Login

ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग ५

भाग ५
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये सकाळचे सात वाजले होते. राधिकाचे डोळे अलगद उघडले.

डोळ्यांसमोर पहिलं जे दृश्य आलं, ते होतं — पांढरं छत, मावशीच्या हातात चहा, आणि बाजूला Rahul चं टाकलेलं ते एक छोटंसं कागदाचं पान.

तिने ते उचललं आणि वाचलं…


“This time, I won’t leave. No matter how long it takes.” – R


क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

राहुल? तो इथं आला होता?

तिने इकडे तिकडे नजर टाकली.

“मावशी… राहुल आला होता का?”

मावशीने हसून मान डोलावली. “हो ग, काल तासभर बसला होता. तुझं हात धरून तुझ्या शेजारी.”


राधिका गप्प झाली… तिचं मन एकाच वेळी हलकं आणि थोडं घाबरलेलं.

“पण… मी तर त्याच्याशी फारसं काहीच शेअर केलं नाही…”


“पण त्याने सगळं समजून घेतलं. तो वेगळा आहे राधिका. सगळे सारखे नसतात.”


हळूहळू राधिकाचं डोकं हलकं होऊ लागलं. तिला आता तिच्या आतला काळोख राहुलसमोर थोडा थोडा मोकळा वाटू लागला होता.

* * *

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर राधिका पुन्हा ऑफिसला परतली, पण यावेळी राहुलने तिच्याशी वागताना कोणतीही घाई केली नाही.

कधी एक कप कॉफी टेबलवर ठेवून जायचा,

कधी तिच्या टीममध्ये एखादा task simplify करून द्यायचा,

कधी एखादं motivational quote तिच्या नोटपॅडवर ठेवून जायचा.


राधिकाचं मन हळूहळू वितळू लागलं होतं.


एक दिवस ती स्वतःच cafeteria मध्ये गेली आणि राहुल समोर बसून म्हणाली,

“Thank you… त्यादिवशीसाठी. आणि… या सगळ्याकरता.”

राहुल हसून म्हणाला, “सगळं काही नाही केलं अजून… हे तर फक्त सुरुवात आहे.”


“सुरुवात?” ती चकित झाली.

“हो. मी तुझं मन जिंकायचं ठरवलंय. आणि मी सोडणार नाही. पण तू तयार असशील तेव्हाच पुढे येईन.”


ती काही क्षण गप्प राहिली…

“म्हणजे… मी वेळ घेऊ शकते?”

“तितकाच वेळ घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव — मी वाट पाहीन.”

* * *

त्या दिवसानंतर राधिकाने तिच्या डायरीमध्ये एक नवीन entry केली:

“कधी वाटलं नव्हतं, की कोणी मला माझ्या भितींसह स्वीकारेल. पण तो… हळूहळू माझं मन समजून घेतोय. कदाचित… मी पुन्हा प्रेम करू शकेन.” पण मी करू शकेन का ????

🎭 Series Post

View all