तो जोरात ओठ आणि दात खात खात तिला बोलत होता. त्याने तिला जोरात बेडवर ढकललं. तशी ती बेडवर जाऊन पडली आणि रागात त्याला बघू लागली. तस तो तिला रागात परत बोलला.
" डोळे खाली घ्यायचे हम्मsss....माझ्यासमोर आणि तुला काय वाटतं गं... तु हें सगळं करून वाचशील पण लक्षात ठेव अजून तरी तुला कुणी माझ्यापासून वाचवू शकत नाही.
खरं तर शुभाच लग्न कुणी सुंदर देखणा गोरा गोमटा मुलाशी नाही तर एका वयस्कर माणसाशी झालं होत. अगोदर तिला दाखवताना कुणी सुंदर असा मुलगा बघायला आला होता. लग्न मात्र भलतंच कुणाशी करून दिले होते तिच्या भावांनी . बिचारी शुभा जगण्याचा एक एक दिवस मोजत होती. लग्न झाल्यापासून तिच जीवन नर्क झाल्या सारखंच होत.
प्रत्येक दिवसांची रात्र ती स्वतःच्या जीवाला मारून जगत होती. लग्न करून बिचारी आपल्या लोकांपासून खुप दूर निघून आली होती.
"तो तिला परत परत धमकी देत असायचा.
अग्नीला साक्ष मानून माझ्यासोबत तू लग्न केलं आहेस. तिच्या मंगळसुत्राला हात लावून तो तिला सांगत असायचा की हे तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि अजूनही खरं वाटत नसेल तर तूझ्या भांगेत हें कुंकू माझ्या नावाचे आहे.
तुला मी पैसे मोजून आणलेली आहे अशीच कशी जाऊ देणार.
बिचारी त्याच्या तावडीतून सुटण्याचा रोजच प्रयत्न करत असायची. तो घरी असला की मग तिला खुप त्रास देत असायचा. नेहमी प्रमाणे तो तिच्या जवळ जाऊ पहायचा पण तिला त्याची किडस यायची. तो बोलता बोलता जवळ आला की ती मागे मागे सरकत शेवटी भिंतीला ठेकवली जायची. गच्च डोळे मिटून घ्यायची. तसा तो तिला वरून घाली निहारत असायचा.
ती त्याला नेहमीच रागात बोलायची.
"प्लिज माझ्यापासून लांब रहा.... मला जाऊ द्या घरी मला नाही रहायचंयेथे...!"पण तिचे तो एक ऐकत नसायचा.त्याला पटेल तशी बडजबरी तिच्या सोबत करत रहायचा.
ऐके दिवशी ती त्याची नजर चुकून आपल्या गावी म्हणजे जुन्या चाळीत परत पडून आली. बिचारी तेव्हा गरोदर होती. तिला तिचीच लाज वाटू लागली होती. सर्वाना सांगायचं तर कसे सांगणार आणि परत ही जायचं नाही घरी आता रहाणार तरी कुठे आणि वरून हें असे गरोदरपण अंगी. चाळीत आईबाबांचे घर होते पण त्यात आता कुणी भलतेच रहायला आलेले होते.
तेव्हा तिला माईची आठवण आली.आता ती माईच्या घरीच रहात होती.
तिच्या आठवणींची जुनी चाळ आजही तशीच जीव लावणारी होती. पैसा नसला तरी माणुसकी अजून तशीच टिकून राहिलेली होती. तिचा जीवन प्रवास आता तिच्या भूतकाळासोबत जागे झाला होता.
मनात अशा होती की कुणी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. स्वप्न रंगवले होते ते आता कुणी तरी पूर्ण करेल. बिचारी वाटेकडे डोळे लावून बसली होती. आशा होती ती नवीन समंजस जोळीदार भेटण्याची.

*****कथा समाप्त *****
लेखिका :- सौं. रुपाली बोरसे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा