रात्रीची ती वेळ होती… शहराच्या दिव्यांनी आकाशाशी स्पर्धा लावली होती, पण तरीही तिच्या डोळ्यांतील एकटेपणा त्या प्रकाशालाही हरवत होता. वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाने झळकलेल्या एका कॅफेच्या कोपऱ्यात बसलेली आर्या तिच्या कॉफीचा एक एक घोट घेत होती, पण मन कुठेतरी हरवलं होतं. तिचं आयुष्य एखाद्या अधुरी कवितेसारखं झालं होतं सुंदर पण न सांगितलेलं.
ती पत्रकार होती. रोज शेकडो लोकांशी भेटायची, प्रश्न विचारायची, उत्तरे ऐकायची. पण स्वतःच्या मनातील प्रश्नांना उत्तर द्यायची वेळ कधीच आली नव्हती.
त्या दिवशीही ती एका इंटरव्ह्यूसाठी आली होती “फाऊंडेशन फॉर अनसीन चिल्ड्रन” नावाच्या एनजीओचा प्रमुख, अभिजीत देशमुख याची मुलाखत घ्यायची होती. मुलाखात घेण्यासाठी तो कॅफे निवडण्यात आला.
ती आत गेली तेव्हा अभिजीत काही मुलांसोबत गाणी गात होता. त्या मुलांच्या डोळ्यांत एक वेगळाच आनंद होता आयुष्याने खूप काही हिसकावून घेतलं होतं, पण त्यांचं हसणं अजून शिल्लक होतं. अभिजीत ही त्या मुलांमध्ये अगदी त्यांचा सारखा मिसळून गेला होता. त्यांच्यासोबत तोही त्याचा आनंद व्यक्त करत होता.
आर्या थोडावेळ त्यांच्याकडे बघत तिकडेच थांबली, आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं.
“आपण आर्या देशमुख ना?” अभिजीतने तिच्या दिशेने येत विचारलं.
“हो, पण देशमुख तुम्ही आणि मी पाटील!” ती हसत म्हणाली.
त्यावर तोही हसला. “अरे हो, सॉरी! इतक्या देशमुखांची ओळख झालीय की आता आठवणं कठीण झालंय.” त्या दोघांमध्ये बराच वेळ बोलणं झालं. आर्याने त्याचा इंटरव्यू ही घेतला. त्याच्या फाउंडेशन बद्दल आणि कामाबद्दल बरीच माहिती मिळवली. त्याच्या कामाची पद्धत आणि त्याबद्दल असलेलं पॅशन तिला मनापासून आवडल होत.
त्या दिवसानंतर त्यांची भेट फक्त कामापुरती राहिली नाही. एनजीओच्या मुलांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी, आणि समाजाबद्दल दोघांचं दृष्टिकोन सारखं होतं.
हळूहळू संवाद वाढत गेला.
“तुला माहीत आहे का, आर्या… मी या मुलांकडे जेव्हा बघतो ना तेव्हा मला पण माझे बालपण आठवते... मी खूप लहान असतानाच माझ्या आई वडिलांना गमावले पण तरीही या जगात जगायला शिकलो. " अभिजीत एकदा सहज तिला आपल्या लहानपणीची माहिती सांगितली.
त्या क्षणी आर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत खोल वेदना होती, पण त्या वेदनेला पवित्रतेचा आकार मिळाला होता. त्याच्या मनातल्या भावना त्याच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होत्या.
त्याच्या त्या मनातल्या पवित्रतेवर आर्या चा जीव जडला. त्यांचं बोलणं हळूहळू वाढत गेलं, एकमेकांना भेटल्याशिवाय एकमेकांसोबत बोलल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नव्हता, दोघांनाही एकमेकांना भेटण्याची ओढ लागलेली असायची. त्यांचं नातं एका अशा वळणावर होतं जे सत्य आहे शब्दात बांधणं कठीण होतं. ते प्रेम होतं की एक आत्मिक जोड हे सध्या त्या दोघांनाही समजत नव्हते.
" आर्या , उद्या एनजीओचा वार्षिक समारंभ आहे. तू येशील का ? " अभिजीतने तिला फोनवर विचारले...
" हो येईल ना... मला सगळ्यांना भेटायला ही आवडेल... " आर्याने लगेच होकार दिला... एनजीओ मध्ये जाऊन सगळ्यांसोबत त्यालाही भेटता येईल म्हणून नकळत पर्यंत तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले.
आर्या आपले काम संपवून संध्याकाळी त्यांच्यामध्ये पोहोचली तेव्हा तिकडचे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होते...
" अगं अशी उभी का आहेस, ये इकडे येऊन बस ना... एनजीओ मधल्या मुलांनी वार्षिक समारंभ निमित्त काही कार्यक्रम ठरवले आहेत. " अभिजीत ने तिला माहिती दिली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा