Login

कडाडती सौदामिनी

नारीविषयी कविता

नारी म्हणून तिने
करू नये याचना
दटून करावा तिने
अन्यायाचा सामना

ती दुर्गा, लक्ष्मी, काली
तिच असे सरस्वती
सौंदर्याची खाण
नारी लावण्यवती

प्रसंगी बने नारी
रणचंडिका, भवानी
साऱ्या घराची
तिच असे स्वामिनी

शिवरायांची हिरकणी
लढणारी रणरागिणी
कडाडती सौदामिनी
शील जपणारी शालिनी

हाती तिच्या वसे
देवी अन्नपूर्णा
पूर्ण करते ती
साऱ्यांची कामना

नारीला समजू नये
कधीच नाजूक, कमजोर
वेळ आल्यावर दाखवेल ती
तिच्या मनगटातील जोर

देऊ नये कधी
तिला यातना
जाणून घ्याव्यात
तिच्याही भावना

जपावा तिचा स्वाभिमान
बाळगावा अभिमान
एकच दिवस करू नये
तिचा मान-सन्मान

तिच्या कार्याची करावी
नेहमीच कदर
करावा तिचा
नित्य आदर

अजोड आहे
नारीचे कर्तृत्व
तिच्या अस्तित्वाला
आहे खूपच महत्त्व