जरा शिक तिच्याकडून
भाग 7
"चल काही तुझ्या आवडीचे खाऊ,मस्त मज्जा करू ,बसू कुठे तरी निवांतपणे गप्पा मारू.." राखी
"आई वाट बघत असते अग चातकासारखी मग मी पुन्हा कधी तरी येईल..आईसाठी वेणी घ्यायला आले होते..ती घेऊन गेले की थोडा उशीर झाला तरी ती मला समजून घेते ,आणि वेणी पाहून तर जास्तच खुश .."
"त्या सुधाकरचे काय झाले ?"
"तो अजून ही वाट बघत आहे माझी.."
"मग का वाट बघायला लावायची त्याला ?"
"त्याची आई तिला मी नकोय.."
"अग तुला तो आवडतो ,त्याला तू मग कुठे अडतय..का करत नाही लग्न तू..का आडून बघते..तुझ्या साठी तो आयुष्यभर थांबला म्हणतेस आणि हे असे का करतेस..? " राखी कळकळून म्हणाली
"शेवटी सगळे आईसाठी म्हणते ना मी ,मग आईसाठी समज हे ही.." प्रीती डोळ्यातले पाणी पुसत
"इतके पण करू नये ग. "
"त्याच्या आईला कळले पाहिजे ना हे.." प्रीती
"त्यांना काय पटत नाही ,तुझ्या आईची जबाबदारी घेणे ??"
"आई का घेऊन येणार मी सोबत..असे म्हणतात त्या.."
"मग कुठे जाणार आई तुझी..?"
"म्हणतात वृद्धाश्रमात ठेव ,पण तेव्हाच लग्न कर.."
"किती किचकट आहे हे सर्व.."
"दादा म्हणतो ठेव वृद्धाश्रमात ,काय होतंय..पण तू लग्न कर..आता एकटी राहू नकोस..आईला त्रास होईल असे करू नकोस.."
"आईला काय वाटत ?"
"ती म्हणते मी कुठे ही राहीन फक्त तू सुखी हो.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा