Login

ईरा ब्लॉगिंग वर्धापन दिन

ईरा प्रेरणादायक अँप
नमस्कार
आज ईरा ब्लॉगिंग साहित्यिक व्यासपीठाचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने मी माझे मत मांडत आहे. ईरा या साहित्यिक व्यासपीठावर मी नवीनच आहे. सुरुवातीला मला कविता शेअर करताना, लेख शेअर करताना थोडा त्रास व्हायचा पण हळूहळू सर्व जमायला लागलं. या मंचावर रोज नवनवीन साहित्य वाचायला मिळतात. साहित्याचा दर्जा हा उत्कृष्ट असतो. एकापेक्षा एक असे उत्कृष्ट लेखक ईरा या साहित्यिक व्यासपीठावर उपलब्ध आहेत. इतर साहित्यिकांचे साहित्य वाचून छान वाटते. लिहिण्याची प्रेरणा मिळते. आपण आपल्या साहित्यामध्ये कोणत्या सुधारणा कराव्या हेही कळते. ईरा या साहित्यिक व्यासपीठावर साहित्याला व्हिव जास्त मिळतो. आणि वाचक ही बरेच आहेत. ईरा हे नवीन लेखकांसाठी खूप चांगले आहे. तसेच उत्कृष्ट लेखकांचे मार्गदर्शनही येथे लाभते. आज ईरा ब्लॉगिंग या साहित्यिक व्यासपीठाचा वर्धापन दिन निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते. अशीच खूप प्रगती व्हावी, मोठ्या प्रमाणात साहित्यिक मंडळी या ईरा ब्लॉगिंगशी जोडल्या जावे ही आशा करते. आणि पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देते.

© चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
9834*83685
0

🎭 Series Post

View all