खेळ सावल्यांचा....इथे चालतो रोज...

एक खेळ भयाकडे घेऊन जाणारा
सदर कथा ही पूर्णतः काल्पनिक असून केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी..

      ये आई....... आई....... वाचव........ वाचव...... मला  ते मारायला येत आहेत. आई...... आई.......
      राजनंदिनी धावत धावत वरच्या मजल्यावर जाते. ती वरच्या मजल्यावर जाते तशी तिची किंकाळीच बाहेर ऐकू येते. पण ती ऐकायला कोणीच नसते जशी ऐकू येते तशीच वायूत सामावून जाते. पण त्या आवाजाने झाडावरचे पक्षी मात्र फडफड करत उडून जातात.
      संध्याकाळी 9:00 वाजता राजेंद्र घरी येतो. आल्या आल्या स्वरालीला हाक मारू लागतो. स्वराली ये स्वराली बाळा बघ डॅडा आज लवकर घरी आला. तुझ्यासाठी.... ये लवकर खाली तुझ्यासाठी खाऊ पण आणलाय बघ आज डॅडाने... ये लवकर.... स्वराली... त्याला आश्चर्य वाटत. रोज त्याची चाहूल लागल्या लागल्या येणारी स्वराली.... आज हाकेला पण ओ देईना... तसच आज घरात जास्तच शांतता दिसत आहे... राजनंदिनीची तर केवढी घाई चाललेली असते. पण आज कोणच दिसत नाही. तसाच टिव्हीचा आवाज नाही. इतर वेळी टिव्ही बंद करा म्हणल तरी कोण बंद करत नाही. आज मात्र इतकि शांतता का जाणवाले..
      अरे कोठे गेलेत कि काय हे पण अस कस जातील राजनंदिनी कितीही तातडीने तीच्या माहेरी जरी कोणी बोलवल तरी मला फोन करून सांगितल्याशिवाय जात नाही आणि जरी गेली असती तर दार लॉक करून गेली असती. पण दार तर फक्त पुढे ढकलल होत..
      तो परत आवाज द्यायला लागतो. राजनंदिनी..... स्वराली...... अरे ओ तरी द्या. त्याला आता त्यांची खूपच काळजी वाटायला लागते. मनात नको नको ते विचार थैमान घालायला लागतात. डोळे भरून यायला लागतात. तरीही तो परत हाक मारायला सूरू करतो.
      तितक्यात वरच्या मजल्यावरून गौरवर्णी तरूणी पदर सावरत सावरत हळूहळू पायऱ्या उतरत खाली येवू लागते तीच पैंजणही छून छून वाजत असत. हातातल्या बांगड्याची कन कन होत असते. बट बाजूला करत खाली येत येत ती त्याच्याकडे बघत म्हणू लागते. काय ओ आधी म्हणता मला यायला लय उशीर होणार आणि नंतर मात्र इतक्या लवकर येता. आणि किती मोठ्याने हाका मारता हळू हाका मारायच्या ना.. आपली स्वराली झोपली आहे वरती ती जागी होईल ना.... तुम्ही पण ना... असे कसे वागता..
      राजेंद्र तर नुसता बघतच राहिला थोडा वेळ तसाच त्या तरूणीच सौंदर्य खुलून दिसत होत. तीने आकाशी रंगाची साडी नेसली होती तो काही वेळ तीच्या सौंदर्यात हरवूनच गेला इतका कि ती काय बोलली ते त्याच्या लक्षातच नाही आल.
      पण बायकोच्या आणि मुलीच्या आठवणीने लगेच भानावर आला व त्या तरूणीकडे बघून तीला विचारू लागला. समोरच्या तरूणीला पाहून तो गांगरलाच तो थरथरतच क...क.... क.... कोण आहात आपण आणि इथे काय करताय?
      अहो मिस्टर काय ओ तुम्ही शुद्धीवर आहात ना आपल्या बायकोलाच अस का विचारत आहात. कि आपण कोण... विसरलात की काय? आपल्या बायकोलाच... अरे मीच तुझी बायको राजनंदिनी....
      तीच ते बोलण ऐकून राजेंद्र जागच्या जागीच गारठतो.
त्याच डोक तर पूर्णपणे चक्रावूनच जात. पण तसच स्वतः ला सावरत तो म्हणतो काय कस शक्य आहे तु माझी राजनंदिनी असूच शकत नाही ती अशी नाही दिसत. तु सांग कोठे कोठे आहे माझी राजनंदिनी सांग सांग... काय केलात की काय तिला... सांग कोठे आहे ती...
      माझी राजनंदिनी सावळी दिसायची. तीचे डोळे बोलके आहेत. ती शब्दांनी कमी पण डोळ्यांनीच जास्त बोलते. ती आल्या आल्या न बडबडता मला आधी पाणी प्यायला देते मगच जे विचारायच असत ते विचारते. तीच्या पायात पैंजण नाही आहे माझ्या मुतखड्या ऑपरेशनच्या वेळी पैसे कमी पडले तेव्हाच ते सोनाराकडे गहाण ठेवून पैसे उभारले.
      अहो तेच ना ते मी आता परत आणले. पण तुम्ही इतक विचित्र का वागताय तुम्ही जस बोललात तशीच तर आहे मी इतक्या गोष्टी लक्षात ठेवलात पण मी कशी दिसते तेच विसरलात कस ओ अस वागत आहात आज शुद्धीवर या जरा..
      त्याला तर आता कायच समजेना ती त्याची बायको नाहीच आहे अस त्याला वाटायच पण ती त्याला मी तुमची बायकोच आहे अस म्हणत होती. त्याच्या चेहऱ्यासमोर बायकोचा वेगळाच चेहरा होता. पण त्याच्यासमोर बायको म्हणून वेगळीच स्त्री उभी होती. काय खर काय खोट हे पहिल्यांदा त्याच्या विचारशक्तीच्या पलिकडे गेलेल.
      तोवर एक आठ वर्षाची मुलगी रडत रडत खाली आली. त्याच्या कानावर स्वरालीचा आवाज आला. तो तिच्याकडे वळणार त्या आधी ती तरूणी म्हणाली.
      बघ तुला म्हटल होत ना तुझ्या आवाजाने स्वराली उठेल तिची झोपमोड होईल बघ तुझ्यामुळे ती रडायला लागली. नेमक काय झालय काय आज तुला.
      राजेंद्र त्या मुलीकडे वळतो व परत गोंधळून जातो. कारण ती मुलगी पण कोणीतरी वेगळीच आहे अस त्याला वाटू लागत. त्याच्या समोर त्याच्या मुलीच्या बालपणापासूनची चित्र डोळ्यासमोर येतात. त्याच्यासाठी त्याची मुलगी त्याची परि होती तो तिला विसरण शक्यच नव्हत. पण ती तरूणी ती मुलगी त्याचीच आहे अस सांगत होती.
      तो तसाच भांबावलेल्या अवस्थेत त्या मुलीकडे बघत असतो. तोपर्यंत ती मुलगी पायऱ्या उतरत उतरत खाली त्याच्या जवळ येते व आधी त्याच्या हातातली खाऊची पिशवी काढून घेते. व म्हणते लव यू डॅडा तू माझ्यासाठी लवकर घरी आलास आणि मला खाऊ पण आणलास. येस आता तु मला गोष्टीच्या दुनियेत घेऊन जाणार खूप मज्जा येणार आता तुझी गोष्ट ऐकत झोपताना येस येस...
      बघ ना हि मम्मा सारखी ओरडत असते. जरा दंगा केला तर मला दंगाच करू देत नाही. खूप बोर व्हायला होत मग.. टिव्ही पण हि एकटीच बघत बसते. नुसत्या सिरीयल लावते मला कार्टून बघायला देत नाही. तुच सांग आता तिला... तिला हे पण म्हटलेल मी आज डॅडा लवकर घरी येणार तर तिला ते पण पटल नाही. येस येस डॅडा तू आज लवकर आला.
      राजेंद्रला त्या मुलीच बोलण गोड तर वाटल. पण तरीही त्याला ती मुलगी त्याची वाटतच नव्हती. त्याच्या मुलीला टिव्ही बघण्यापेक्षा खेळायला जास्त आवडायच. गोष्टी ऐकण्यापेक्षा गोष्टी वाचायला जास्त आवडायच. छोटी असूनही अभ्यासाची आवड होती. त्याला प्रश्न विचारून विचारूनच गोंधळून टाकायची. झोपताना तर प्रश्न विचारतच झोपायची. त्याला सगळ आठवल्यावर लगेचच डोळ्यात पाणी आल.
      तोवर डॅडा डॅडा करत त्या मुलीने त्याला मिठीच मारली. तसा तो चक्कर येऊन जमीनीवर धाडकन कोसळला.

बऱ्याच तासांनी.....

     राजेंद्र बराच वेळ जमिनीवर पडून होता. पण नंतर एका किंकाळीने त्याला शुद्ध आली. तो परत उठत उठत आजूबाजूला पाहू लागला. व स्वतः ला तसच जमिनीवर पडलेल पाहून पुन्हा एकदा शॉक झाला. तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला. आपण इथे कस आलो याचा.. तोवर त्याच्या कमरेपाशी हात लावत कोणीतरी गुदगुल्या करत आहे. अशी अनुभूती होवू लागली. त्यासरशी त्याच्या मनात नसतानाही त्याला हसायला येऊ लागल. पण मनात उठलेल भितीच वावटळ तसच होत. तोवर त्याला त्याच्या पायापाशी कसली तरी हालचाल जाणवली. तो त्यासरशी ताडकन वर उठला.
      आता खोलीत अंधार पसरलेला त्याला मगाचा प्रसंग पुन्हा आठवू लागला. त्यातली एक एक गोष्ट आठवत होती तस तस त्याच्या अंगावर सर्कन काटाच येत होता. तो परत राजनंदिनी आणि स्वरालीला हाक मारू लागला. त्याच्या मनात अजूनही ही आशा होती कि यावेळी नक्की आपली बायको आणि मुलगीच येईल..
      त्याला स्वरालीचा आवाज कानी येवू लागला. डॅडा डॅडा कोठे आहेस तू... कधीपासून वाट बघतोय तुझी घरी येण्याची ये ना आता लवकर डॅडा डॅडा... आता त्याला खात्री पटली की ही आपली मुलगी स्वरालीच आहे. तो त्या आवाजाच्या दिशेने जावू लागला.
      परत त्याला ती तरूणी समोर दिसली. काय ओ उठलात पण इतक्या लवकर तो बोलण्याकरता तिच्या डोळ्यात बघू लागला. व त्यासोबत तो तसाच हरवून गेला. आता त्याच स्वतः वरच नियंत्रण हटून गेल. तो तिच्या मागे मागे तसाच चालत एका खोलीत गेला. तस त्या खोलीच दार आपोआपच बंद झाल. तस त्या आवाजाने तो परत भानावर आला. आता त्याच्या समोर ती तरूणी नव्हतीच.
      त्याला तिथे एका तरूणाचा हसण्याचा आवाज आला. तो हसत हसत म्हणू लागला अरे ये ये तुझीच वाट पाहत होतो. अरे आतापर्यंत तू कोठे होतास अस म्हणत तो तरूण त्याच्या समोर आला. तो दिसायला खूपच स्मार्ट होता. त्याला तिथे पाहून राजेंद्र परत गोंधळला. कोण कोण तू माझ्या घरात काय करतोयस.. मला ओळखत असल्यासारख काय तुझी वाट पाहत होतो. अस म्हणतोयस अरे कोण आहेस तू..
      अरे काय तू माझ्या घरात येवून मलाच अस बोलतोयस अरे मीच तर राजेंद्र आहेस परवा तु आमच्या घरातले दागिने चोरलेस म्हणून आम्ही तुझी वाट बघतोय.. चोर आहेस तू..
      हे कस शक्य आहे नाही मी राजेंद्र आहे मी नाही चोर आणि हे माझ घर आहे आम्ही आताच हे घर खरेदी केलय. अस राजेंद्र म्हणतच असतो. तोवर त्या तरूणाची टोकदार नखे खालून तशीच त्याच्या पोटात आरपार घुसली गेली. तशी एक आर्त किंकाळी आसमंतात पसरली. तसच त्या खोलीत रक्ताची लाट पसरली.
      हळूहळू खोलीत काळोख दाटू लागला. ते रक्त तिथून आपोआपच नाहीस झाल. त्यासोबत राजेंद्रच शरीरसुद्धा गायब झाल. ती खोली काळोख्या अंधारात गढून गेली. नव्या भक्ष्यांच्या प्रतिक्षेत.....

क्रमशः


🎭 Series Post

View all