Login

जरा शिक तिच्याकडून भाग 1

जरा शिक
जरा शिक तिच्याकडून
भाग 1

"मांग मध्ये सिंदूर लाव राखी."

"आई मला नाही पटत हे काहीही.." राखी

"ती समोरची रेशम बघ किती सुंदर सुवाशीन दिसते..नवऱ्यासाठी करते रोज सगळा शृंगार.."

सासूबाई सुनेला बाजूच्या सुनेबद्दल सांगत होत्या ,त्यांना रेशम खूप आवडतं असत...तिचा दिसण्याचा एक वेगळाच थाट होता...एक विवाहित स्त्री असावी तर अशी हे त्या तिला बघून सतत म्हणत, त्यात त्या आपल्या सुनेला ही सांगत..बाकी करतेस तर थोडा तरी सिंदूर टाकत जा भांगात...जरा तरी बांगड्या घालत जा...कानातले झुमके भारीच दिसतात ते घाल कधी ,नसतील तर आणून देते मी पण सगळी दिसण्याची पद्धत तिच्या सारखी असावी...

"आज ही तेच का तुमचे शृंगार ,शिंदूर पुराण..?"

"मग काय वाईट आहे त्यात ,तू छान दिसावे ह्यात कुठे न आवडण्यासारखे असते.." सासू


"मी पाचवी पास रेशम नाहीये ,मी जॉब करते..तिथे हे चालत नसते..हसतात लोक हे असे काही सजून धजून आल्यावर..." राखी त्यांना पुन्हा बगल देत म्हणाली..त्यांचा रोजचा हा प्रकार ,त्यात नेमके ऑफिसमध्ये जायला निघाली की समोर ती रेशम तुळशीला पाणी घालायला येणार..सासूला स्मित करणार..लांबून प्रणाम करणार.. मग काय ह्या ही इकडून जुगजुग जिओ म्हणणार आणि राखीला तेच ते सांगणार..

"बघ तर आज तिने सिंदूर मध्ये चमकी टाकली आहे ,किती छान चमकते..कानात भारी झुमके आहेत ,खड्याचे..मी तर म्हणते तुला मी हेच असेच आणून देणार आणि तू ते रोज घालणार... मी तिला विचारते..आणि घेऊन येते.."


तिला तर हे रोजचे होते ,सासू रेशम आणि तिचे खाल्ले जाणारे डोके , वाद नको म्हणून ती कडे कडेने निघून जाणार.."हुश्श मी सुटले एकदाची.."

सासूबाई इकडे लगेच मैत्रिणीला सांगत होत्या ,अजून ही तिच्या डोक्यात काही केल्या घुसत नाही ,की आपण आदर्श सून आणि बायको होऊन रहावे..

"जाऊ दे तू का त्रास करून घेत आहेस, तिचे आयुष्य आहे..तिच्या नवऱ्याला आवडते तिचे रहाणे..त्यात नौकरी करते..आपण फक्त अवशक्य असल्यावर बोलायचे ,अति केले तर त्यांना आपण नकोसे होतो.."

"मला तुझे नाही पटत."

"कळेल तुला ही पण अजून अद्दल घडली नाही तुला ,ती अद्दल प्रत्येक सासूला घडत असतेच..कधी तर डोळे उघडे ठेवून बघ..आपण त्रासिक सासू व्हयचं की आंनद देणारी सासू व्हयचं हे लवकर समजावे.."

बाजूच्या मावशी सासूबाईला चांगले सांगून थकल्या होत्या ,पण कधी त्यांनी त्यांच्या सुने बाबत वाईट सांगण्याची हिम्मत नव्हती केली..

बघू काय अद्दल घडते ह्यांना