Login

जुनी चाळ. (एक आशेचा किरण भाग 2)

जुनी चाळ. (एक आशेचा किरण )ही कथा एका मुलीची आहेजिच्या जीवनात अगोदरच खुप संकट आली आहेत.तरी तिला जगण्यासाठी एक आशेचा किरण म्हणून जुनी चाळआठवते.
भाग 2
चाळीत पदार्थ यांची देवाण घेवाण इत्यादी सगळं चालत असायच.
प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र घर होते पण एकमेकांना लागुण दरवाजे असलेलं. कित्येकांची कितीही मोठी घरे असली पण तिकडे रहायला जाण्याची त्यांची हिंमत होत न्हवती. अनेकांची मजबुरी होती त्या चाळीत रहाण्याची. कुणाला मोठे घरे परवडणारी न्हवती तर कुणाला दुसऱ्या लोकांमध्ये करमणार न्हवते. कुणाला तेथून जाऊ वाटत न्हवते . पण शुभा नेहमीच लहान चाळीतलं घर सोडून मोठ्या घरात जाण्याच स्वप्न बघत बसलेली असे.  चाळीतील त्या दिवसांना विसरणं अशक्यच होत.
  आज मात्र जेंव्हा हे सगळं आठवतं ती बसली होती तेंव्हा जाणवते की कोणताही बडेजाव न करता किती नेटाने येथील माणसं तेंव्हा जगत होती. लहानसहान गोष्टी देखील उपलब्ध नसतांना किती शान्त सुखात जगत होती. घराला लागून घर असून सुद्धा शांतता  असायची. पण हें मात्र एक खरं होत की कुणाच्या घरी पाहुणे आले कुणाचं कोण कधी खपल. कुणाची मुलगी कुणाच्या मुलासोबत पडाली, कुणाच्या मुलीला किंवा मुलाला पाहुणे आले बघायला. यावर नेहमची चर्चा असायची. बातमी लगेच घरोघरी पोहोचलीचं पाहिजे असे फास्ट नेटवर्क होते. डाटा मोबाईलपेक्षा फास्ट ट्रान्सफर होत होता.
थोड्याच दिवसांनी शुभाच्या वाढदिवसाला भेट म्हणून  तिच्या वडलांनी लहानसा रेडिओ आणला. रोज सकाळी तिची आई रेडिओवरील गाणी ऐकत कामं करायची. मुंबई आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या " गवळणी, तूझ्या माठाला गेला तडा, अमृताहूनी गोड... उठी उठी गोपाला.. " आदि स्वरांमुळे झोपेतून सकाळी जागे होताना वाटलेलं प्रसन्नपणा डोळ्यांसमोर अलगत फिरून गेली.
शुभाच्या बाबांना प्राण्यांचं फारचं वेड होत. तसेही ते फॉरेस्ट खात्यात जॉबला होते. चाळीत सुरुवातीला फ़क्त त्यांच्याच घरात मांजरे होती ती तिच्या बाबांनी त्यांच्या मित्राकडून आनलेली लहानशी पिल्ले होती. नंतर तिच्या वडिलांनी एक कुत्री आणली तिचं नाव डिम्पल ठेवलं होत.
मांजर आणि कुत्री (डिम्पल )एकत्र बसलेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचं.
त्याहीपेक्षा तिचे बाबा त्यांच्याशी जे बोलायचे ते चाळीत जास्त फेमस झालेलं होत. कुत्रे आणि मांजरी सगळी तिच्या बाबांच्या आसपास असायची. तिचे बाबा घरातल्या मुलांशी बोलायचे त्यापेक्षा कितीतरी पट जास्त ते सतत या मंडळींशीचं बोलत बसायचे.
" कसला नवरदेवासारखा नटून आला आहे बघ...! थांब... तिथेच अंगावर उडया मारू नकोस रे... देतो रे....! बाबा देतो तुलाही दूध देतो... जरा धीर धर रे राजा...!! " असं काही त्यांचं बोक्याशी बोलणं असायचं.
" अगं ये राधा बाई... ये गं.... माझी लाडू बाई...काय झालं तुला...? अशी का रुसून बसली आहेस तु.... इकडे जवळ ये बघू... बस माझ्या मांडीवर...!" असं काहीसं त्यांचं आपल्या लाडक्या मनी माऊला बोलण असायच.
एकदा तर पवार काकू बघायला आलेल्या.
"अहो देशपांडे साहेब....कोण आलंय ...? कुणाशी बोलताय...? " मग त्यांना जेंव्हा हें कळलं की हे असं बोक्याशी बोलता आहेत. तेव्हा मात्र  त्यांना खुप हसू आले.