Login

पदरी पडले आणि पवित्र झाले... भाग ३(अंतिम भाग)

जेव्हा आयुष्य आपल्याला काही देतं तेव्हा ते हसतमुखाने स्वीकारायला हवं.
“अनपेक्षित भेटीच तर आयुष्याचा अर्थ बदलतात.” त्याने हसून तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले... काही वेळ शांत राहून ती त्याच्या उत्तराचा अर्थ शोधू लागली...

आत्ता पुढें,

" आर्या तू आरोही ला एक नवीन जग दिला आहेस.. ती तुझ्या मते स्वतःची आई शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी पण ! तुझ्या उपस्थितीने मलाही माझा रिकामे पण भरल्यासारखे वाटते... " अभिजीत ने शांत चेहऱ्याने तिच्याकडे पाहून तिला सांगितले...

" अभिजीत तुला खरं सांगू का , कधी कधी  माझ्या मनातही विचार येतात.... तू , आरोही आणि मी आपल्या तिघांचे जग. आपली फॅमिली. किती सुंदर स्वप्न असेल ना हे... आपल्या तिघांनाही हे नातं रक्ताने मिळाले नाही पण जे पदरी पडलं तेच आपल्या आयुष्याचं वरदान ठरल्यासारखे वाटत आहे... " बोलताना आर्याचं मन भरून आल... तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले...

" जर तुझी इच्छा असेल तर हे सुंदर स्वप्न आपण सत्यामध्ये बदलू शकतो..." अभिजीत तिच्याकडे पाहून म्हणाला... आर्याला मनातून आनंद झाला तरीही तिने थोडा वेळ घेण्याचे ठरवले... अभिजीतनेही तिच्या निर्णय याचा आदर केला...

दिवस पुढे गेले... एक दिवस ते दोघेही कॉफी पिण्यासाठी एका कॅफेमध्ये भेटलेले असताना अचानक त्यांना एनजीओ मधून फोन आला आणि एनजीओ मध्ये आग लागल्याचे समजले... ते दोघेही पटकन तिथून निघाले आणि काळजीने एनजीओ मध्ये पोहोचले.... एनजीओ मध्ये काळजीचे वातावरण होते सगळेच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये इकडून तिकडे पळत होते...

आर्याची नजर मात्र आरोहीला शोधत होती... आरोही आगी मध्ये अडकली आहे हे समजतात आर्य मात्र जोरात ओरडली ...

" आरोही!!! " मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी आर्या आगीच्या दिशेने धावली... अभिजीतही तिच्या मागे मागे गेला... त्या दोघांनी मिळून आरोहीला त्या आगीतून बाहेर काढलं , पण आर्या मात्र घाबरून बेहोश झाली....

आर्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.... काही वेळात आर्याला शुद्ध आली. तिच्या बाजूलाच अभिजीत आणि आरोही दोघेही बसले होते...

" आई, तू ठीक आहेस ना ? तुला अशा अवस्थेत पाहून मला खूपच भीती वाटली... "तिला आपल्याकडे पाहताना बघून आरोही पटकन तिच्या जवळ गेली आणि तिचा हात प्रेमाने पकडून म्हणाली...
त्या एका शब्दात तिच्या डोळ्यात असलेल्या काळजीमध्ये आर्याचं आयुष्य पूर्ण झालं... तिच्या ओठांवर हलकं स्मित आलं...

" अभिजीत... " आर्याने आपला दुसरा हात अभिजीतच्या समोर पकडला तसा अभिजीत ने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिच्यात थोडा जवळ सरकला...

" मी आयुष्यात खूप काही गमावला आहे पण आज जाणवलं , पदरी पडले आणि पवित्र झाले म्हणजे नेमकं काय असतं... आरोही आणि तू माझा जग आहे... तुमच्या दोघांना गमावण्याची हिंमत आता माझ्या मधे नाही... " आर्या हळव्या स्वरात त्याच्याकडे पाहून म्हणाली...

" आणि तू आमचं जग आहे आर्या.... तुला या अवस्थेत पाहताना आमच्या मनाला किती वेदना झाल्या ते तुला शब्दात सांगता येणार नाही... " अभिजीतही प्रेमाने तिच्याकडे पाहून म्हणाला...

काही महिन्यांनी एनजीओला छान सजवण्यात आले... तिकडेच आर्या आणि अभिजीतचं लग्न झालं....आरोही दोघांच्या मध्ये उभी होती, त्या दोघांचाही हात धरून.....

मित्रमैत्रिणी, पत्रकार, आणि एनजीओतील मुले सगळे आनंदात होते...

समारंभानंतर आर्या मंचावर उभी राहून म्हणाली,

“कधी कधी आयुष्य आपल्याला आपल्या योजना नुसार मिळत नाही, पण जे मिळतं तेच नियतीचं वरदान असतं... माझ्या आयुष्यात प्रेम दुसऱ्या रूपात आलं  एका लहान मुलीच्या रूपात... तिच्यामुळे मला खरं जगणं शिकायला मिळालं. आणि मग त्या पवित्र भावनेने मला अभिजीत मिळाला.... पदरी पडले आणि पवित्र झाले  हे वाक्य मी आता मनापासून समजलं आहे...”

संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं....

त्या रात्री अभिजीतच्या घरी तिघे एकत्र बसले होते... आरोही त्या दोघांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती...

“जीवन खरंच सुंदर आहे, अभिजीत... फक्त त्याला योग्य नजरेने बघायला शिकायला हवं...” आर्या प्रेमाने आरोही च्या केसांवरून हात फिरवत म्हणाली...

“आणि जेव्हा आयुष्य आपल्याला काही देतं, तेव्हा त्याला स्वीकारायला हवं… कारण काही भेटी या ईश्वराचा आशीर्वाद असतात...” अभिजीत ने प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवला...

आर्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, “हो… पदरी पडले आणि पवित्र झाले…”

खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात ती वाक्यं आकाशात विरल पण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली... ही सगळी परमेश्वराची लिहिलं असते... आपल्या आयुष्यात अचानकपणे काही अशी माणसे येतात,  जी अनोळखी असूनही भेटल्यानंतर आपले जग बनून जातात म्हणूनच ईश्वराने आपल्या आयुष्यात जे काही मांडून ठेवले आहे ते हसतमुखाने आपल्या पदरात घ्यावे आणि त्याचे सोनं करावे...