कार्यप्रेरणा तु माझी...

सावित्रीबाई फुलेंसाठी काही शब्द मनातले
मनातल्या दृष्टीतून
दूर जावू नको तू
तुझ्या कार्यप्रेरणेतून
वाट चालते मी रोज

स्त्रीजन्माला तु दिला
सन्मानाचा अधिकार
स्त्रीजन्माला तु दिला
शिक्षणाचा अधिकार
मनातल्या दृष्टीतून.....

कसे पांग फेडू तुझे
गगनाहूनही विशालकाय
कसे व्यक्तित्व रुजवू तुझे
माझ्या जिवातल्या कनांत
मनातल्या दृष्टीतून......

स्त्रीस करण्या निर्भर
काटेरी वाट चाललीस
सुखमय जगण्याला
दूर दूर लोटलीस
मनातल्या दृष्टीतून......

लाख स्त्रीयांचे दु:ख
तुझे दुःख मानलीस
त्यांना द्यावया सुख
त्यांचा आधार बनलीस
मनातल्या दृष्टीतून......

चुल - मुलही मर्यादा
तोडूनी मुक्त केलीस
घेण्या मुठीत आभाळ
स्वतंत्र पंख स्त्रीस दिलीस
मनातल्या दृष्टीतून......

सुधारणेच्या कार्यासाठी
फळाची अपेक्षा न धरलीस
अविरत झटत राहूनी
क्रांती समाजात घडवलीस
मनातल्या दृष्टीतून........

तुझ्याइतकि अपार मोठी
योग्यता न माझी जराही
तरीही माझ्यात तुला रुजविण्याचा
आशिर्वाद मागते तुझ्याकडे
आशिर्वाद मागते तुझ्याकडे

मनातल्या दृष्टीतून
दूर जावू नको तू
तुझ्या कार्यप्रेरणेतून
वाट चालते मी रोज


🎭 Series Post

View all