जरा शिक तिच्याकडून
भाग 4
भाग 4
जाऊबाई येतात ते ही काही न कळवता ,त्यांचे असे ही काय काम असेल की त्यांना आम्हाला कळवावे वाटत नाही.???
"नाही मी बाहेर होते तेव्हा जाऊबाई म्हणत होत्या ,तुम्ही मला तर तुमचे संस्कार दिले पण तिला नाही दिले..मला तर सांगत होता की साडी नेसावी, कुंकू लावावे ,हातभार नको पण बांगड्या घालाव्यात ,नवऱ्याच्या नावाने ओळख व्हावी एका पत्नीची तर ती पतिव्रता मग हिला काहीच सांगायला सुरुवात केली नाही..?" राखी ऐकू आलेला प्रकार सांगत होती
"मग काय..?"
"त्यातून एक लक्षात आले ,मी घरी नसतांना नेहमी कोणी तरी येते..ही शंका खरी ठरली.."
"म्हणजे जाऊबाई येतात नेहमी ??"
"असे तर काल त्यांनी सांगितले की त्या सासूबाईची चौकशी करायला येतात ,मध्ये मध्ये त्यांना हवे ते त्यांच्या आवडीचे खायला घेऊन येतात.."
जाऊबाईंना एक मुलगा होता ,तो आता घरात एकटा असायला म्हणून त्यांनी सासूबाईचे स्वतःच्या कामासाठी मन वळवणे ,आणि त्यांना आपल्या घरी घेऊन येण्यासाठी त्या सासूबाई कडे येत होत्या ,त्या सासूबाईला वाटत होते मोठी सून किती गुणाची आहे ,तिचे संस्कार किती चांगले की ती माझी आवड निवड जपत आहे..खायला घेऊन येते...इतक्या लांबून उन्हात येते..गप्पा आणि चौकशी करून जाते ,छोट्या जावेची खुशाली विचारते तिला सगळ्यांची काळजी आहे हा समज झाला होता..
"मोठी जाऊ कमाल हुशार आहे म्हणजे.." रेवा
"हो बऱ्याच दिवस मला हे कळत नव्हते पण कळले तेव्हा आम्ही सोबत न रहायचा निर्णय घेतला..त्या नवऱ्याला ही काही काही सांगत माझ्याबद्दल पण नवऱ्याने त्यांना एकदाच सांगितले माझ्या बायको बद्दल मी पुन्हा काही एक ऐकून घेणार नाही...तुम्ही वहिनी आहात ,तुमचा मान राखतो म्हणजे मी मर्यादा सोडून बोलू शकत नाही असं नाही..." राखी
"कमाल नवरा आहे तुझा तर..त्याने योग्य वेळी बाजू घेतली तुझी..नाहीतर आपलेच नाते पोखरून टाकतात मनाला ,आणि वाद बघत बसतात..मग एकटे बघून आपले सांत्वन करतात ,त्यांच्या विरुद्ध मनात विष कलवतात.." रेवा
नवरा असावा तर असाच ,आज जर तिला नवऱ्याची साथ हवी असेल आणि तो देत नसेल तर पुढे त्याची गरज ही लागत नसते नवीन आलेल्या मुलीला.
"तो सतत नाही पण जेव्हा आई अति बंधन लाधतात तेव्हा तो पडतो मध्ये ,आईला चुकीचे ठरवायला नाही तर मला शाश्वती द्यायला.." राखी
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा