मुलं नेहमी आई-बाबांच्या नात्यातलं अंतर ओळखतात.... मुलं कितीही लहान असली तरी आपल्या घरामध्ये काय चालू आहे याचा थोडाफार अंदाजा हा त्यांनाही आलेला असतो... अर्णवही अपवाद नव्हता....
आता पुढे,
एका रात्री त्याने आपल्या आईला विचारलं...
“आई, बाबा नेहमी एवढे शांत का असतात ? तुला माझ्यासारखं गप्पा मारायला आवडतं, पण बाबा काही बोलतच नाही... माझ्या शाळेमध्ये असणाऱ्या बाकी च्या मुलांचे बाबा त्यांना घेण्यासाठी शाळेत येतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात , खेळतात पण माझे बाबा कधीच माझ्यासोबत गप्पा मारत नाही किंवा खेळत नाही असे का ? ”
आपल्याला लहान मुलाचं बोलणं ऐकून मायाच्या डोळ्यांत पाणी आलं.....
आपल्याला लहान मुलाचं बोलणं ऐकून मायाच्या डोळ्यांत पाणी आलं.....
“बाळा, बाबा थकलेले असतात म्हणून…” ती हसून म्हणाली, पण आतून तिला जाणवलं की मुलगाही त्या दुराव्याचा बळी ठरत होता...... जी गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवत होती आता तिच्या मुलालाही ती जाणवत आहे...
असेच दिवस पुढे सरकत होते आणि एक दिवस रविवारची सकाळ उगवली..... माया ने हॉलमध्ये बसलेले आता दोघांकडे एक नजर फिरवली आणि उत्साहाने म्हणाली,
“आज आपण तिघं मिळून बाहेर जेवायला जाऊ या.... किती दिवस झालं आपण असं कुठे गेलो नाही... ”
शेखर पेपर वाचत होता.... त्याचे पूर्ण लक्षात येते पेपर वाचण्यामध्ये होते... त्याच्या कानावर मायाचा आवाज ऐकू आला...
“आज माझी क्रिकेट मॅच आहे ऑफिस फ्रेंड्ससोबत... रात्री उशीर होईल.... ”
“ तुझ्याकडे घरासाठी वेळच नसतो का ? मी आणि अर्णवही तुझे फ्रेंड्स आहोत की नाही ? ” माया ने अर्णव समोर आहे म्हणून आवाजात थोडी शांतता ठेवली होती पण मनात मात्र तिच्या उदासी पसरली होती...
“अगं, नेहमी तक्रारच करतेस ! मला थोडा रिलॅक्स होऊ दे.... ” शेखर मात्र आपल्याच विश्वात होता त्यामुळे त्याचं लक्ष बाजूला असलेले अर्णव कडे गेले नाही...
“ तक्रार नाही शेखर… फक्त एवढंच वाटतं की, आपण घरात असताना खरंच एकत्र आहोत का ? सुट्टीच्या दिवशी आपण सगळे एकत्र घरात बसलेलो तरी असतो पण एकमेकांसोबत असतो का ? ” माया उदास मनाने त्याच्याकडे पाहून त्याला सांगण्याचा प्रयत्न तर करत होती पण शेखरला मात्र तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही आणि तो तसाच वैतागून तिकडून निघून गेला....
अर्णव शांतपणे आपल्या बाबांकडे त्यांना जाताना पाहू लागला....
" जाऊदे बाळा... आज बाबांना बाहेर जायचे होते ना पण आपण नंतर नक्की एकत्र येऊन फिरायला जाऊया... " मायाने प्रेमाने अर्णवची समजूत घालण्याचा प्रयत्न केला... अर्णव ही तिचं बोलणं ऐकून शांत झाला...
त्या दिवसाची चिडचिड मात्र त्या घरामध्ये पूर्णपणे पसरली होती... माया उदास झाली होती त्यामुळे तिने शेखर सोबत बोलणं सोडून दिले.... तिला असे वाटले की, जर आपण समोरून त्याच्यासोबत बोललो नाही, त्याला राग दाखवला, तर कदाचित त्याची आपली समजूत काढण्यासाठी, आपल्याला प्रेमाने बनवण्यासाठी तरी येईल.... पण त्याचा काही उपयोग झाला नाही.... शेखर ही त्या दिवसापासून माया ला वैतागलेला असल्यामुळे त्यानेही तिच्यासोबत बोलणं सोडून दिले... दोघेही एकमेकांसोबत न बोलताच आपापली काम करत होती त्यामुळे घराचे वातावरण पूर्णपणे शांत झाले होते.... घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची उदासीनता पसरली होती....
.
..
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा