Login

ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग ३

भाग ३
शनिवारी सकाळचं ऑफिस काहीसं निवांत असतं. अनेकजण वर्क फ्रॉम होम घेतात, तर काही फक्त काम उरकून घाईघाईने निघतात. पण त्या शनिवारी राहुल ऑफिसला थोडं वेगळंच वाटत होतं.

काल राधिकेने दिलेलं डायरीचं पान… त्यावर लिहिलेलं एकच वाक्य —

“Some things are too personal to share, until someone becomes personal enough.”

तो ते पान पुन्हा पुन्हा वाचत होता. ती त्याच्यावर विश्वास ठेवू लागली होती… की तो तिच्या आतल्या गोष्टी समजून घेण्यास पात्र आहे असं तिला वाटू लागलं होतं.


पण त्याच वेळी राधिकाचं वागणं थोडं distant झालं होतं.


सोमवारपासून राहुलने निरीक्षण केलं — राधिका पूर्वीसारखी कॅफेटेरियामध्ये थांबत नाही, chat मध्ये उत्तर द्यायला वेळ घेते, ऑफिसमध्येही ती त्याच्याशी अगदीच फॉर्मल होत चालली होती.

राहुलला कळेना — “मी काही चुकलोय का?”


मंगळवारी संध्याकाळी तो तिच्या desk जवळ गेला.

“Radhika, okay आहेस ना?”

ती थोडी हसली, पण तो हसू डोळ्यांपर्यंत पोहचत नव्हतं.

“हो… बिझी होते थोडी, मी नंतर call करते.”

राहुलचं मन खट्टू झालं. त्या क्षणी काही न बोलता तो तिथून निघून गेला.


त्या रात्री तो उशिरापर्यंत WhatsApp चेक करत राहिला — तिचा “online” status, शेवटचं पाहिलं गेलेलं वेळ, सगळं काही. पण कोणतंही reply नव्हतं.

एका बाजूला त्याचं ego त्याला म्हणत होतं — “कदाचित ती सिरीयस नाहीये, किंवा कदाचित तूच ओव्हर थिंक करतोयस.”

पण दुसऱ्या बाजूला त्याचं मन सांगत होतं — “ती काहीतरी लपवत आहे… कदाचित काहीतरी त्रास होत आहे तिला.”


दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारच्या दुपारी राहुल ऑफिसमध्ये शांत बसला होता. एकदम लक्ष एकाग्र नव्हतं. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अननोन नंबरवरून कॉल आला.

त्याने उचललं.

“Hello?”

“Rahul?” आवाज स्त्रीचा होता, पण फार अशक्त आणि रडवेला.


“Yes… who is this?”

“मी राधिकाची मावशी बोलतेय. राधिका hospital मध्ये आहे.”


क्षणभर राहुलचं मन थांबलं.


“काय?… कशासाठी?” तो उठून उभा राहिला.

“ती तीन दिवसांपासून फार त्रासात होती. BP खूप लो झालं. Stress खूप होतं. काल रात्री ती faint झाली.”


राहुलचं हृदय धडधडू लागलं.

“कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ती?”

“साई सर्जिकल, अंधेरी ईस्ट.”


तो काहीच न बोलता तसाच ऑफिसमधून निघून गेला. Lift मध्ये उभा असताना त्याच्या मनात एकाच विचाराने घर केलं होतं —

“मी इतक्या जवळ होतो… पण तिचं दुखं ओळखू शकलो नाही.”offic

🎭 Series Post

View all