ते कळत नव्हत.इच्छा होती पण मार्ग दिसत नव्हता..

शेवटी हो,नाही करत तिने ट्युशन घ्यायला होकार दिला.
राजच्या आईने अजून चार ज्युनिअर ची मुल पाठवली. नीता सर्व गोष्टींचा विचार करत होती. बेल च्या आवाजाने भानावर आली .
नीताच्या घरकामात मदतनीस मावशी आल्या होत्या.संध्याकाळी दोन तास त्या तिला घरात कामाला मदत म्हणून येत होत्या.
स्वयंपाक करताना भाजी चिरून देणे, कचरा काढून घर आवरणे,कपड्यांच्या घड्या घालणे, भांडी घासणे, आणि इतर काम करत असत .

"मावशी ,ही कोण ."?
मावशी बरोबर एक साधारण वीस वय असलेली बाई आत आली.
"अहो, वहिनी ही माझी छोटी सून माधुरी ."
"आली का गावावरून."
"अहो, वहिनी ही माझी छोटी सून माधुरी ."
"आली का गावावरून."
"हो,झाले दहा दिवस .घरी बसून कंटाळली.तर आणली तिला आज."
मावशी त्यांचं काम करायला आत गेल्या .ती मात्र कोपऱ्यात अंग चोरुन उभी राहिली .
मावशी त्यांचं काम करायला आत गेल्या .ती मात्र कोपऱ्यात अंग चोरुन उभी राहिली .
"अग,तिकडे का उभी आहेस.ये बस इथे."
"नको,वहिनी मी इथेच थांबते."
'अग ये.बस "
"नको,वहिनी मी इथेच थांबते."
'अग ये.बस "
ती हळूच येऊन नीताच्या बाजूला बसली
"तू,बस मी आले ."ती पहिल्यांदा आली तर तिला काहीतरी द्यायला हवे .असा विचार करत नीता बेडरूम मध्ये गेली.
नीता जेव्हा बाहेर आली तेव्हा माधुरी एका मुलाची वही बघून त्याला काहीतरी सांगत होती.
"तू,बस मी आले ."ती पहिल्यांदा आली तर तिला काहीतरी द्यायला हवे .असा विचार करत नीता बेडरूम मध्ये गेली.
नीता जेव्हा बाहेर आली तेव्हा माधुरी एका मुलाची वही बघून त्याला काहीतरी सांगत होती.
"काय रे जय काय दाखवतोय ताईला."
"टीचर. ताई ने माझ चुकलेले बरोबर लिहून दिले."
"छान. कितवी शिकलेस ग."
"टीचर. ताई ने माझ चुकलेले बरोबर लिहून दिले."
"छान. कितवी शिकलेस ग."
बारावीची परीक्षा दिली .आणि लगेच लग्न झालं.
निताला तिच्या बोलण्यातून नाराजगी जाणवली.
मावशी आल्यामुळे नीताला तिच्याशी अजून बोलता आल नाही.
"माधुरी,हे घे ." निताने तिला साडी दिली.
निताला तिच्या बोलण्यातून नाराजगी जाणवली.
मावशी आल्यामुळे नीताला तिच्याशी अजून बोलता आल नाही.
"माधुरी,हे घे ." निताने तिला साडी दिली.
'वहिनी,नको. कशाला उगाच"
"घे ग. पहिल्यांदा आली आहे . काळजी घे."
"घे ग. पहिल्यांदा आली आहे . काळजी घे."
क्रमशः
मधुरा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
सामाजिक कथा दुसरी फेरी
सामाजिक कथा दुसरी फेरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा