Login

एका तरुणाची प्रेमकथा

एका ध्येयवेड्या तरुण युवकाची प्रेमकथा..!
एका मध्यमवर्गीय तरुणाची प्रेम कथा


श्रेणी:- प्रेम ( शब्दसंख्या १०००)

कथेचे शिर्षक:- जगावेगळे प्रेम !



कथेतील पात्र
तरुणी :- माधवी
तरुण :- कुशांत 
आजी :- कुशांतची आजी




दहावीची बोर्डाची परीक्षा होऊन निकाल हाती आला.  कुशांत एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस मध्ये सर्व कागदपत्र व दहावीचा निकाल घेऊन एकटाच एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला जातो.

सकाळी नऊ वाजताच रांगेत उभा असतो. ती बेरोजगारांची रांग पाहुन मनात त्याच्या निराशेचा व आशेचा खेळ चालु होता. 

आता दहावी पास झाल्यावर पुढे जीवनात काय करावे. अकरावीत प्रवेश घेऊन काॅलेज करावे की, कुठेही जाॅब करावा.

इतक्यात त्याची नजर माधवीवर पडते. माधवी मध्यम बांध्याची वर्ण गोरा अठरा ते ऐकोणवीस वर्षाची मुलगी होती.
पाहायला सुंदर, केस कपाळावर आलेले कुरळे असलेले,लांब वेणी घातलेली ,स्काय ब्लु सलवार कमिज अंगात घातलेली अशी मुलगी..! कुशांतच्या नजरेत भरते. 

माधवी थोडी हडबडलेली असते.ती कुशांत जवळ येते," एक्सक्युज मी, मला जरा तुम्ही थोडी माहिती द्याल का ..? प्लिज..!"

कुशांत, " धीर व थोडा आपलेपणा दाखवत..! 
तुम्ही जरा घाबरलेल्या दिसता, 
कशाची माहिती पाहिजे तुम्हाला, 
जरा शांतपणे मोकळा श्वास घ्या ,हे घ्या पाणी ..!




माधवी," अहो.! मला की नाही , एम्प्लॉयमेंट कार्ड काढायचे आहे ,मी सगळेच कागदपत्र सोबत आणले आहे. मला अकरा वाजता जाॅबवर पण जायचे आहे. "

कुशांत, " ओके"

कुशांत," हे बघा, एवढ्या लवकर एम्प्लॉयमेंट कार्ड बनत नाही. आता दहा वाजता हे ऑफिस उघडेल ,  पुढे तुमची लेडीज लोकांची रांग आहे.तिथे रांगेत लागा आणि ती खिडकी दिसते ना..! 
त्या झाडाखाली .!
त्या इमारतीत बघा.!
तिथे रांगेत लागुन एक फार्म घ्यायचा आणि त्यात आपली संपूर्ण माहिती भरायची..!"

माधवी," ओके ,ओके !"

"आपण मला एवढी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.!"

कुशांत, " अहो एवढ्यातच माझे धन्यवाद नका मानु नका , अजुन खुप काही काम बाकी आहे."





माधवी," म्हणजे काय..?"
कुशांत," अहो..! म्हणजे काय !

कुशांत," अहो तो फार्म भरल्यावर तुम्हाला एक ब्राऊन रंगाचा एक जाडा लिफाफा मिळेल त्यात ही सर्व झेरॉक्स प्रती ...सही शिक्क्या निशी टाकुन तुम्हाला अजुन दुसरीकडे सबमिट करावे लागेल. तेव्हा कुठे मग संपूर्ण माहिती दिल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड बनेल.!"

माधवी," ओके ओके, खुप खुप  आभार आपले..!"

थोड्या वेळातच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे ऑफिस उघडते आणि कामाला सुरुवात होते. सांगितल्याप्रमाणे मग ती मुलगी म्हणजेच माधवी कार्ड काढण्यासंबंधीचे सर्व सोपस्कार पुर्ण करते. आणि कुशांत पण आपले कार्ड काढुन घेतो.

कार्ड काढुन झाल्यावर .!

माधवीची नजर भिरभिरत कुशांतला शोधत असते...!

"कुठे बरे गेले असावे मला त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे." स्वगत.!

आता जाॅबला पण जाता येणार नाही..! उशिर झाला.!

कुशांतची नजर एकदम माधवीवर जाते, तो तिला पाहतो., त्याला ती  शोधत आहे, हे दिसून येते.!
तो तिथुन पटकन उठतो..!

कुशांत थोडा जवळच जात," अहो,अहो..! "

माधवी चेहऱ्यावर हास्य आणत व कुशांत कडे बघत," अरे तुम्ही कुठे होता ,मी केव्हाची इथे शोधतेय तुम्हाला..!"



का...?"

अहो काय का..?"

मला तुमचे आभार मानायचे होते...!"

निवांत, " कशाबद्दल? "

माधवी," कशाबद्दल काय.? तुम्ही मला किती छान मार्गदर्शन केले, तेव्हा कुठे हे एम्प्लॉयमेंट कार्ड हाती मिळाले"

कुशांत, " मग लागली का नोकरी..!"

               दोघेही हसतात..!

माधवी," अहो नोकरी नाही पण कार्ड बनण्याचे समाधान तर झाले ना..!"

     "घाईगडबडीत मी तुमचे नावच विचारायचे विसरले, काय नाव तुमचे...?"
कुशांत, " माझे नाव कुशांत..!

आणि तुमचे..?

माधवी, "माझे , माधवी.!"

छान आहे" 

कुशांत, " काय ?"

माधवी," नाव..!"

कुशांत, " ओके"

कुशांत, " चला चहा घेऊ या, बराच  वेळ झाला.!" 


"नको ,नको चहा नको..!" माधवी.


कुशांत, " चला ठीक आहे,तुमची ओळख झाली ..! 

छान वाटलं बोलुन.!

तुम्ही कुठे असता ,म्हणजे तुमचे घर कुठे आहे..?"

माधवी, " मी आशिर्वाद नगरला राहते, माझी आई शाळेत चपराशी आहे, मी दहावी झाल्यावर एका टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये इन्स्ट्रक्टरचे काम करते. माझे वडील माझ्या लहानपणीच मरण पावले. मी घरी आईला मदत करते "

मला पुढील शिक्षण घ्यायचे आहे, मला एक छोटा भाऊ आहे त्याचेही शिक्षण पुर्ण करायचे आहे. शिक्षण करुन मोठा जाॅब शोधत आहे. 

" तुम्ही कुठे राहता..?"

कुशांत, " आश्चर्याने.! अरे वाह.! मी पण तर तिकडेच राहतो. माझी आई नाही ,बाबा व माझी नानी आहे . तिच माझी आई आहे, म्हातारी आहे पण माझी खुप काळजी घेते.



माधवी," चला आपण आता निघुया, पुन्हा कधी भेटू .! तुमची नि माझी आता ओळख झाली. पुन्हा भेटु तर निवांतपणे बोलु व एकमेकांना समजु..!" 

"हा घ्या माझा पत्ता आणि हे माझे टायपिंग इन्स्टिटय़ूट चे नाव आहे, यश टायपिंग इन्स्टिटय़ूट शारदा चौकात आहे. तिथे मी दिवसभर कामावर असते. गरज वाटल्यास या कोणी काही म्हणणार नाही.!" 

कुशांत, " बरं बरं येईल मी ,कधी वाटलेच तर चला निघुया.!"

दोघेही एकमेकांना पाठमोर्‍या दिशेने बघतात. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच प्रितीची कळी उमलेली असते. आणि आता एकमेकांपासून दुर जातांना,ताटातूट होते.

पुढे मग परत भेटीगाठी होतात. एकमेकांचे मन ते दोघे जाणुन घेतात. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध मनात रुजतात. आधी महिने दर महिने भेटायचे ते आठवड्यातुन भेटतात. ऐकमेकांच्या मनातील दु: ख व वेदना वाटुन घेतात. 

अशातच एक दिवस माधवी कुशांतच्या घरी तीन वर्षांनी एम्प्लॉयमेंट कार्ड रिनीव्ह करायचे असते म्हणून येते.

ती हाक मारते कुशांतच्या घरी दारात उभी राहुन, " कुशांत!  कुशांत!  कुशांत! " 

आत मधुन आवाज येत नाही, दार उघडे असते. ती आत मध्ये जाते ,बघते तर काय नानी खाटेवरून खाली पडलेली असते...!

ती खुप  जोरजोर्याने आरडाओरड करते पण कोणीच येत नाही. इतक्यात बाजुच्या घरुन एक काकु बाहेर येतात. 

काकु," काय झाले पोरी..?"

माधवी ," बघा ना काकु, नानी खाटेवरून पडल्या आणि घरी कुणीच नाही..!" 

काकु," अरे देवा.! मी आता काय करू, माझ्याही घरी कुणी नाही, बेटा तु यांना लवकर हाॅस्पीटल मध्ये घेऊन जा, मी कुशांत व त्याचे बाबा आले की सांगतो.

माधवी," बरं बरं काकु, मी लगेचच ऑटोरिक्षा आणते व घेऊन जाते यांना. तुम्ही कुशांत किंवा काका आले तर सांगा.!

कुशांत घरी नसतो ,त्याचे बाबा पण घरी नसतात.  बहुतेक ऑफिसला गेले असावे..!

माधवी मग सायकल घेऊन ताबडतोब चौकात जाते,आणि तिथुन लगेच ऑटोरिक्षा आणते. आणि मग नानीला दवाखान्यात नेते.  ताबडतोब डाॅक्टर नानीची तपासणी करतात. आणि मग सलाईन, ऑक्सिजन लावुन नानीला शुध्दीवर आणल्या जाते. 

डाॅक्टर माधवीचे कौतुक करतात, तिला शाब्बासकी देतात. आणि एक दिवस नानीला दवाखान्यात कायम ठेवायला सांगतात. 

माधवी थोडी विचार करते आणि डाॅक्टरांना व वार्डबाॅयला सांगुन ती कुशांतच्या घरी यायला निघते. कारण नानीला दवाखान्यात आणायला बराच वेळ झालेला असतो. व तिला घरी पण जायचे होते. आई वाट पाहत असेल. आणि कुशांतकडे जाऊन नानी बद्दल सांगणेही गरजेचे होते. म्हणूनच ती तातडीने दवाखान्यात निघते.

इकडे कुशांतच्या घरी कुशांत येतो. आणि तेवढ्यातच त्याचे अन्नाही येतात. नानीला खाटेवर नसलेले पाहुन आश्चर्य करतात. 
इतक्यात बाजुच्या काकु बाहेर येतात व सर्व हकिकत सांगतात.  
अन्ना तर डोक्याला हातच लावतात. आणि कुशांत तर रडायलाच लागतो.





दारात येताच तिला कुशांत व कुशांतचे वडिल दिसतात. 

माधवी थोडी घाबरलेली व भांबावलेली असते.

कुशांतचे वडिल," तु कोण आहे मुली."

माधवी तोंडातून शब्द काढणार इतक्यात..!

कुशांत, " अन्ना ही माझी मैत्रिण आहे."

कुशांत  माधवीला," माधवी कशी आहे  नानी, कोणत्या दवाखान्यात तिला नेले.? काय झाले तिला.? ती शुध्दीवर आली का..? सांग सांग..??? "


माधवी," रागावून ..! 

आधी मला बसु दे...!

नानी ठीक आहे...!

इतक्यात  बाजुच्या काकु तिथे ग्लास भर पाणी घेऊन येतात. 

काकु," घे ...बेटा पाणी पी, मी चहा ठेवते..!

अण्णा, कुशांत ...! 

ही मुलगी जर आज त्या वेळेस आली नसती तर नानी आज या जगात नसती ,आज जर का नानी जिवंत आहे तर या मुलीमुळे..! आणि फक्त या मुलीमुळे..!

अण्णाच्या व कुशांतच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहायला लागतात..! 

माधवी," अण्णा ,कुशांत  तुम्ही दोघेही असे मन हळवे करु नका आणि ताबडतोब त्या केअर इस्पितळात जा. नानीजवळ त्यांना तुमची गरज आहे."

आणि मी तुम्हा दोघांनाही एक जाब विचारते, " तुम्ही दोघेही त्या म्हातार्‍या नानीला एकटे असे बेवारस कोणाच्या भरोश्यावर सोडुन जाता. आज जर मी नसते तर काय झाले असते देव जाणे...!"


अण्णा," खरं आहे पोरी आज तुझ्यामुळेच नानी वाचली,  धन्य तु आणि ती माऊली जिच्या पोटी तु जन्म घेतला..!"

ताबडतोब  दोघेही इस्पितळात जायला निघतात. अन्ना त्या आधी घरात जातात, काही पैसे जवळ घेण्यासाठी.



इतक्यात..! पटकन कुशांत  माधवीचा हात हातात घेऊन आपल्या माथ्याला व डोळ्याला लावतो. 

माधवी आपल्या घरी जायला निघते.!