जरा शिक तिच्याकडून
भाग 5
तो सतत नाही पण जेव्हा आई अति बंधन लाधतात तेव्हा तो पडतो मध्ये ,आईला चुकीचे ठरवायला नाही तर मला शाश्वती द्यायला.." राखी
दोघी ही आता जणू काही अनुभवतील किस्से सांगून एकमेकीला सावध करत होत्या, नाते जे दिसतात तसे नसतात..हे आता कुठे कळत होते.. आपण नवीन असतो म्हणून लगेच कोणावर ही विश्वास टाकून मोकळे होतो..आणि मग चतुर लोक आपल्याला सासरच्यांच्या नजरेत मूर्ख ठरवतात..आणि आपल्याला त्यांच्या बद्दल वाईट सांगून त्यांच्या बद्दल मन कलुषित करतात..मग ते कायमच..
"मी काय म्हणते जाऊ दे सासूबाईला तिच्याकडे.."
"मी ही तेच म्हणते पण सासूबाईला आता इथे त्यांची रूम आहे ,सोय आहे सगळी..हवे तेव्हा मंदिर आहे..मैत्रिणी आहे आणि त्यात रेशम ही आहे..मग नको वाटते इतक्या लांब जाऊबाई कडे जायला..जाऊ किती ही प्रयत्न करू दे ,किती ही आवडीचे खायला आणू दे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत.." राखी हसत होती
"सासू आता तुझ्याकडे रमली तर..तुझ्या प्रेमात अडकली समज. " रेवा ही टाळी देत म्हणाली
"चल आज खूप बोलून बसले ,कधी कधी असे वाटते नको घरातल्या गोष्टी सांगायला..का त्रास तुला.." राखी
"सवय झाली आहे ,पण कुठे तू माझ्या घरी कोणाचे कान भरणार आहे की मी कान भरणार असते..आपण दोघी ही फक्त पाण्यावरच्या बुडबुड्या प्रमाणे बोलतो ,आणि विसरून जातो ,आणि एक हलके मन घेऊन घरी परत जातो..मैत्री असे नाते आहे की जिथे मन आणि ताण हलके केल्याशिवाय रहात नाही..हेच जर घरच्यांना सांगितले तर ह्या गोष्टी एकाचे दोन होऊन नको त्या माणसाला सांगितल्या जातात ,मग नाते कसे तुटतील हेच बघतात.."
रेवा जे म्हणाली त्यात तथ्य होतं.. मैत्रीण कधी ही आपण सांगितलेली कोणती ही गोष्ट मनातच ठेवते ,बाहेर पडू देत नाही ,पण फक्त ती गोष्ट ऑफिस मधली नसावी...
घरी निघतांना रेवा म्हणाली ,"ऐक आज तू घेऊन जा सासूला जे आवडते ते ,बघ काय त्यांना वाटते ते..आणि हो उद्या रेशम होऊनच ये ,त्यांची इच्छा पूर्णच कर.."
"गम्मत करायची ही वेळ आहे का ??" राखी
"बघ तर इच्छा पूर्ण केल्यावर सासूची काय रिअकॅशन आहे . " रेवा
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा