एक सोन्याचा पिंजरा
भाग 4
मागील भागात आपण पाहिले,अक्षय आणि पिंटो भेटल्यावर सगळे सांगायचे त्याने कबूल केले. शरद पवनकुमार केसच्या मागावर होताच. हे सगळे घडत असताना राजेंद्रकुमार भेटायला तयार असल्याचा फोन आला. आता पाहूया पुढे.
सुधांशूने फोन केला आणि माझी झोप उडाली. अचानक ह्या बातमीत रस वाटू लागला. तरीही मी ऑफिसात काहीच सांगितले नाही. ही गोष्ट मला गुप्त ठेवायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचे होते. अलार्म सेट करून मी झोपलो.
शरद घरी चालला असताना अचानक फोन आला,"इन्स्पेक्टर,पवनकुमार नेहमी एका ठिकाणी जात असे. त्यांना तिथे मी अनेकदा पाहिले आहे."
शरद सावध झाला,"तू कोण आहेस? माझा वैयक्तिक नंबर कसा मिळाला?"
पलीकडून ती व्यक्ती म्हणाली,"ते महत्वाचे नाही. आणखी माहिती फोनवर देऊ शकत नाही. पत्ता मॅसेज करतो..त्यावर उद्या सकाळी भेटू."
शरद बोलेपर्यंत फोन कट झाला.
मी सकाळी लवकर उठलो. अक्षय उठ,तुला आज काहीतरी वेगळे ऐकायला मिळणार आहे. स्वतः ला असे बजावत पटापट तयारी करत असताना सुधांशूने फोन केला,"मी सांगतो तो पत्ता लिहून घे. तिथपर्यंत टॅक्सीने ये. तुझा पाठलाग होणार नाही याची काळजी घे."
सुधांशूने फोन ठेवून दिला.इतक्या सूचना का देत असेल?डोक्यात विचारांचा भुंगा ठेवून मी कॅब बुक केली. बदलापूरकडे जायचे होते. मी जय्यत तयारीने निघालो.एवढ्यात शरदने मॅसेज करून एकाला भेटायला जातोय असे कळवले.
मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. सुधांशू माझी वाट पहात उभा होता. कॅब गेल्याची खात्री करून तो जवळ आला. त्यानंतर त्याने इशारा करताच एक गाडी आली. आम्ही आत बसलो. गाडी आता शहराबाहेर पडली.
ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात गाडी चालली होती. तब्बल दोन तास प्रवास केल्यावर एका ठिकाणी गाडी थांबली. गाडीवाला तिथेच थांबला आणि आम्ही पायी निघालो. अर्धा तास चालल्यावर ग्रामीण निसर्गोपचार केंद्र अशी पाटी दिसली.
आश्चर्याने मी पहात असतानाच समोरून एक पन्नाशीच्या आसपास असलेला वेल मेन्टेन,प्रचंड देखणा असा पुरुष चालत आला. मी एक क्षण त्याच्याकडे पहातच राहिलो.
तेवढ्यात तो म्हणाला,"सुधा,यांना आत घेऊन ये."
त्या आवाजाने मी भानावर आलो. आत गेल्यावर एका छोट्या आटोपशीर घरात बसलो.
त्या आवाजाने मी भानावर आलो. आत गेल्यावर एका छोट्या आटोपशीर घरात बसलो.
माझ्यासमोर तो माणूस बसला आणि म्हणाला,"मी राजेंद्रकुमार!"
माझ्या तोंडून अचानक निघून गेले,"हँडसम?"
हे ऐकताच तो म्हणाला,"नेमके हेच कौतुकाचे शब्द एका हुशार,वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाला कुठे घेऊन गेले ते सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही."
मी हसत म्हणालो,"पण तुम्ही अचानक गायब कसे झालात?ती बातमी खरी होती का? तुम्हाला इथे कोणी आणले?"
तो हसू लागला,"म्हणजे पंचवीस वर्षे झाली तरी पत्रकार बदलले नाहीत.पिंटो असाच होता.माहिती आणि बातमीचा भुकेला."
मी ओशाळून गप्प बसलो.
राजेंद्रकुमार पुढे बोलू लागला,माझे बालपण एका मध्यमवर्गीय घरात गेले. तरीही बालपणापसूनच मला माझ्या देखण्या रुपाची जाणीव होती. त्यामुळे मी कायम आकर्षण बिंदू असे. त्यात बुद्धिमत्तासुद्धा देवाने भरभरून दिलेली. त्यामुळे कायम माझे आई ,बाबा,शिक्षक आणि भावंडे कायम कौतुक करत असत.
दहावी,बारावी टॉप केल्यावर मला वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला. माझे व्यक्तिमतत्व आणि बोलक्या स्वभावामुळे मला मित्र मैत्रिणी भरपूर मिळाल्या. कॉलेज फंक्शन आणि इतर कार्यक्रम ह्यात मला लोकप्रियता मिळत होती. त्यामुळे मला त्याचे आकर्षण वाटू लागले.
पहिल्या तीनही वर्षात मी सगळे सांभाळून अभ्यास करत होतो. अंतिम वर्षाला असताना ए.जे.स्टुडिओमार्फत टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करण्यात आली.
माझ्या एका मित्राने जाहिरात मला आणून दाखवली,"महेश,तू यात भाग घे. जिंकलास तर थेट नायक व्हायची संधी मिळेल."
महेश!माझे खरे नाव. आज ते फक्त ह्या वैद्यकीय डिग्रीच्या कागदावर आहे. तर मलासुद्धा त्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे वाटत होते. मी फॉर्म भरला बरोबर माझे काही फोटो पाठवले.
त्यानंतर अभ्यास,कॉलेज ह्या रूटीन मध्ये मी विसरून गेलो. अंतिम वर्षाची परीक्षा झाली आणि मला एक पत्र मिळाले. माझी ए.जे.स्टुडिओच्या स्पर्धेत निवड झाली होती.
"मग तुम्ही स्पर्धेला गेलात?"मी विचारले.
तसा राजेंद्रकुमार हसला,"आता पुढचे दोन तास पेशंट आहेत. ते झाल्यावर बोलूया का? सुधा तोवर जेवण वगैरे करून घ्या."
मी त्यानंतर दोन तास ते निसर्गोपचार केंद्र फिरून पाहिले,तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला. थोडी विश्रांती घेतल्यावर मला राजेंद्रकुमार यांनी बोलावले.
मी म्हणालो,"पुढे काय झाले? तुम्ही स्पर्धेला गेलात का?"
ते पुढे बोलू लागले,"मी ते पत्र माझ्या काही मित्रांना दाखवले."
माझ्या दोन जवळच्या मित्रांनी मला सल्ला दिला,"महेश,चित्रपट व्यवसाय बे भरवशाचा आहे.तिथे गेल्यावर तुला परत मागे येता येईल का? तू आला वैद्यकीय व्यवसाय करावा."
परंतु मला प्रसिध्दी आणि पैसा दिसत होता. माझ्या आई वडिलांनीदेखील तोच सल्ला दिला. तरीही कोणाचे काहीच न ऐकता मी मायानगरी मुंबई गाठली.
तिथे पोहोचल्यावर मला ए.जे स्टुडीओमध्ये भेटलेली पहिली व्यक्ती होती भूषणकुमार. त्यावेळी तो स्टार होता. मी सगळी प्रक्रिया झाल्यावर आत गेलो.
त्याने मला विचारले,"डॉक्टर आहेस,मग इथे कशाला आलास?"
मी टेचात उत्तर दिले,"जगप्रसिद्ध व्हायला."
त्यावर तो फक्त हसला आणि निघून गेला. त्यानंतर मला आत आल्यावर मला जाणीव झाली. देखणा चेहरा एवढेच भांडवल इथे उपयोगी नाही. ऑडिशन आलेले अनेक चेहरे माझ्याइतके तर काही त्याहून देखणे होते.
मी टेचात उत्तर दिले,"जगप्रसिद्ध व्हायला."
त्यावर तो फक्त हसला आणि निघून गेला. त्यानंतर मला आत आल्यावर मला जाणीव झाली. देखणा चेहरा एवढेच भांडवल इथे उपयोगी नाही. ऑडिशन आलेले अनेक चेहरे माझ्याइतके तर काही त्याहून देखणे होते.
आम्हाला रहायची व्यवस्था सांगण्यात आली. तिथे गेल्यावर मला आजन्म सोबत करणारा मित्र मिळाला. जो आजही माझ्यासोबत आहे.
मी म्हणालो,"म्हणजे सुधांशू आणि तुम्ही तिथे भेटलात तर?"
"हो,माझ्या चेहऱ्याला पहिला रंग लावणारा हाच." एवढे बोलून राजेंद्रकुमार थांबला.
तोवर संध्याकाळ व्हायला आली होती.
सुधांशू म्हणाला,"आता निघायला हवे.अक्षय,तुला दर दोन दिवसांनी इथे येऊन सगळे ऐकावे लागेल. शिवाय हे सगळ गुप्त रहायला हव."
आम्ही बाहेर निघालो गाडी पुन्हा शहराच्या दिशेने धावू लागली. इकडे शरदसुद्धा फोन करणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेला. त्याने समोर पाहिले. एक किन्नर तिथे बसलेला होता.
शरदला त्याने हात करून बोलावले. शरद येऊन बसल्यावर तो म्हणाला,"मी सकीना.मीच केलेला फोन."
शरद म्हणाला,"काय सांगायचे आहे? तू कुठे पाहिले आहेस पवनला?"
सकिना म्हणाली,"सर,मायानगरी मुंबईत सगळ्यात मोठा व्यापार आहे देहाचा. तुम्हाला इथे चालणारे गुप्त स्ट्रीपर क्लब आहेत. तिथेच मी अनेकदा त्याला पाहिले आहे. येताना जाताना त्याच्याबरोबर वेगळे बॉडीगार्ड असत."
शरद म्हणाला,"मला पत्ता दे."
सकिनाने माहिती दिली आणि निघून गेली.
शरदने लगेच मला फोन लावला,"अक्षय ऐक मला एक माहिती मिळाली आहे. उद्या त्या ठिकाणी जायचे आहे."
मी उत्तर दिले ठीक आहे. तेवढ्यात पिंटोच्या सेक्रेटरीकडून फोन आला,"अक्षय उद्या आपण एका कार्यक्रमात तू पिंटोचे आत्मचरित्र लिहिणार हे जाहीर करू."
मी फोन ठेवला आणि शांत झोपलो.
उद्या नेमके काय घडेल? पवन बाबत माहिती मिळेल का?ग्लॅमर आणि पैसा प्राप्त करण्यासाठी राजेंद्र उर्फ महेशला काय तडजोडी कराव्या लागतील.
वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा
एक सोन्याचा पिंजरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा