Login

एक थेंब

Reading
एक थेंब


एक थेंब पावसाचा आला
थांबून जमिनीवर
गेला कधी कळलेच नाही
पुन्हा न येण्यासाठी

एक थेंब
डोळ्यातील अश्रूचा
बरसून गालावर
कधी पुसटला कळलेच नाही
पुन्हा न येण्यासाठी

एक थेंब
मनातील माणुसकीचा
भुकेल्याला अन्न देऊन
संपला कधी कळलेच नाही
पुन्हा न येण्यासाठी

एक थेंब
आपल्या मैत्रीचा
आनंद साजरा करून
हरवला कधी कळलेच नाही
पुन्हा न येण्यासाठी

थेंबांची वाट पाहून
कोरडी झाली सृष्टी

आशा वाटते मनाला नक्कीच
पुन्हा उजळून येईल दिव्यदृष्टी.