Login

शाही खीर

खीर
साहित्य
१००ग्रॅम खारीक
१००ग्रॅम काजू
५०ग्रॅम बदाम
१ग्रॅम केशर
१चमचा विलायची पूड
दीड लिटर दूध
२वाट्या साखर
अर्धी वाटी साजूक तूप
कृती
खारीक काजू व बदाम रात्रभर दुधात भिजत घालावेत. मिक्सरमध्ये या सर्वांची बारीक पेस्ट करावी. दूध चांगले अटवावे. साधारण दीड लिटरचे एक लिटर करावे व या दुधात साखर घालावी. खारीक बदाम काजू यांची पेस्ट साजूक तुपात चांगली खमंग भाजवी. त्यात आटवलेले दूध घालून विलायची पूड व केशर घालावे. सर्व्ह करतांना पिस्त्याचे काप पेरा.