" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन
तिचं वर्चस्व! भाग ३ (अंतिम भाग)
©® एकता माने
हळूहळू इतर गावकऱ्यांना समजायला लागलं होतं की स्त्रियांचं मत किती महत्त्वाचं आहे. विहिरीचं पाणी सगळ्यांना समान मिळायला लागलं. शाळेची नवी इमारत योग्य ठेकेदाराकडे गेली. आरोग्य शिबीर भरलं.
रामभाऊसोबतच गावातली जी श्रीमंत मंडळी होती त्यांनाही हळूहळू सुमित्राबाईंच्या म्हणण्याचा खरा अर्थ समजू लागला. आपण जर असेच तिच्या विरोधात जाऊ लागलो तर उद्या सगळे गावकरी मिळून आपल्या विरोधात होतील याची जाणीव त्यांना झाली.
“रामभाऊ, सुमित्रा बाईंचे म्हणणे अगदी योग्य आहेत. उद्या आपली मुलंही त्या शाळेत जातील तेव्हा त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला तिचे ऐकायला पाहिजे. आपल्या गावाची सुधारणा झाली तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे ना.” रामभाऊसारखाच एक श्रीमंत शेतकरी त्यांच्यासोबत बसला होता त्याने आपले मत मांडले.
अजून एक दोघांनी त्याच्या होमध्ये होकार दिला. रामभाऊला पण आता आपली चूक समजली. तसे ते नरमले.
एकदा रामभाऊ स्वतः सुमित्राकडे आला.
“सुमित्रा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो; पण आज मान्य करतो की तू गावासाठी मोठं काम केलंस. खरंच, तुझ्यामुळे आमचे डोळे उघडले.”
सुमित्रा स्मितहास्य करत म्हणाली,
“रामभाऊ, उशीर झाला तरी चालतो; पण मन बदललं हे मोठं आहे. प्रश्न आपल्या गावाचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळूनच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.”
“रामभाऊ, उशीर झाला तरी चालतो; पण मन बदललं हे मोठं आहे. प्रश्न आपल्या गावाचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळूनच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.”
“सुमित्रा, खरंच तू आपल्या गावाचा खूप विचार करतेस. आजपर्यंत आम्ही फक्त आपल्या श्रीमंतीचा माज करत होतो. या गावातल्या गरीब शेतकऱ्यांना, कष्टकरी लोकांना कमी लेखत होतो; पण तू आमचे डोळे उघडले. आम्हाला समजले आहे की कोणतीही व्यक्ती ही पैशाने छोटी किंवा मोठी नसते. ती आपल्या कर्माने छोटी किंवा मोठी होऊन दाखवते. जे तू करून दाखवले आहे.” रामभाऊ शांतपणे चेहऱ्यावर लज्जित भाव आणून म्हणाले.
“रामभाऊ, अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही पण या गावासाठी खूप काही करू शकता फक्त मनातून विचार करा. तुमचं वागणं बघून उद्या हे गाव तुम्हालाही नक्की पाठिंबा देईल.” सुमित्राने शांत चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगितले.
रामभाऊंना तिचे म्हणणे पटले आणि त्या दिवसापासून त्यांनी पण आपल्या पैशाचा माज करणे सोडून दिले आणि सगळ्या गावकऱ्यांसोबत राहून गावाच्या प्रगतीचा विचार करू लागले.
काही वर्षांनी गावात निवडणुकीचा माहोल आला. सरपंच पदासाठी नावं निघाली. पुरुष नेहमीप्रमाणे जोर लावत होते; पण गावकऱ्यांनीच काहीतरी ठरवलं.
“या वेळी सरपंच आपली सुमित्रा बाई होणार.”
सुमित्रा आश्चर्याने म्हणाली,
“मी? मी तर फक्त गावासाठी काम करतेय. जे माझं कर्तव्य आहे. यासाठी मला सरपंच झाले पाहिजे असे वाटत नाही.”
“मी? मी तर फक्त गावासाठी काम करतेय. जे माझं कर्तव्य आहे. यासाठी मला सरपंच झाले पाहिजे असे वाटत नाही.”
गावकरी एकमुखाने म्हणाले,
“म्हणूनच तर आम्ही तुला सरपंच व्हायला हवं असं म्हणतो. तू खरी नेता आहेस. तू स्वतःच्या फायद्यापेक्षा गावाच्या फायद्याचा विचार करते आणि एका सरपंचाचे तेच कर्तव्य आहे.”
“म्हणूनच तर आम्ही तुला सरपंच व्हायला हवं असं म्हणतो. तू खरी नेता आहेस. तू स्वतःच्या फायद्यापेक्षा गावाच्या फायद्याचा विचार करते आणि एका सरपंचाचे तेच कर्तव्य आहे.”
निवडणुकीच्या दिवशी निकाल लागला सुमित्रा प्रचंड मताधिक्याने निवडून आली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
ती मंचावर उभी राहून म्हणाली,
“हे माझं नाही, हे स्त्रीशक्तीचं यश आहे. आजपासून गावात कोणतीही स्त्री मागे राहणार नाही. घरात, शेतात, शाळेत सगळीकडे आमचं वर्चस्व असेल; पण ते वर्चस्व प्रेमाचं, समतेचं आणि न्यायाचं असेल.”
“हे माझं नाही, हे स्त्रीशक्तीचं यश आहे. आजपासून गावात कोणतीही स्त्री मागे राहणार नाही. घरात, शेतात, शाळेत सगळीकडे आमचं वर्चस्व असेल; पण ते वर्चस्व प्रेमाचं, समतेचं आणि न्यायाचं असेल.”
त्या गावाची गोष्ट सगळीकडे पसरली. सुमित्राबाईंचं कार्य ऐकून आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या बायकांनीही प्रेरणा घेतली. सुमित्रा देशमुख नाव गावाच्या सीमा ओलांडून जिल्हाभर गाजलं. तिने आपल्या गावात केलेली सुधारणा सगळीकडे पसरू लागली.
गावकरी म्हणू लागले,
“पूर्वी आम्हाला वाटायचं, स्त्रिया फक्त घरातलं काम करतात; पण आता कळलं खरी ताकद त्यांच्या धाडसात आहे. जेव्हा एखादी स्त्री आपल्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करते तेव्हा ती ते पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते. जसे घरात राहून घराची धरोहर ती सांभाळते तसेच तिने जर मनातून विचार केला तर पूर्ण गावाचं, शहराचंही ती उत्तम नेतृत्व करू शकते. खरं वर्चस्व तिचंच आहे!”

समाप्त.
©एकता माने ( संघ कामिनी)
©एकता माने ( संघ कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा