चौकट सोनेरी प्रेमाची भाग २

I Like To Read
स्पर्धा
चौकट सोनेरी प्रेमाची भाग २


" बरं निघते ". बोलेपर्यंत त्याने फोन कट केला .
आता रात्री काय होणार या विचारानेच तिला घाम फुटला.

"आई,मी अजून थोडावेळ झोपळ्यावर खेळू"

"नको.चल घरी जाऊ उशीर झालाय".तीने पटकन मिनाचा निरोप घेतला. आणि प्रियूचा हात धरून भराभर घराच्या दिशेने निघाली.

तीने पटापट जेवण बनवलं. प्रियुला जेवण दिलं आणि रवीची वाट बघत बसली.

रात्रीचे दहा वाजले होते. प्रियु तिच्या मांडीवर झोपून गेली होती.
त्याच्या येण्याची चाहूल लागली.
तीने अलगद प्रीयुला गादीवर झोपवलं आणि हळूच दरवाजा उघडला.
त्याने त्याच आवरल. आणि जेवायला बसला.
रवीचा स्वभाव मूळचा रागीट नव्हता.पण त्याला मनात नसूनही तस वागावं लागतं होत. कारण निशा खूप साधी आणि पटकन कोणावरही विश्वास ठेवणारी होती.म्हणून तो तिला जपत होता.
पण तिला ते आवडत नव्हत.

"अहो,ती खेळत होती."

"ठीक आहे.मला वाटलच होत.म्हणूनच फोन केला.ती खेळत असेल.आणि तू बोलत बसली असशील."
"अस काही नाही. "
"बरं धर खा".त्याने अळूवडी तिच्या ओठांजवळ नेली.
"अग खा. माझ्यासाठी बनवली आहे .माहीत आहे.पण तुला सुध्दा आवडते. पण तू खाल्ली नसशील. "

"खाल्ली मी.तुम्ही खा."
"कशाला खोटं बोलते.मी ओरडेन, रागवेन म्हणून टेन्शन मध्ये थोडंसं जेवलीस. खा गपचुप."

"सॉरी. म्हणत तिने वडी खाल्ली. तिचे डोळे भरून आले.
आपण किती चुकीचं समजतो. हे तर त्यांचं प्रेम आहे.जे मला कळतच नाही.
"चल आता जास्त विचार करू नको".

त्याने जेवण झालं . तस भांडी घासून ठेवली.गॅस चा नोब चेक केला. नळ नीट बंद आहेत का पाहिले.आणि झोपायला आला.

"अहो, काय करताय.अचानक तिच्या पायाला त्याने हात लावला.
"काही नाही.तेल लावत आहे आणि मस्तमालिश करतो.तू झोप शांत. "
"माझ्या पायाला नको.तिच्या पायाला मालीश करा.ती खेळून दमली आहे .
"तू पण तर दिवसभर किती काम करतेस.झोप आता शांत ,जास्त वेळ नाही करणार. "
तिला तिच्या विचारांवर अजूनच राग आला .

"निशा झोप."

क्रमशः


🎭 Series Post

View all