स्पर्धा
इच्छा तिथे मार्ग भाग ४ अंतिम भाग
इच्छा तिथे मार्ग भाग ४ अंतिम भाग
"वहिनी,तुमचा उपाय मला आवडला.चालेल."
"मावशी आधी ऐकून तर घ्या."
"आई आधी त्या काय म्हणत आहे. ऐक तर.'"माधुरीच्या नवऱ्याने त्याच्या आईकडे बघितले.
"माधुरी , काल माझी एक मैत्रीण आली होती. मी आत गेल्यावर तुझ्याशी बोलत होती. तू पण मुलांना शिकवताना तिच्याशी बोलत होतीस .तिने तुला काही प्रश्न विचारले.तू तिच्याशी मध्येच इंग्लिश मध्ये पण बोललीस."
हा आठवत.कालच आल्या होत्या.लगेच कशी विसरणार.
"हा.ती माझी मैत्रीण नव्हती.म्हणजे अशीच ओळखीची मैत्रीण आहे. रोशू ज्या कॉम्पुटर क्लास ला शिकतो. तिथली मॅडम आहे. त्या दिवशी बोलता बोलता कळलं तिला तिच्या इन्स्टिट्युट मध्ये लहान मुलांना बेसिक कॉम्प्युटर शिकवायला टीचर हवीय."
"मी सांगितल तुझ्याबद्दल."
"ती म्हणली वेगळा इंटरव्ह्यू घेवुया. दुपारी तिचा फोन आला होता.तिने तुला कॉम्प्युटर टीचर च्या जॉबसाठी पक्क केलं आहे.'"
"खरंच .पण कुठे आहे क्लास. लांब नाहिये ना."
"अग लांब नाही.रोज तर तिथूनच येतेस. समोरच्या मेन रोड वर.
"सुर्यवंशी कॉम्प्युटर इन्स्टिट्युट."
"बापरे ते किती मोठं आहे."
" त्या मॅडम आता ऑफिस मध्ये आहे. ईशा सुर्वंशी नाव आहे त्यांचं.तू जाऊन ये.वेळ. आणि पगार वैगरे सगळ नीट बोलून घे.तुला शिकवत येणार आहे.महिनाभर आपण प्रॅक्टिस केलीय.घाबरु नकोस ."
"हो.वहिनी अजिबात घाबरणार नाही.तुम्ही एव्हढी मला मदत केलीत.मी अजिबात वाया जाऊ देणार नाही."
माधुरी आणि तिचा नवरा दोघं निघून गेले.
"मावशी, तुम्ही गेला नाहीत."
"तुमचे आभार मानायचे होते .तुम्ही आमच्यासाठी."
"मावशी आभार कसले.तुम्ही मला परक्या नाहीत घरातल्या आहात.पहिल्या दिवशी जेव्हा तिला बघितल तेव्हाच जाणवलं .ही काहीतरी वेगळी आहे."
"जे तुम्ही केलं ते पुढची पिढी करेलच अस नाही. "
"हो बरोबर .चला येते ."
रात्री बेडरूम मध्ये .
"अग काय करतेस चक्कर येईल. "नीताने राजेंद्र चे दोन्ही हात पकडुन त्याला गोल फिरवत होती .
"विडा पूर्ण झाला."
"हो.तो पण यशस्वीरीत्या पूर्ण झाला."
"अस बघू नका. घरात राहून पण समाजसेवा करता येते.त्यासाठी बाहेर जायची गरज नसते . आणि मला आवडत लोकांना मदत करायला ."
"ठीक आहे .करा मदत हरकत नाही.पण थोडीशी मदत ,नाही नाही घरातली समाजसेवा ह्या गरीबाची पण करावी ."
"करते.थांबा जरा . रोशुला चादर पांघरून आले ."
"अग काय करतेस चक्कर येईल. "नीताने राजेंद्र चे दोन्ही हात पकडुन त्याला गोल फिरवत होती .
"विडा पूर्ण झाला."
"हो.तो पण यशस्वीरीत्या पूर्ण झाला."
"अस बघू नका. घरात राहून पण समाजसेवा करता येते.त्यासाठी बाहेर जायची गरज नसते . आणि मला आवडत लोकांना मदत करायला ."
"ठीक आहे .करा मदत हरकत नाही.पण थोडीशी मदत ,नाही नाही घरातली समाजसेवा ह्या गरीबाची पण करावी ."
"करते.थांबा जरा . रोशुला चादर पांघरून आले ."
समाप्त
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
दुसरी फेरी सामाजिक कथा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा