राहुल हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. त्याचं डोकं गरगरत होतं, पण पाय थांबत नव्हते. Receptionist ला विचारून तो थेट तिसऱ्या मजल्यावर General Ward मध्ये पोहोचला.
तिथं एका बेडवर, पांढऱ्या चादरीखाली शांत झोपलेली राधिका दिसली. चेहरा फिकट होता, ओठ कोरडे, आणि बाजूला drip चालू होतं.
तिच्या शेजारी तिची मावशी बसली होती — डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर काळजी.
“तुम्ही राहुल?” मावशीने विचारलं.
“हो, मी तिच्या ऑफिसमधून… तिचा मित्र.”
मावशीने थोडं हसत मान डोलावली. “ती खूप बोलायची तुमच्याबद्दल.”
ते ऐकून राहुल चकित झाला.
“ती काहीच सांगत नसे ऑफिसमध्ये… ती फार… reserved वाटायची.”
मावशी थोडी शांत झाली आणि म्हणाली —
“ती हल्ली reserved झालीये. पण पूर्वी अशी नव्हती. राधिका फार express करणारी मुलगी होती. पण एका घटनेने तिचं सगळं personality बदललं.”
राहुलचा श्वास थोडा अडखळला.
“काय झालं होतं?”
मावशीने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली…
“एक वर्ष झालं. तिचा साखरपुडा ठरलेला होता. तो मुलगा तिच्याच ऑफिसमध्ये होता, पण दुसऱ्या ब्रँचमध्ये. दोघं खूप जवळचे झाले होते. राधिकाने त्याच्यावर खूप विश्वास ठेवला. पण साखरपुड्याच्या दोन दिवस आधी त्याने एक मेसेज करून ब्रेकअप केलं… तो म्हणाला की त्याला दुसरी मुलगी आवडते.”
“तेव्हा पासून राधिका खूप तुटली. तिच्यावरचा घरचा विश्वास, स्वतःवरचा आत्मविश्वास, सगळं कोसळलं. मग तिने ब्रँच बदलून मुंबईला ट्रान्सफर घेतली.”
राहुलच्या डोळ्यांत पाणी आले होते.
तिचा आवाज, तिची शांतता, तिचं मनापासून न बोलणं — सगळ्याच मागे एवढं मोठं दुःख होतं.
राहुल तिच्यासमोर खुर्ची ओढून बसला.
“राधिका, मी जाणून घ्यायला आलोय की… तू ठीक आहेस का?”
राधिकाचं मन हेलावलं. कुणी विचारलं होतं असं शेवटचं? फार दिवस झाले होते.
“राहुल, काही लोक फक्त कामापुरतेच भेटतात, त्यांना आपण आपली जखमं दाखवत नाही.” ती शांतपणे बोलली.
“पण काही लोक… कामाच्या बाहेरही आपलं मन समजून घ्यायला थांबतात.” तोही तितक्याच शांतीने म्हणाला.
त्याचं म्हणणं खरं वाटलं.
आणि एक क्षण… राधिकाच्या मनात एक विचार आला —
“कदाचित मी पुन्हा एकदा कोणावर विश्वास ठेवू शकते…”
पण तिने तो विचार लवकरच झटकून टाकला. ती अजून तयार नव्हती. पण राहुलनेही घाई केली नाही.
त्या संध्याकाळी राहुल तिच्या शेजारी बसून फक्त गप्पा मारत राहिला. कोणतीही when, why, how नाही. फक्त शांत साथ.
कधी कधी… एक शांत साथच सगळ्यात मोठा आधार ठरतो.
त्या क्षणी राहुलने ठरवलं —
“मी तिच्यासाठी थांबणार आहे. तिचं मन जिंकणार आहे, तिच्यावरचा विश्वास पुन्हा निर्माण करणार आहे.”
ती झोपली तेव्हा त्याने तिच्या हातात एक छोटं कागदाचं पान ठेवलं. त्यावर लिहिलं होतं —
“This time, I won’t leave. No matter how long it takes.” – R
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा