Login

जरा शिक तिच्याकडून भाग 8

जरा
जरा शिक तिच्याकडून

भाग 8


"झालं तर पण आपल्या मनाला नाही पटत हे ,आपण आपल्या आनंदासाठी आईला दूर ठेवायचे ..? " राखी डोळे पुसत

दोघींना एकच सुचत होते ,पण राखी ह्यावर अडून होती की प्रितीने वेळीच लग्न करावे...आई कधी आपल्याला अडचण समजत नव्हती ,मग आता आपण तिला अडचण का समजायचे..? हे पटत नव्हते..

तिक्यात प्रीतीला फोन येतो ,तो सुधाकर असतो..

"हॅलो ,प्रीती आता आपली अडचण दूर होते..आपण लग्न करू शकतो.."

"म्हणजे काय म्हणायचे तुला.."

"आईला वाटते की तुझी आई ही एकटी राहू शकत नाही ,तर ती आणि आई सोबत आपल्या सोबत राहतील...तू तुझ्या आईची जबाबदारी घे आणि मी आईची...त्यात मी आईला म्हणालो जर तिच्या आईला वृद्धाश्रमात ठेवले तर मी आमची स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही ,एका आईचे आशीर्वाद मिळतील पण एका आईचे तळतळाट लागतील ,ह्यात माझ्या नजरेत तू चांगली ठरशील ही पण लग्न होऊन जेव्हा प्रीती ह्या घरात येईल तेव्हा मात्र तिच्या नजरेतून तू उतरलेली असशील ,ती आईचा मान तुला कधी ही देऊ शकणार नाही..तरी आता तुझ्या हातात बरेच काही आहे..त्यात प्रीती नाही तर मी कोणाशी ही लग्न करणार नाही...तुला सगळ्या गोष्टी माहीत आहेत..बाकी तुझ्या शब्दाचा मान राखत आलो आहे ,फक्त लग्न कर हा शब्द हा मान मी राखणार नाही.."


हे बोलतच प्रीतीला रडू आले ,जो अजून नवरा होणार आहे त्याने तिची अशी बाजू मांडणे म्हणजे तिच्या साठी खूप काही मोठे होते..त्याने असे काही केले होते की बाजूला बसलेली राखी ही नवल करत होती ,प्रितीने स्पीकर वर फोन ठेवला असल्याने राखी त्याचे बोलणे ऐकत होती..

"तू आईंना आपल्या लग्नासाठी असे तयार केलेस.!!! पण त्यांना माझा राग आला असेल तर.? " प्रीती

"नाही तिला मनापासून वाटले की आई ती आई असते ,त्यात तिला कुठे त्यांना सांभाळायचे आहे..असे पाहिले तर आपल्याला सोबत होईल मग का मुद्दाम हेका..म्हणून ती तुझ्यासारखी सून येणार आहे ,सोबत तिची आई येत आहे तर हरकत नाही..पण तू आता लग्न कर.."

"मी आईला सांगू नक्की ही गोष्ट.?" प्रीती

"आईला आम्ही सांगायला येत आहोत ,तुझ्या घराजवळ आहोत तर तू ये मग बोलू.."

आता प्रीतीचे स्वप्न पूर्ण होणार होते , इतक्या वर्षांनी कुठे लग्नाला थांबलेला तो आई ला तयार करण्यात यशस्वी झाला होता..खरे तर तिने ही त्याच्यासाठी लग्न केले नव्हते..