Login

नव्याने ओळख... या नात्याची ! भाग २

एका आई आणि मुलीच्या नात्याची नव्याने झालेली ओळख...
एक दिवस अन्वी ची शाळेतून तक्रार आली.... तिचा अभ्यास थोडा ढासळलेला होता.. . निहारिकाने तिला काही न बोलता तिच्या पुढ्यात बसली....

“आई, ओरडणार नाहीस?” अन्वी ने गंभीर स्वरात विचारले..

“नाही. फक्त एवढं सांग, काय झालंय?” निहारिक आणि शांत शब्दात उत्तर दिले...

अन्वीचं डोकं झुकलं.

“मला सगळं जमेल असं वाटत नव्हतं. पण मी प्रयत्न करतेय... कधी कधी ताण सहन होत नाही....” अन्वी ने मन मोकळे केले...

निहारिकाने तिला घट्ट मिठी मारली....

“तू यशस्वी होणारच, पण स्वतःवर प्रेम करत करत... हे विसरू नकोस... ” आईने प्रेमाने कुरवळत तिचे मन शांत केले...

बारावीचा निकाल आला...  अन्वीने अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळवले... . तिची इंग्लिश लिटरेचरमध्ये अॅडमिशन झाली... पहिल्या दिवशी कॉलेजला जाताना तिने निहारिकाच्या पिशवीत एक लिफाफा ठेवला....

त्यात लिहिलं होतं

"आई,  आज तुझ्यामुळे मला जीवनाचा खरा अर्थ समजला... तू माझ्या जीवनातली ती एकमेव व्यक्ती आहेस जिने मला समजून घेतलं....  मला घडवलं... . या प्रवासातले सगळे शब्द तूच आहेस..."

निहारिकाच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते अश्रू होते समाधानाचे, अभिमानाचे....


पाच वर्षांनी...

अन्वी आता एक प्रसिद्ध ब्लॉगर होती... तिच्या कथांमध्ये एक पात्र कायम असायचं "आई"...

एका मुलाखतीत तिला विचारलं, “तुझ्या लिखाणाचा प्रेरणास्त्रोत कोण?”

अन्वी हसली.. . “माझी आई... तिनं मला लेखिका बनण्याचं स्वप्न दिलं आणि समजून घेण्याचं शिकवलं... ”


आई आणि मुलगी यांचं नातं हे रोजच्या संवादात फुलतं... ते एका दिवसात घडत नाही... पण 'ऐकणं' आणि 'समजून घेणं' ही खरी किमया असते... ही कथा म्हणजे केवळ एका आई-मुलीची गोष्ट नाही, तर प्रत्येक आईच्या डोळ्यांत झळकणारी ओळख, आणि प्रत्येक मुलीच्या मनात लपलेली शांत कृतज्ञता आहे...


रविवारची सकाळ. अन्वी ला आज शहरातल्या एका कार्यक्रमासाठी बोलावली होती...  "युवा लेखिकांचं सन्मान समारंभ".... अन्वी आपल्या आईला त्या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत घेऊन गेली होती... निहारिका मागच्या रांगेत बसली होती....  मंचावर येताना अन्वी थोडी थरथरली. पण तिचं भाषण आईसाठी होतं म्हणून मन आत्मविश्वासाने भरलेल होत...

" तुम्ही लेखन करण्याचा विचार कसा केला ? तुमच्या या प्रसिद्धीचं श्रेय तुम्हीच कोणाला देणार" समारंभात एक प्रश्न न विचारला गेला...
“ अनविणे एक नजर त्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले आणि खोल श्वास घेत आपल्या आईवर नजर फिरवली...  निहारिका उत्सुकतेने आपल्या मुलीकडे पाहत होती... अन्वी ने ओठांवर गोड स्माईल घेऊन आपल्या मुखातून उच्चारले... माझी आई....

ती माझी पहिली वाचक होती, माझा आरसा होती, आणि... माझी सावली होती...”

अन्वी ने दिलेले उत्तर ऐकून निहारिकाचे डोळे भरले.... तिला आठवलं... जेव्हा अन्वी लहान होती तेव्हा तिच्या स्लीपरवर आईचा पदर चुकून अडकायचा....  अन्वी बघून हसायची...

तेव्हा पासून निहारिकाचं वाक्य ठरलेलं होतं "आईची सावली आहेस तू... "


त्या सायंकाळी अन्वीने आपल्या आईसाठी एक गिफ्ट आणले होते.... सोन्याचं पेन आणि तिच्या जुन्या डायरीचं छापील पुस्तक.....

पुस्तकाचं नाव होतं—"माझी सगळी स्वप्नं – एका आईच्या आठवणी".

आणि लेखक म्हणून नाव होतं. " निहारिका शिंदे. "

"हे काय गं?" निहारिका ने ते पुस्तक आपल्या हातात घेतलं... ती चकित होऊन त्या पुस्तकांकडे पाहू लागली...

"तुझ्या डायरीतली सगळी पानं मी एकत्र केली... तू फक्त घर चालवलंस नाहीस, तू जग अनुभवलंस, शब्दांत बांधलंस... फक्त एक आईच असं करू शकते... " अन्वी कौतुकाने आपल्या आईकडे पाहून बोलू लागते...

" अग पण हे काय आहे ? " निहारिका अजूनही आश्चर्याने आपल्या हातात असलेल्या पुस्तका कडे पाहून तिला विचारते...