जरा शिक तिच्याकडून
भाग 3
"नाही मग तिचे घर छोटे आहे ,तिथे हवा येत नाही..गार्डन नाही..म्हणतात.."
सासूबाई म्हणजे पक्क्या रमाठा मारून बसल्या होत्या, जी सून ऐकते तिच्या जवळ आपण राहू हे गणित होते त्यांचे..
"मग इथेच तर चुकते ,इथे नाव ठेवा आणि तिथे पटत नाही हे कारण न सांगता घर छोटे आहे सांगून जाणे टाळा...आणि जावे कडे असतील तेव्हा तू किती चांगली हे सांगत असतील.." राखी मनातलं काही तरी बोलून गेली.
"तुला हा अनुभव आहे का ?" रेवा हसत विचारत होती ,तिने राखीला रोज एकाच गोष्टी वर बोलतांना ऐकले होते.
दोघी राखी आणि रेवा कोण होत्या कळले असेलच पण तरी सांगते ,दोघी खास मैत्रिणी होत्या ,सुरुवातीला तर फक्त ऑफिस च्या विषयावर बोलायच्या ,तेव्हा कधी वाटले नाही की फक्त एक सूत्री विषयामुळे दोघी इतक्या जवळ येतील..तो विषय म्हणजे सासू..आणि ज्या कधी तरी बोलणाऱ्या आता रोज बोलू लागल्या..
रेवा शिकलेली आणि राखी अजून ही शिकत होती ,तिला नवऱ्याने सांगितले होते ,तू शिकलीस की आई तुला नको त्या गोष्टी मध्ये अडकवण्याच्या फ़ंदात नाही पाडू शकणार.. म्हणजे चल मंदिरात ,कर पापड ,कर शिलाई..जे तिने आपल्या लेकीला करायला सांगितले होते ,जेणे करून सासरी कामी येईल ,जावा भावात लेकीचे नाव निघेल ,सासूची लाडकी होशील..पण राखीच्या नवऱ्याने आणि वडिलांनी आईचा हा डाव हणून पाडला ,पण आता ते सगळे सुनेकडून करून घेऊ बघते...शेजारच्या सुनांची सतत तिला कौतुक वाटत असते..मग आपल्या सुनेने ही हेच करावे असे म्हणत असते..पण जेव्हापासून ती पुढील शिक्षण घेत आहे , तेव्हापासून खुद्द मुलगा आईला तिच्या कामात लुडबुड करू देत नव्हता..
तसेच काहीसे रेवाचे ही सासू आणि जाव ह्यांच्या मध्ये तिचे होणारे भरीत..सासू आणि जाऊबाई बोलत नसल्याने ,सासूबाईने तिला सांगितले तिच्या सोबत बोलू नकोस ,तर जाऊबाई तिला सासूचे सगळे काही ऐकू नकोस असे म्हणत असते...सासू घर संभाळते तर जाऊबाई तिचा छोटा मुलगा..म्हणून ती ही पुरती दबावात..
"तुझी सासू जावेला तुझ्याबद्दल काही भरवते की काय.?" रेवा
"काल मी अचानक घरी गेले तेव्हा जाऊबाई घरी येऊन बसल्या होत्या..त्यांना माझे बरे चालले आहे ,नवरा साथ देतो हे बघवत नव्हते तेव्हा ही आणि आत्ता ही ." राखी
"मग काय ,सहज आल्या होत्या का त्या ?"
जाऊबाई येतात ते ही काही न कळवता ,त्यांचे असे ही काय काम असेल की त्यांना आम्हाला कळवावे वाटत नाही.???
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा