Login

नात्यातील अंतर... भाग ३ ( अंतिम भाग )

एकाच घरात असून ही कालांतराने नवरा बायकोच्या नात्यात अंतर निर्माण होऊ लागते...
दोघेही एकमेकांसोबत न बोलताच आपापली काम करत होती त्यामुळे घराचे वातावरण पूर्णपणे शांत झाले होते.... घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची उदासीनता पसरली होती....

पुढे काही दिवस असेच गेले आणि सोसायटीत गणपती उत्सव आला....  सोसायटीमध्ये गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळे फंक्शन अरेंज करण्यात आले.... या फंक्शनमध्ये मायाने अगदी उत्साहाने भाग घेतला.... माया मुलांना नृत्य शिकवू लागली.... नाटकात मदत करू लागली.... तिला तिथे हव्या-हव्याशा वाटणाऱ्या नजरा आणि कौतुक मिळालं.... सोसायटीमध्ये राहणारे सगळेजण की चेक कौतुक करत होते.... तिच्या नृत्य कलेचे गोडवे गात होते....

शेजारीण सीमा म्हणाली,

“माया, तू खूप क्रिएटिव्ह आहेस...  तुझे मिस्टर तुझे खूप कौतुक करत असतील ना ?”

तिचं बोलणं ऐकून मायाच्या डोळ्यात पाणी आलं.... ती हसत म्हणाली

“त्यांना वेळच कुठे असतो गं… त्यांच्या ऑफिसमध्ये कामच इतके असते की त्यांना घरी फारसा वेळ मिळत नाही...

एक संध्याकाळी ऑफिसहून परतताना शेखरला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला....  लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.... हॉस्पिटलमध्ये दिल्यावर तिकडे त्याची विचारपूस करण्यात आली आणि मायाच्या नंबर वर फोन करण्यात आला... मायाने फोन उचलला , जेव्हा तिला ही बातमी समजली तेव्हा मात्र तिचे हात थरथरूडू लागले... मन पूर्णपणे भरून आले.... तिने मागचा पुढचा कसलाही विचार न करता अर्णवचा हा धरला, घराची चावी आपल्या सोबत घेतली आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघाली....

माया जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोचली तेव्हा एका रूममध्ये समोरच शेखर बेडवर बसलेला होता... त्याच्या जवळ जाऊन तिने आधी त्याची विचारपूस केली.... तेवढ्यात त्याला चेक करत असलेले डॉक्टर तिकडे आले....

मायाला आपल्यासमोर पाहून डॉक्टर म्हणाले,

“ काळजीचं कारण नाही... पण प्रचंड ताण, एकटेपणा आणि तणावामुळे शरीर थकून गेलं आहे.... सध्या त्यांना आपल्या माणसांची गरज आहे... घरातल्यांनी मिळून त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे....  ”

डॉक्टरांचे ते कडू बोल मायाच्या मनाला लागले ,  “ ताण, एकटेपणा… हा तर आपला घरातलाच दुरावा आहे ! ” तिचे मन शेखर कडे पाहत विचार करू लागले...

रुग्णालयाच्या  बेडवर शेखर ही शांतपणे बसला होता.... डॉक्टरांच्या त्या बोलण्याला काय उत्तर द्यावे हे त्यालाही तेव्हा समजत नव्हते , पण माया मनामध्ये काय विचार करत असेल याचा थोडाफार अंदाज त्याला तेव्हा आला.... माया त्याच्या शेजारी बसली होती... डॉक्टर दुसऱ्या रुग्णांना बघण्यासाठी त्या रूममधून थोडे बाहेरच्या बाजूला निघून गेले असताना तिने त्याचा हात धरला.....

“ शेखर, आपण एवढं का दूर गेलो आहोत ? मला तुझ्याशी बोलायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत.... तू जेव्हा रात्री ऑफिसमधून परत येतो,  तेव्हा दिनभरात माझ्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी तुला सांगावसं वाटतात... तू दिवसभर ऑफिस मध्ये काय केले हे तुला विचारावेसे वाटते.... तुझ्यासोबत मोकळा वेळ घालवावासा वाटतो...  अर्णवला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे.... त्याच्या इतर मित्रान प्रमाणे त्याच्या वडिलांसोबत खेळायचे आहे,  फिरायला जायचं आहे ,पण तू कायम दूर राहतोस....” माया काकुळीने त्याच्याकडे पाहत उदास स्वरात बोलत होती....

शेखरच्या डोळ्यात पाणी आलं.... तिच्या डोळ्यांमध्ये असलेल्या त्या अश्रूंमध्ये त्याला आपल्यासाठी असलेले प्रेम जाणवले...

“ माया, मला वाटायचं मी काम करून तुम्हाला सुख देतोय... पण खरं सुख म्हणजे तुमच्यासोबत वेळ घालवणं आहे, हे समजलंच नाही ग..... ” शेखर ही तिच्याकडे पाहून यावेळी भावूक झाला...

दोघं खूप वेळ तिकडे बसून एकमेकांसोबत बोलत राहिले....  कित्येक वर्षांचा दुरावा त्या रात्री शब्दांत मोकळा झाला.... आपल्या आई वडिलांना एकमेकांसोबत शांतपणे गप्पा मारताना पाहून अर्णवच्याही डोळ्यांमध्ये चमक आली....

त्या दिवसानंतर मात्र शेखर आणि त्याच्या वागण्यामध्ये  बदल दिसू लागला....

“ आता जेवताना मोबाईल बाजूला ठेवू... ” रात्री एकत्र जेवताना शेखरने स्वतःच फर्मान जाहीर केले... त्या दिवसापासून रात्री एकत्र जेवत असताना ते सगळे एकमेकांसोबत चर्चा करत होते मोबाईल फोनकडे कोणीही लक्ष देत नव्हता...

“ आठवड्यातून एक दिवस फक्त आपल्या तिघांसाठी.... ” मायाने प्रेमाने शेखर कडे मागणी केली.... शेखर ने ही तिच्या या मागणीला लगेच होकार दिला... ते ऐकून आपल्या छोट्या अर्णवला ही खूप आनंद झाला तोही लगेच उड्या मारत आपल्या वडिलांच्या मांडीवर येऊन बसला आणि चक्क यावेळी वडिलांनी त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर गोड पापा दिला....

अर्णव आनंदाने म्हणाला,
“ येस! बाबा आता तुम्ही माझ्यासोबत बॅडमिंटन ही खेळणार ! जसे माझ्या मित्रांचे वडील त्यांच्यासोबत खेळतात अगदी तसे....

" हो, बाळा आज पासून तुझा बाबा सुट्टी असल्यावर तुझ्यासोबत तुझ्या आवडीचे सगळे गेम खेळणार... आपण असे करू आपल्या मम्मीलाही गेम खेळण्यासाठी सोबत घेऊ... " शेखर प्रेमाने एक नजर अर्णव कडे पाहून मायाला हलकाच डोळा मारत बोलला... त्याच्या त्या छोट्याशा कृतीनेही मायाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.....

घरातले हरवून गेलेले आनंदाचे वातावरण आता हळूहळू परत यायला लागले... घराला खरे घरपण आले...

जीवनात नाती मोडत नाहीत.... फक्त शब्दांचा पूल तुटतो.... थोडा वेळ, थोडी कदर आणि काही मोकळे संवाद इतकंच पुरेसं असतं......

शेखर आणि मायाचं नातंही आता नव्यानं उजळून निघालं..... एकमेकांच्या जीवनाचे खरे साथीदार असूनही काही क्षणासाठी ते दुरावले होते परंतु आता मनामध्ये एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची आपल्या एकटेपणाची जाणीव झाली तसा तो दुरावा कमी झाला आणि पुन्हा ते एकमेकांच्या खूपच जवळ आले.....

.