Login

इच्छा तिथे मार्ग भाग ३

I Like To Read
स्पर्धा
इच्छा तिथे मार्ग भाग ३
दोन दिवसांनी संध्याकाळी राजेंद्र चहा पित होते.
" नीता, काय झालं विडा कुठपर्यंत आला आहे ."
"कसला विडा काय बोलता आहात बाजूला व्हा . आवरू दे. मुलं येतील. तुम्हाला बँक हॉलिडे आहे."
"माधुरी .मावशी ची सून."
"अच्छा ती होय.कालच ति रिझल्ट ची झेरॉक्स देऊन गेली. खूपच चांगले मार्क आहेत. ७० टक्के ."
"काय बोलते."
"बर माझी काही मदत लागली तर सांग.मी आहे.फक्त मला "
"कळलं हर काम की किंमत होती है.माहिती आहे तुमचा डायलॉग." तिने मधूनच त्याच बोलण तोडल.
मावशी, जरा इकडे येता का .
माधुरी ला जरा महिनाभर संध्याकाळी ट्युशनमध्ये माझ्या मदतीला पाठवाल का.
हो.पाठवेन की.पण मग मी काय करू घरात बसून.
मावशी तुम्ही या तुमचं काम करायला .
दोघी एकच काम करायला कस.
मावशी तुम्हाला कळलं नाही.मी तिला मुलांना शिकवताना मला मदत म्हणून बोलवते आहे. मुलांच्या परीक्षा आहेत. तेव्हाच रोशुची परीक्षा आहे त्याचा अभ्यास पण घ्यावा लागेल.
काळजी नका करू तिला पगार देईन .
ठीक आहे. वहिनी पाठवेन.तुम्ही आहात मग मी काळजी कसली.
पण तिला येईल ना. उगीच तुम्हाला त्रास.
का नाही येणार. त्रास वैगरे काही नाही.बारावी शिकलेय ना.तुम्ही पाठवा. मी बघते.
दुसऱ्या दिवशी माधुरी आली.
तिने तिला इंग्लिश स्पीकिंग च पुस्तक वाचायला दिलं.
ट्युशनच्या मुलांशी इंग्लिश मध्ये बोलायची सक्ती केली. नीताने तिला मुलांच्या वह्या चेक करायच्या आणि त्यांची ओरल घायची दोनच काम दिली होती.
दहा दिवसांनी तिला घरातला कॉम्पुटर चालू करून दिला. माधुरीला कळल कोर्स मध्ये खूपच कमी शिकवलं होत . तिने नीताच्या मदतीने परत बेसिक समजून घेतलं.
महिना संपला तस नीताने तिला पगार दिला.
मावशी बाजूला बसल्या होत्या.
नको वहिनी.काम कमी आणि शिकवलं कित्ती तुम्ही मला.
तेच आता तुला शिकवायच आहे."
म्हणजे.समजल नाही."
"सांगते.आधी तुझ्या नवऱ्याला येऊ दे."
तिचा नवरा आला.नीताने त्याला बसायला सांगितले.
"मावशी तुमची माधुरी खूप हुशार आहे .
उद्यापासून ती माझ्याकडे काम नाही करणार."
"काय झालं वहिनी. तिच्या कडून काही चुकल का.
चुकल तर आहेच.पण तीच नाही. तुमचं."
काय चुकल सांगा."
"अहो,तिला तुम्ही समजून घेतल नाही. तिची हुशारी ओळखली नाही,तिच्या मनाची अवस्था कळून घेतली नाही हे चुकल."
मावशी तिच्याकडे बघत होत्या.
"बरोबर बोलत आहाt. वहिनी.माधुरी मला माफ कर.तुझ्या इच्छेविरुद्ध तुला घरकाम करायला लावलं..पण आपल्याकडे सगळे अशीच काम करतात.माझी सासू,तिची सासू,माझी बहिण मी,तुझी बहिण सगळ्या जणी हेच घरकाम नोकरी करतोय . शहरात राहायचं तर खर्च किती असतो.काम तर करायलाच पाहिजे." बोलतच माधुरी च्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या.
"आई, अस नका करू."
"मावशी शांत व्हा."

"माझ्याकडे एक उपाय आहे." नीताने दोघींना बसायला सांगितले.








क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
सामाजिक कथा दुसरी फेरी
0

🎭 Series Post

View all