चौकट सोनेरी प्रेमाची भाग १

I Like To Read

स्पर्धा

चौकट सोनेरी प्रेमाची


संध्याकाळचे सहा वाजले होते. ग्रीन गार्डन मध्ये मुल मनसोक्त खेळत होती. काही झोपाळ्यावर झुलत होती.तर काही सि सॉ वर खाली करत होती. निशा मात्र तिच्या मुलीला खेळताना बघत होती.
"छान खेळतात दोघीजणी. चांगल पटत दोघींचं "बाजूला बसत मीना ने तिच्या हातात भेळ दिली. पण ती काहीच बोलली नाही.
"निशा अग,कुठे हरवलीस?" मीनाने तिच्या हातावर हात ठेवला .
"नाही ग असचं."


"बाकी काय म्हणतेस.कित्ती दिवसांनी असं बाहेर भेटतोय. " मीनाने भेळ खात तिला विचारले.
"छान चाललय सगळ." निशाने पाण्याची बाटली बाहेर काढली.
"नवरा काय म्हणतो.बर पाठवलं तुला एकटीने."
खास काही नाही. म्हणाली पण तिच्या डोळ्यांसमोर सकाळचा प्रसंग तरळला.

"अहो, प्रियाला बागेत जायचय."
"मग जाऊ की रविवारी. एकटी कुठे जातेस. "
"आज जायचय तिला. एकटी नाही जाणार.प्रियाची मैत्रिण आणि तिची आई सुध्दा आहे. तिच्या वर्गातली आराध्या."
"अच्छा . ठीक आहे जा.पण काळजी घे. आणि जरा चांगले कपडे घालून जा. तू पण नीट ड्रेस घाल."
"मग नक्की जाऊ ना".तीने परत हळूच विचारलं.
"हो.जा.कित्ती वेळा विचारते आता बाजूला हो.माझे कपडे वाळत घालू दे. "
"हो". म्हणत ती डबा भरायला आत गेली.
"निशा, जरा इकडे ये. हे घे. रवीने शंभरच्या दोन नोटा तिच्या हातात ठेवल्या. नीट ठेव.
"अहो नको,माझ्याकडे आहेत."
"हे पण ठेव.प्रियु ल काही हव असेल तर दे. आणि काळजी घे तिची.इकडेतिकडे बघत बसू नकोस. तुझी पण काळजी घे.गर्दी होण्याआधी घरी ये. ठीक आहे.निघू. "

रवि निघून गेल्यावर तिने पैसे पर्स मध्ये ठेवले.
आता काही काम नव्हत.फक्त पाणी भरायच होत.

रवी सकाळी तिची कामात मदत करायचा.


तीने एक सुस्कारा सोडला तर मीना तिच्याकडे बघत होती.

"तरी पण चेहरा का पडलाय. एव्हढा चांगला नवरा भेटला आहे .
स्वतःचे कपडे स्वतः धुतात.तुला महिन्याच समान भरून देतात. परत घरात मदत करतात. आमचे एक दिवस घर आवरायला सांगितल तर दोन दिवस बोलून दाखवतील.
तुझा नवरा रोज कर काढतो.परत लादी पण पुसतो. साफसफाई पण करतो. अजून काय पाहिजे.

"हो,पण सगळ विचारून करावं लागत. तुला नाही कळणार."

कळत तर तुला नाहीये.फोन वाजतोय घे.

"अहो,काय झालं."
"निघालात का ग."
"नाही.ती खेळते आहे.निघू थोड्यावेळाने."

अजून नाही.वाजले किती बघ. सात वाजले. लगेच घरी जा .
मला उशीर होईल.म्हणत त्याने रागाने फोन ठेवला.

क्रमशः



🎭 Series Post

View all