Login

चौकट सोनेरी प्रेमाची भाग ३

I Like To Reading
स्पर्धा
चौकट सोनेरी प्रेमाची भाग ३

दोघींच्या पायाला मालिश झाली. तो त्याच्या जागेवर मधोमध जाऊन झोपला.
'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
सकाळी मोबाईलचा गजर झाला. निशा उठण्याचा प्रयत्न करत होती.पण तिला जमत नव्हत. तीने नीट बघितल तर तो तिच्या पोटाला पकडुन झोपला होता. तीने त्याला निरखून पहिलं.
किती चिडतात,रागावतात.पण काळजी पण तेवढीच घेतात.तीने हळूच त्याचा हात बाजूला केला . आणि उठून आत गेली.
तीने तिची रोजची काम करायला घेतली.

थोड्या वेळाने रवी उठला. त्याने प्रिया उचलून सोफ्यावर झोपवले. गादी उचलून जागेवर ठेवली. चादर आणि उश्या नीट ठेवल्या.
अहो, राहू द्या काल उशिरा आलात ना.परत झोपलात पण उशिराच. मी करते.तुम्ही पडा जरा. तीने त्याच्या हातातला झाडू घेतला .
"मी करतो.तू जा तुझ आतलं काम कर."

"अहो,रोज नका ना करत जाऊ अशी काम"

"त्यात काय झालं. दे लवकर उशीर होईल'. तिच्या हातून झाडू घेऊन त्याने कचरा काध्यला सुरुवात केली.
तीने बराच वेळा त्याला सांगितल होत.पण तो काही ऐकत नव्हता.
सकाळी केर काढणे आणि लादी पुसणे तोच करायचा. अगदी कानाकोपऱ्यातून कचरा काढायचा.

तीने कधीच त्याचा शर्ट आणि पँट धुतलीच नव्हती .
तुझे हात दुखतील.म्हणत स्वतचं आपले कपडे धूत असे.
त्या दिवशी तर तिची चप्पल धुतली.

त्याच एकच म्हणणं होत.तू दिवसभर कितीतरी छोटी छोटी काम करतेस . तुला थोडीशी मदत. आणि तसंही घर दोघांचं तर काम दोघांनी मिळून केलं पाहिजे. त्याने फक्त बोलून नाही तर करून दाखवल होत.
तीने त्याचा चहा आणि नाश्ता बाहेर टेबलवर आणून ठेवला.
तोपर्यंत त्याने त्याचा टिफीन आणि पाण्याची बाटली बॅग मध्ये भरली.
"अहो, ऐका ना. सॉरी."

हम्म्.त्याने चहा पित हुंकार दिला.
ती आणखीन काही बोलणार .
"निशा,तुला मी इतका वाईट वाटतो का ग."
"नाही.तुम्ही तर खूप चांगले आहे. मीच तुम्हाला चुकीचं समजली."तीने मान खाली घातली.

"मला तुझी काळजी वाटते.म्हणून तुला सांगतो.बाकी काही नाही. चल निघू."

"अहो"., तीने पाठमोऱ्या उभ्या त्याला मिठी मारली.
त्याने सरळ होऊन तिच्याकडे पहिले.अलगद तिच्या गालांवर ओघळलेले डोळ्यांमधले पाणी पुसले .

तिच्या डोळ्यांवर ओठ टेकवले.