भाग ३
रात्री सर्वजणी जेवण उरकून उर्वीच्या आईशी बोलून आपआपल्या रूम मध्ये गेल्या.उर्वीचे आजी-आजोबा एका नातेवाईकांकडे गेले असल्यामुळे ते उद्याच तिची आणि त्यांची भेट होणार होती त्यामुळे तिने सर्वाना उद्याच आजी-आजोबांच भेट होईल असे बोलून ती आईचा निरोप घेऊन आपल्या रूम मध्ये निघून आली.आई पण ती थकून आली असल्यामुळे उद्याच बोलूया ठरवून आपल्या रूम मध्ये गेली.
तिच्या खोलीत ती एकटक बाहेरील दृश्य आपल्या डोळ्यात साठवत होती खिडकीतून येणारा गार वारा तिच्या केसांशी खेळत होता.खिशातला तो कागद तिने पुन्हा उघडला.
त्यावरील त्या खुणा काय सांगत आहे याचा ती विचार करू लागली तेवढ्यात तिच्या डोळ्यात काही गवसल्यासारखे झाले आणि तिच्या चेहऱ्यावरीळ एक्सप्रेशन क्षणात कठोर झाले.“इतकं धाडस करून हा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवलं कोणी?” तिच्या मनात प्रश्न गुंजला.
“आणि सर्वात महत्त्वाचं शत्रू नक्की कोण?”
“आणि सर्वात महत्त्वाचं शत्रू नक्की कोण?”
तेवढ्यात दारावर हलकासा कोणाचीतरी थाप पडली.तिने लगबगीने तो कागद खिशात कोंबला आणि दार उघडायला गेली.
दार उघडून उर्वीने विचारलं,“उर्वी, आत येऊ का?”शुभ्राने हळू आवाजातच विचारले.
दार उघडून उर्वीने विचारलं,“उर्वी, आत येऊ का?”शुभ्राने हळू आवाजातच विचारले.
“काय गं! असा दबक्या आवाजात का बोलतेयस?”
शुभ्रा काहीतरी सांगणार तेवढ्यात खाली अंगणातून मोहिनीचा आवाज घुमला
“अगं, पटकन या! गावात आज जत्रा आहे म्हणे. चला, बाहेर जाऊया.”
“अगं, पटकन या! गावात आज जत्रा आहे म्हणे. चला, बाहेर जाऊया.”
क्षणात सगळ्या मैत्रिणी उत्साहाने अंगणात जमल्या. उर्वीही त्यांच्यासोबत बाहेर पडली. चौक रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेला होता. भजनांचे गजर, ढोल-ताश्यांचा आवाज, लहान मुलांच्या खेळांची धांदल सर्वत्र धामधूम होती.
पण या गोंधळात उर्वीचं मन कुठेतरी बेचैन झालं. गर्दीतून तिला सतत कोणीतरी आपल्यावर नजर लावून पाहतंय असं स्पष्ट जाणवत होतं.
अनिकाने लगेच तिच्याकडे वळून विचारलं
“उर्वी तुलाही वाटतंय का? कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवतोय.”
“उर्वी तुलाही वाटतंय का? कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवतोय.”
उर्वीने केवळ मान हलवली. बोलली काही नाही, पण तिचे डोळे सावधपणे चौफेर फिरत होते.
गर्दीतून हळूच बाजूला होत उर्वी एका जुन्या कोपऱ्यात पोहोचली. तिथेच ती थिजलीच. तिच्या समोर तो उभा होता उंच अंगयष्टी, काळसर चेहरा, दाढीने भरलेले गाल, आणि डोळ्यांत संशयाची तीव्र झलक.
तो थेट तिच्याकडे येऊ लागला. उर्वीचे हृदय क्षणभर जोराने धडधडले.
“तू उर्वी देशमुख?” त्याने थंड, धारदार आवाजात विचारलं.
उर्वीने सावधपणे मान डोलावली.
तो एक पाऊल जवळ येत हळू आवाजात बोलू लागला,“इथे सविस्तर बोलणं सुरक्षित नाही. उद्या रात्री बारा वाजेपर्यंत जुन्या किल्ल्यावर ये. नाहीतर… खूप उशीर होईल.”
त्याचा आवाज अंगावर काटा आणणारा होता. एवढं बोलून तो क्षणात गर्दीत मिसळून गायब झाला.
उर्वी अजूनही त्या गर्दीच्या कोपऱ्यात उभी होती. कानात अजूनही त्या अनोळखी व्यक्तीचा आवाज घुमत होता“उद्या रात्री बारा वाजेपर्यंत… जुन्या किल्ल्यावर ये…”
थोड्यावेळाने तिचा फोन हलकेच कंपन करू लागला. शुभ्राचा कॉल तिला आला होता.
“उर्वी, कुठे आहेस ग? आम्ही सगळ्या मोठ्या आकाश पाळण्यावर बसणार आहोत लवकर ये!”
“उर्वी, कुठे आहेस ग? आम्ही सगळ्या मोठ्या आकाश पाळण्यावर बसणार आहोत लवकर ये!”
उर्वीने खोल श्वास घेतला. चेहऱ्यावरची छाया क्षणात नाहीशी झाली. तिच्या डोळ्यांत आता एकच भाव स्पष्ट दिसत होता “जे काही असेल, मी सामोरी जाईन.”
तिने फोन खिशात ठेवला आणि गर्दीत परत मिसळली. मैत्रिणींच्या हसण्यामध्ये ती पण सामील झाली, पण तिचा मेंदू मात्र सतत त्या संदेशावरच अडकला होता. कोण असेल हा माणूस? शत्रू की कुणीतरी सावध करणारा?
घरी परतल्यावर आई तिच्याकडे बारीक नजरेने पाहत होती.उर्वीने सर्वाना अंगणात बसायला सांगत ती आपल्या आई जवळ आली.
तसे आई तिला म्हणाली “उर्वी, तुझा चेहरा काही वेगळाच दिसतं आहे. मी तुला जन्म दिला आहे त्यामुळे माझ्या पासून काही लपून देखील राहणार नाही. काय चाललंय?”
आईच्या डोळ्यांत प्रखरतेसोबत माया देखील होती.
उर्वी काही क्षण शांत राहिली. मग तिने ठाम आवाजात विचारलं,
“आई, खरं सांगा मला इथे बोलावण्यामागे कारण काय आहे? गावात नक्की काय सुरू आहे?”
उर्वी काही क्षण शांत राहिली. मग तिने ठाम आवाजात विचारलं,
“आई, खरं सांगा मला इथे बोलावण्यामागे कारण काय आहे? गावात नक्की काय सुरू आहे?”
आईने एक खोल श्वास घेतला. आणि तिच्या डोळ्यांत एक नजर पाहत ती म्हणाली
“उर्वी, हे फक्त गावाचं नाही. हे तुझ्या वडिलांच्या आणि तुझ्या भावाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. जे तुला उद्या किल्ल्यावर समजेल”
“उर्वी, हे फक्त गावाचं नाही. हे तुझ्या वडिलांच्या आणि तुझ्या भावाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. जे तुला उद्या किल्ल्यावर समजेल”
उर्वीच्या अंगावर काटा आला.मैत्रिणी अंगणात गप्पा मारत होत्या, पण तिचं मन आता फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित होतं उद्या रात्रीच तो किल्ला आणि तिथे दडलेलं गुपित.
दुसऱ्या दिवशी सकाळ. अंगणातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं. कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस उजाडला होता. तुळशीच्या कुंडीजवळ उभं राहून उर्वी शांतपणे आईकडे पाहत होती. आई काहीतरी विचारात होती.
तेवढ्यात घराच्या आतील खोलीतून काठीचा ठकठक आवाज ऐकू आला. दाराच्या चौकटीत उर्वीचे आजोबा उभे होते.
उंच, सरळसोट बांधा ,वयाच्या ओघात शरीर थोडं कृश झालं असलं तरी उभं राहण्याची त्यांची ढब अजूनही आर्मीच्या शिस्तीची साक्ष देत होती. पांढरेशुभ्र केस नीट विंचरलेले. भुवयांच्या खाली खोल बसलेले डोळे, पण त्यात अजूनही तीव्र चमक होती जणू एखाद्या रणांगणावर उभा असलेला सैनिक आपल्या पुढच्या चालीचा अंदाज घेतो तशी.
नाक-ओठांच्या रेषा कडक, चेहऱ्यावर अनुभवाने कोरलेली कठोरता, आणि त्याच वेळी मायेचं सूक्ष्म अस्तर. कपाळावरच्या आठ्या सांगत होत्या की आयुष्यभराचं कर्तव्य, लढाई आणि शिस्त त्यांनी जगलेली आहे.
हातात एक काळपट लाकडी काठी होती, पण ती आधारापेक्षा सवयीची जास्त वाटत होती. त्यांच्या पावलांचा आवाजही घरात एक वेगळीच दहशत आणि आदर पसरवत होता.
ते उंबरठ्यावर उभे राहून क्षणभर शांतपणे उर्वीकडे पाहत राहिले. त्या नजरेत प्रश्नही होते, काळजीही होती, आणि कुठेतरी खोलवर एक जाणिव“ही माझीच पोरी आहे, जिच्या रक्तात माझाच शिस्तीचा वारसा आहे.”हे सर्व मनोमन बोलून त्यांनी उर्वीला आवाज दिला.
“ऑफिसर! अजूनही सरळ उभी राहायची सवय लागलेले दिसत नाही वाटते,” आजोबांचा दमदार आवाज अंगणात घुमला.
उर्वी पटकन ताठ उभी राहिली. “सॉरी आजोबा”
ते खडसावून म्हणाले, “ऑफिसर कधीच ‘सॉरी’ म्हणायची वेळ आणत नाही. त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास असतो”
शुभ्रा, मोहिनी, अनिका हसू आवरू शकल्या नाहीत. पण आजोबांच्या नजरेतला कठोरपणा पाहून गप्प बसल्या.
तेवढ्यात आजी बाहेर आल्या. निळ्या रंगाची नऊवारी, हातात तुळशीची माळ, ओठांवर रामनाम.
“अहो, नेहमी इतके कडक बोलणे गरजेचे आहे का ?आणि तसेही आपली मुलगी रोज धावपळीत जगत असते इथे तरी थोडं मायेने बोला.”
“अहो, नेहमी इतके कडक बोलणे गरजेचे आहे का ?आणि तसेही आपली मुलगी रोज धावपळीत जगत असते इथे तरी थोडं मायेने बोला.”
आजीने उर्वीच्या डोक्यावर हात ठेवला. “कशी आहेस ग? चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. काही काळजी आहे का?”
उर्वीला डोळ्यांत पाणी आलं. “नाही गं आजी मी ठीक आहे.”
आजी कानाशी म्हणाल्या, “ठीक असल्याचं सांगणारी मुलं बहुतेक वेळा मनातून ठीक नसतात. पण बघ, आमच्या आशीर्वादाचं कवच तुझ्या भोवती सदैव आहे.”
तुमचे चालुद्या बोलून आजोबा मात्र अंगणात फेरफटका मारायला गेले. ती आजीच्या पाय पडून लगेच आजोबांच्या मागे गेली .
तसे आजोबा मागे न बघताच बोलले “या गावात काहीतरी वेगळं सुरू आहे. उर्वी, सावध राहा. आणि रात्री कुठेही एकटी बाहेर पडायची नाही.”
उर्वी दचकली. त्यांना काही कळलंय का?
तिला पुन्हा आठवला कालचा अनोळखी “उद्या रात्री… किल्ल्यावर ये.”
आजीच्या मायेच्या स्पर्शात, आजोबांच्या कठोर नजरेत उर्वी गोंधळली. पण मनाशी मात्र तिने ठरवल कि आज रात्री ती किल्ल्यावर जाणारच होती.
संध्याकाळचं धूसर वातावरण गावभर पसरलं होतं. आकाशात सूर्याची सोनेरी चादर गावाच्या भोवतालीच्या डोंगररांगा गडद सावल्यांनी झाकल्या गेल्या होत्या ते दृश्य खूपच सुंदर दिसत होते.
आजोबा नंतर काही न बोलता बाजूच्या काकांच्या घरी गेले होते.उर्वी अंगणात बसून आजोबांच्याच बोलण्याचा विचार करत होती. आजी दिव्यासमोर बसून रामरक्षा म्हणत होत्या, आणि आई देव्हाऱ्यातला दिवा लावत होती. घरभर शांती होती, पण उर्वीच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. आजोबांचे शब्द कानात घुमत होते “या गावात काहीतरी वेगळं सुरू आहे. सावध राहा.”
तिच्या मनात काल रात्रीची आठवण पुन्हा जिवंत झाली. त्या अनोळखी माणसाचे डोळे, त्याचा गूढ आवाज, आणि किल्ल्यावर येण्याचं निमंत्रण. अंगावर काटा आला. पण तिच्यातली जिज्ञासा आणि अंगभूत हट्ट दोन्ही तिला आवरत नव्हते.
काय होईल पुढे?उर्वी पोहचेल का किल्ल्यापर्यंत ?कोण असेल तो अनोळखी?
माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
उर्वी देशमुख - नायिका
अश्वेत-नायिकेचा भाऊ
कर्नल देशमुख -नायिकेचे वडील
ए.सी.पी. उदय राणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा