जरा शिक तिच्याकडून
भाग 6
"ही अशी आवड तर मी कधी ही पूर्ण करणे ह्या जन्मात तरी शक्य नाही." राखी हात जोडत म्हणाली
दोघी निघतांना एकमेकींना टाटा करून निघाल्यावर ,राखी ठरवते की आज सासूबाईंच्या आवडीच्या फुलांची वेणी घेऊन जाऊ ,तशी ती बाजाराच्या दिशेने वळाली..
तितक्या तिची खास मैत्रीण ही तिथे तिला हाक मारत आली, तिला पाहून राखी ही खुश झाली, दोघी खूप दिवसांनी भेटत होत्या ,त्यांना वेळ भेटवा तो इथे..भर बाजारात..
"अग राखी किती बारीक झालीस तू.."
"तू ही बारीक झाली आहेस की मस्त.." राखी
"तू ही बारीक झाली आहेस की मस्त.." राखी
"ह्याला बारीक म्हणतेस तू ,अग 66 किलो आहे मी.." प्रीती
"आपलं काय ठरलं होतं ,की कोणी किती ही जाड असू आपण मात्र एकमेकींना बरीकचं म्हणायचं..आपल्या मनाला समाधान ..मग मी ही बारीक वाटते का ?? " राखी
"मस्तच बारीक ग.." प्रीती मिठी मारत हसून तिचे गाल ओढत पप्पी घेत म्हणाली
"तू अजून ही तशीच आहेस ,अल्लड बालिश...पण तरी मला वाटते हे किस घेणारा देणारा आला असेल इतक्या वर्षात.."
"नाही ग, अजून तरी लग्न नकोय मला..आई?" प्रीती
"आईच काय आता ,दादा आहे ना त्याला घेऊ दे जबाबदारी आणि तू हो मोकळी लग्न कर आता तरी.." राखी गंभीर स्वरात म्हणाली
"दादाने देश सोडला अग ,आणि आता आई ही नको म्हणते त्याच्याकडे जायला...तिला मला सोडून नाही जायचे..त्यात मी एकटी कशी राहू शकेल इथे त्यासाठी सतत टेन्शन घेते..त्यात मी दादा सोबत नाही राहू शकत ,वहिनीला नाही आवडत मी आलेले...मग आई म्हणते माझ्या लेकीला कोणी खाली वर पाहिले तर मी त्या घरात पाऊल ही ठेवणार नाही...भले ही इथे दोघी राहू..माझ्या प्रीतीचे लग्न पाहूनच मी जीव सोडून देईल.."
प्रीतीची समस्या किती तरी वर्ष अशीच होती ,राखी लग्न करून गेली तरी अजून प्रीती लग्न करत नव्हती, खास मैत्रिणी होत्या ,सोबत मोठ्या झालेल्या पण एकमेकींना सगळं मनातलं सांगणाऱ्या ,इथे राखी सासूची चिंता घेऊन बाहेर पडलेली तिला स्वतःच्या अडचणी प्रीतीच्या अडचणी समोर छोट्या वाटत होत्या...
"लग्न कर प्रीती , मुलगा असा बघ ज्याला तुझी गरज आहे ,आणि सोबत तो आईला सांभाळुन घेईल..म्हणजे त्याला त्यांचा खर्च काहीच नसेल पण फक्त तुझ्या घरी आईला ठेवायला तयार होईल.."
"नको चिंता करू माझी ,मी तर अशी ही खुश आहे..आई आहे तोपर्यंत मी लग्न नाहीच करणार. कोणाचे मी उपकार नाही घेणार.." प्रीती
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा