Login

जरा शिक तिच्याकडून भाग 10 शेवट

जरा
जरा शिक तिच्याकडून

भाग 10 शेवट


इकडे हे असे बघून राखीला तिची घृणा वाटत होती ,हीच ती संस्कारी रेशम जिच्या कौतुकाची पुराण सासूबाई आणि इतर बायका गात असतात सतत..ती त्यांना आदर्श बायको आणि सून वाटत असते..जिच्या कडून आम्ही काही शिकावे म्हणत असतात..आता तर तिची खरी मेख कळली..

तिने न राहून एक फोटो घेतला आणि तिने काही पाहिलेच नाही अश्या प्रयत्नात ती तिच्या नकळत निघून गेली..आज जे पाहिले त्यावरून तिला कळले आपण निदान चांगल्या आदर्श सुना आणि बायका होण्याचे नाटक तरी करत नाही, आपण जसे आहोत तसे कोणाला आवडो ना आवडो आपल्या नवऱ्याला आवडतो हेच खूप आहे..त्यासाठी अगदी दिखाऊ रेशम होण्याची काहीच गरज नाही..

घरी येत असतांना तिच्या मनातून रेशम जाता जात नव्हती ,तिला वाटत होते किती दुटप्पी असावे माणसाने ,इतकी बेशरम कशी असू शकते एक स्त्री..इतका चांगला नवरा असून बाहेर प्रेम शोधत बसते..तिने नाते किती सहज घेतले.. विश्वास किती सहज मोडला..त्या दादाला हे माहिती नसेल..

घरी पोहचत नाही तोच ,तिला रेशम आज पुन्हा जणू तिच्या गच्चीवर तुळशीला पाणी टाकत असतांना जाणवली ,हसत असतांना जाणवली ,पडलेला पदर डोक्यावर घेत असतांना जाणवली..डोळे झाकून देवाकडे प्रार्थना करत असताना जाणवली..हे सगळे भास तिला होत होते..तर लगेच तीच रेशम त्या माणसाच्या कमरेत हात घालून त्याला किस करतांना डोळ्या समोर येत होती..सुन्न झाले होते आता तर हे आपण पाहिले आहे असे सांगितले तरी सासूबाईला काही पटणार नाही ,त्या उलट आपल्याला दोन शब्द सूनवतील..

घरी येऊन ती निपचित बसून होती, सासूबाई तिला बघून म्हणाल्या ,"काय झाले ग तुला आज.?"

"आज जरा डोळे उघडले माझे.."

"हे काय नवीन ,त्यात मग असे निपचित का बसायचे.."

"आई तुम्ही शांत बसा ,मला काही ही एक प्रश्न विचारू नका.."

"काय तुम्ही सुना ,नाहीतर ती रेशम बघ..दिवसभर घरात असते ,पूजा पाठ आणि ध्यान करत आहे..तिने संध्याकाळी प्रसादाला बोलावले आहे सगळ्यांना ,तू ही चल आवर..आणि हो मस्त साडी नेस ,सिंदूर लाव ,बांगड्या घाल..डोक्यावर पदर घे..मला आज तरी रेशम सारखी दिसू दे.."

सासूबाई हे म्हणताच बाहेरून आलेला राखीचा नवरा आईला ओरडत म्हणाला ,"काय हे सतत सतत रेशम रेशम लावले तू ,तुला माहीत तरी आहे का ही रेशम काय संस्काराची बाई आहे ते..तिला आज मी येतांना स्टेशन बाहेर एक पर पुरुषाच्या मिठीत पाहिले आहे. ती साडी नसणारी आदर्श सून ,बायको त्या माणसाला कितीदा तरी स्वतःकडे ओढत होती ,तिच्या कमरेत हात टाकून तो ही अगदी जवळ आला होता ,त्यात तिच्या नवऱ्याने हे पाहिले आहे ,आता तो तिला ओढत आणत होता घरी...सगळे बाहेर जमा झाले आहेत बघ जरा..आता तू पुन्हा रेशम चे आदर्श घे म्हणायचे बंद करशील अशी तिची बदनामी झाली आहे..त्यापेक्षा राखी मला जशी आहे तशी नेहमीच आवडली आहे.."

मुलाने हे सांगितल्यावर तर आईचे डोळेच मोठे झाले ,आता तर त्यांनाच शरम वाटू लागली होती जिला आपण आदर्श समजयचो ती अशी निघाली हे अजून ही पटत नव्हते ,तर त्या बाहेर गच्चीत त्यांच्या घरातून येणारे आवाज ऐकत होत्या ,तेव्हा कळले रेशम आज रंगे हात पकडली आहे..आणि ती दिखाऊ आदर्श स्त्री म्हणून ह्यासाठी मिरवत असावी की कोणाला तिच्यावर संशय येऊ नये म्हणून..??

कधी कधी समोरची व्यक्ती कशी आहे ,नेमकी दिसते तशीच आहे की त्यापलीकडे तिची न दिसणारी एक वेगळी बाजू आहे हे न बघता आपल्या सुनेने तिचे अनुकरण करावे असे सुरू होते ,शिक जरा तिच्याकडून म्हणण्याआधी जरा तिचे गुण अवगुण ही बघावे ,आणि त्याआधी आपल्या घरातील सुनेच्या चांगल्या गुणांचा अभ्यास करावा..

"मी आता काय म्हणू राखीला ,तिला रोज रेशम चे गुण घे म्हणत होते आता मला वाटते तिला जाऊन म्हणावं तू जशी आहेस तशीच रहा, तशीच चांगली आहेस पण तिला आता मी सांगितलेलं बोललेले पटणार नाही ,पटवून घेणार नाही.."

सासूबाई घरात येताच राखी त्यांच्या समोरून उठून गेली ,तिला आज तरी निदान सासुबाईचे कोणतेच म्हणणे ऐकायचे नव्हते..

"तुला काय वाटतं आई ,तुझे वय झाले म्हणजे चांगल्या वांगल्याची पारख तुलाच आहे ,पण तसे नाही घरात बसून जे कळत नाही बाहेर पडून कळते...आजपासून ही सवय तू मोडली पाहिजेस..नाहीतर मी तुझी बाजू मांडू शकणार नाही...( चुकीची..) "