Login

मी तिरंगा बोलतोय

गर्व आम्हाला आमच्या राष्ट्रध्वजाचा
मी तुमचा तिरंगा... आज माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे... 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या पूर्ण वर्षातून या दोन दिवसात मला आपल्या भारतीय लोकांकडून जो मान सन्मान भेटतो तो अगदी अतुलनीय असतो..... त्याचे वर्णन मी शब्दात करू शकणार नाही पण, इतर दिवसांचे काय ?

२२ जुलै १९४७ रोजी जेव्हा देशाला मिळणारे स्वातंत्र्य समोर दिसत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतात सह या जगामध्ये फडकावले.... या दिवशी खरं तर माझा वाढदिवस आहे असे म्हणता येईल.... देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या अगदी काना कोपऱ्यातून माझे स्वागत झाले.... त्या शतकातील माणसांनी गुलामगिरी सहन केली होती त्यामुळे त्यांना देशाच्या स्वातंत्र्याचे तसेच माझेही महत्त्व होते , पण जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे तसे हे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले....

आज 21 व्या शतकात जन्मलेल्या पिढीला स्वातंत्र्याचे आणि राष्ट्रध्वजाचे काही महत्त्व वाटत नाही..... हे लोक फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी वाजत गाजत माझे स्वागत करतात, पण इतर वेळी मात्र मी रस्त्यात धूळ खात पडत असलो तरी कोणीही मला उचलायची तसदी घेत नाही.... 21व्या शतकातली पिढी ही प्रॅक्टिकल विचारांची असल्यामुळे त्यांना भावनांचे महत्त्व नाही....

असो, एकच सांग की, मला आपल्या राष्ट्रध्वजाला द्यायचे असेलच तर तुमच्या मनात स्थान द्या..... बाहेर वाजत गाजत ते दोन दिवस सेलिब्रेट करण्यापेक्षा रोज मनातून फक्त दोन मिनिटांसाठी तरी माझी आठवण काढा म्हणजे मला परत एकदा स्वतःच्या अस्तित्वावर गर्व वाटेल अभिमान वाटेल.... आपले भारत राष्ट्र हे खूप महान आहे त्यामुळे या राष्ट्राचा राष्ट्रध्वज असल्याचा मलाही खूप अभिमान आहे.... हा अभिमान तुम्हीही तुमच्या मनात बाळगा म्हणजे मला माझे अस्तित्व, माझं तुमच्यासोबतच बोलणं सिद्ध झाल्यासारखे वाटेल.....