गहिवरला श्वास तू 9

नवरा बायको अन विश्वास

गार्गी एका टीम सोबत मिळून काही ऑनलाइन कामं करत असायची, त्याच टीम ची एक ट्रिप आयोजित झालेली. गार्गीनेही नाव नोंदवलं. येत्या शनिवारी रविवारी ती जाणार होती. तिने तयारी सुरू केली.

सकाळी दूध घेत असताना समोरच्या फ्लॅटमधून सावीचा नवरा फोनवर बोलत लिफ्टकडे जात होता, तिने त्याचं बोलणं ऐकलं..

"येत्या शनिवारी रविवारी मी बाहेरगावी असेल...त्यानंतर बोलू आपण.."

गार्गीने ते ऐकलं..

"म्हणजे...त्या दोन दिवशी श्रीधर घरी एकटाच, आणि सावी सुद्धा..."

कितीही म्हटलं तरी गार्गीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. पण श्रीधरला तिने डोळ्यासमोर आणलं आणि एक दीर्घ श्वास घेतला..तिचं ट्रिपला जायचं पक्कं झालं..

"श्रीधर, मी दोन दिवस घरी नसेन, काय करशील तू एकटा?"

"मलाही सुट्ट्याच आहेत की, मी मस्त दिवसभर लोळणार.."

तिला दुसरं काहीतरी सांगायचं होतं पण तिने स्वतःला आवरलं..

तयारी करून झाली, शनिवारी सकाळी श्रीधरने तिला ट्रिप साठी सगळे जिथे जमणार होते तिथे सोडलं आणि तो घरी आला..काही वेळाने ती कुठे आहे हे विचारण्यासाठी फोन केला तेव्हा ती म्हणाली,

"अजून दोन तास लागतील आम्हाला तिकडे पोहोचायला.."

हे सांगत असताना ती खूप शिंका देत होती..

"काय गं? बरं नाही वाटत का?"

"थोडी कणकण वाटतेय, पण काही नाही एवढं.."

"अगं मग तू का गेलीस??"

"ते जाऊदे...तुला माहितीये आमच्यासोबत कोण आहे??"

"कोण??"

"सौरभ.."

सौरभ..नाव ऐकताच श्रीधरच्या पोटात गोळाच उठला..पण त्याने स्वतःला सावरलं..

"अरे आमच्या सरांचा बॉस आहे तो.. मला माहित नव्हतं हे..मला पाहिलं आणि तो चमकलाच..उद्या त्याच्यासोबत एक मीटिंग असणार आहे आमची एका नवीन प्रोजेक्टसाठी..."

"बरं.. मी तिथे हवा होतो.."

"का? का? जळतेय तुमची???"

"नाही गं.. तू कशी सावीवरून माझी खिल्ली उडवायचीस तशी मीही उडवली असती ना.."

"असुद्या..तुमचं तेवढं नशीब नाही.."

असं म्हणत दोघेही हसायला लागले..

श्रीधरला तो दिवस खायला उठला, दोन तीन वेळा गार्गीला आवाज देऊन झाला, व भानावर यायचा की ती घरी नाहीये. त्याला घर खायला उठलेलं. असं वाटायचं की कधी एकदा गार्गी परत येईल. तिचं सतत वावरणं, तिचं मिश्किल बोलणं, तिचं हसणं सगळं तो काही तासातच मिस करत होता. ती नसल्यावर तिची उणीव जास्त भासू लागली.

संध्याकाळी सावी खाली दुकानात काहीतरी घ्यायला गेली तिथे सोसायटीतल्या बायकांच्या गप्पा सुरु होत्या,

"आपण योगा क्लास लावायचा का? उद्यापासून सुरू होतोय.. गार्गी पण येणार होती.." एक बाई

"अगं ती आज अन उद्या नाहीये, ऑफिसच्या ट्रीपला गेलीये.."

हे ऐकताच सावी चमकली,

तिचा नवरा घरी नाही आणि गार्गीसुद्धा नाही..म्हणजे ती आणि श्रीधर आपापल्या घरात एकटेच! तिच्या डोक्यात खळबळ सुरू झाली, गार्गीला दिलेलं चॅलेंज आठवलं...आणि तिच्या डोक्यात प्लॅन्स सुरू झाले...

दुसऱ्या दिवशी श्रीधर सकाळी लवकर उठला, थोडाफार नाष्टा करून tv समोर बसला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला...

"हॅलो गार्गी.."

"गार्गी नाही श्रीधर.."

"ओह सॉरी सॉरी..मी तिची ऑफिसची मैत्रीण सुनेत्रा..चुकून तुम्हाला लागला जीजू.."

"बरं कशी चाललीये ट्रिप.."

"ट्रिप छानच, पण गार्गी मॅडम पडल्या आजारी..आम्ही बाहेर आलोय सगळ्या, तिला गोळी देऊन रूम वर आराम करायला सांगितला आम्ही.."

"अच्छा..तुमची मीटिंग होती ना आज??"

"कॅन्सल झाली, सौरभ सरांना काहीतरी काम आलं आणि ते हॉटेल रूम वरच थांबलेत..मग आम्ही बाकीच्या सर्व बायका शॉपिंग साठी आलोय बाहेर.."

श्रीधरच्या पोटात गोळा उठला..म्हणजे ऑफिसचे सर्वजण बाहेर आणि हॉटेलवर फक्त गार्गी आणि सौरभ..
त्याला ती चिंता नव्हती, गार्गी जास्त आजारी नाही ना? म्हणून त्याला काळजी लागली..त्याने तडक तिला फोन केला..

गार्गीने फोन उचलला, तिचा आवाज निघत नव्हता..

"गार्गी? काय गं? जास्त आजारी आहेस का?"

"ताप आलाय खुप.."

"काय गं तू...अशी कशी आजारी पडलीस.."

तेवढ्यात तिच्या रूम चा दरवाजा वाजला आणि ती उघडायला गेली..

"सौरभ??"

श्रीधरने ते ऐकलं...तो म्हणाला..."बरं चल तू कर आराम.."

श्रीधरने फोन ठेवला आणि त्याने दीर्घ श्वास घेतला..

तिकडे सावीने स्वतःला दुखापत करून घेतली आणि ती धावतच श्रीधरचा दरवाजा ठोठावु लागली..

श्रीधरने दार उघडलं, बघतो तर काय..तिचा हात रक्ताने माखलेला..

"काय झालं??"

"श्रीधर हे बघ ना काय झालं....घरी माझा नवरा पण नाहीये, किती रक्त येतंय बघ.."

श्रीधरने तिला आत बोलावलं, बसवलं आणि फोन घेऊन तो आत गेला..

आतून फर्स्ट एड बॉक्स आणलं, तेवढ्यात गार्गीचा फोन.. त्याने उचलला...

"हॅलो गार्गी.."

"काय मग, काय चाललंय.."

"काही नाही...तू सांग तुला बरं वाटतंय ना?"

सावी हे ऐकून अजूनच चिडली, इथे आपली काळजी सोडून हा बायकोला विचारतोय, तिच्या डोक्यात आयडिया आली .गार्गीला कळावं की आपण श्रीधर सोबत आहोत म्हणून तिने मुद्दाम आवाज काढला..

"आई गं, श्रीधर प्लिज..."

गार्गीला तिकडून समजलं की हा सावीचा आवाज आहे..तेवढ्यात दारातून सोसायटीतल्या दोन बायका आत आल्या,

"काय हो श्रीधर भाऊजी? इतक्या अर्जंट मध्ये फोन करून का बोलावलं?"

"या शेजारच्या बाईंना दुखापत झालीये...त्या धावत माझ्याकडे आल्या, म्हटलं घरी गार्गी नाहीये तर तुम्हाला बोलवावं.."

गार्गी तिकडून सगळं ऐकत होती आणि तिला हसू फुटलं, सावीचा प्लॅन कसा फसला हे तिला फोनवरच समजलं..

सावीचा तिळपापड झाला, सोसायटीतल्या त्या दोन बायका बोलू लागल्या,

"काय गं? तुला माहितीये ना गार्गी घरी नाहीये मग आमच्याकडे यायचस, इकडे काय आलीस?" सोसायटीच्या बायका तिलाच बोलू लागल्या,

संध्याकाळी त्याला गार्गीचा फोन आला..

🎭 Series Post

View all