" अगं अशी उभी का आहेस, ये इकडे येऊन बस ना... एनजीओ मधल्या मुलांनी वार्षिक समारंभ निमित्त काही कार्यक्रम ठरवले आहेत. " अभिजीत ने तिला माहिती दिली...
आता पुढे.
अभिजीत आणि आर्या दोघांसोबत काही एनजीओचे अधिकारीही तिकडे बसले होते. सगळ्या मुलांनी त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. काही मुलांनी नृत्य कलेमध्ये भाग घेतला होता त्यांनी आपले नृत्य सगळ्यांसमोर सादर केले.
काही मुलांनी संगीत कला सादर करण्याची निवड केली होती, त्यांनी सगळ्यांसमोर गायन केले... शेवटी एक छोटी मुलगी मंचावर आली. सहा वर्षाची ती मुलगी हलक्या गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली मंचावर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकी उदासी जाणवत होती.
" माझे नाव आरोही आहे. मी पाच वर्षाची असतानाच माझ्या आईने मला रस्त्यावर सोडले होते पण सरांनी मला इकडे आणले, मला या सगळ्या मुलांसोबत भेटवले, मला या एनजीओच्या रूपात नवीन घर मिळालं. " बोलताना त्या मुलीच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल होती पण डोळ्यातली उदासीनता ही लपत नव्हती.
लहान आरोहीचं बोलणं ऐकून इकडे आर्याचं हृदय कळवळल. आर्या आपल्या जागेवरून एक टक त्या मुलीकडे पाहत होती. अभिजीत ही शांत चेहऱ्याने तिचं बोलणं ऐकत होता. त्या मुलींने स्वतःबद्दल थोडी माहिती सांगितली आणि मंचावरून खाली आली...
" तू खूप गोड आहेस अगदी तुझ्या नावाप्रमाणे... " आर्या लगेच आपल्या जागेवरून उठून त्या मुलीच्या जवळ गेली आणि तिला प्रेमाने आपल्याजवळ घेत म्हणाली. आर्याने आपल्या बॅगमध्ये असलेला एक चॉकलेट काढून तिला दिले.
" धन्यवाद ! तुम्ही पण खूप सुंदर आहात. " आरोहिने हसून तिच्याकडे पाहत उत्तर दिले. आर्याचे लक्ष बाकीच्या मुलांकडेही गेले. तिकडे अजूनही बरीच मुलं होती. आर्याला थोडा वाईट वाटले.
" हे घे... " इतक्यात अभिजीत तिच्याजवळ आला आणि तिच्या हातात एक बॉक्स दिला.
" या बॉक्समध्ये काय आहे ? " आर्याने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत त्याला विचारले.
" बाकीच्या मुलांना चॉकलेट देता आले नाही म्हणून तुला वाईट वाटले ना म्हणून हा बॉक्स मी तुझ्याकडे देत आहे... याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत जे या मुलांसाठी चांगले होते... " अभिजीत ने तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत तिला सांगितले... आर्याने तो बॉक्स उघडून पाहिला आणि त्याच्या आत असलेल्या चॉकलेट्स पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठीच्या मोठी स्माईल आली. तिने आनंदाने अभिजीत कडे पाहिले... अभिजीत ने ही हसून नजरेने तिला होकार दिला.... तशी आर्या तो बॉक्स घेऊन सगळ्या मुलांच्या जवळ गेली आणि सगळ्यांना चॉकलेट देऊ लागली... सगळी मुलं आनंदाने तिच्याकडून चॉकलेट्स घेत होते ते पाहून तिलाही खूप आनंद झाला....
त्या दिवसानंतर आर्या रोज आपले काम पूर्ण करून त्या एनजीओत जायला लागली... तिकडच्या मुलांसोबत आपला वेळ घालवू लागली... आरोही सोबत बोलायला तिच्यासोबत खेळायला आर्याला खूपच आवडत होते... आर्याला पाहून आरोहीलाही खूप आनंद होत होता... दोघींनाही एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटत होता....
एक दिवस आर्या आपले काम संपवून त्यांची मध्ये आली होती आणि आरोही सोबत खेळत होती... अभिजीत ही तिकडेच काही अंतरावर बसून आपले काम करत त्यांच्याकडे पाहत होता...
" आर्या ताई , तुम्ही माझी आई व्हाल का ? तुमच्याकडे पाहिले तर मला असे वाटते की तुम्ही माझी आई आहे... "अचानक आरोही ने तिच्याकडे पाहून तिला विचारले... आर्या मात्र तिच्या प्रश्नाने एकदम शांत झाली... तिचा चेहरा बाहेरून जरी शांत दिसत असला तरी तिच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे वादळ निर्माण झाले होते... ती उत्तर देण्यासाठी शब्द शोधत होती...
" आर्या नात्यांचं हे असंच असतं... कधी कधी काही नाती अशी अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि ती पदरी पडल्यावर आपणच पवित्र होतो... " तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहून अभिजीत म्हणाला...
अभिजीत चा वाक्य तिच्या मनाच्या गाभाऱ्यात जणू कोरलं गेलं... तिने अजूनही आरोही च्या त्या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते परंतु तिचे मन मात्र ते उत्तर शोधण्यासाठी धडपड करत होते... तो दिवस तसाच निघून गेला...
एक दिवस ती आणि अभिजीत कॉफी पित बसले होते...
“अभिजीत, तुला कधी वाटतं का की आपण एकमेकांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आलो?” आर्या सहज त्याच्याकडे पाहून म्हणाली....
“अनपेक्षित भेटीच तर आयुष्याचा अर्थ बदलतात.” त्याने हसून तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले... काही वेळ शांत राहून ती त्याच्या उत्तराचा अर्थ शोधू लागली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा