Login

जोडी जमली भाग दुसरा

जोडी जमली भाग दुसरा

स्पर्धा
जोडी जमली. -- भाग दुसरा


मागील भागात सुधाकर सुमतीला घेऊन आत जातात.
अमेयला जाताना दहा उठाबशा काढायची शीक्षा पूर्ण करून आत यायला सांगतात.आता पुढे.
अमेय ने गाडी पार्क केली जरा आजूबाजूला पहिले , आणि पटकन दहा उठाबशा काढल्या .
"हुश्श, झाल्या एकदाच्या. बाबा पण ना त्यांच्यातला शिक्षक कुठे जागा होतो.नशीब दहाच होत्या." तो आत जायला वळतच होता.की. त्याला समोरच्या खिडकीत दोन डोळे दिसले. मगोमाग हळू हसण्याचा आवाज आला . त्याने थोड निरखून बघितल तर पटकन कुणीतरी मागे झाले . तो पुढे जाणार तर अभय चा फोन आला . तसा तो आत आला.

" काका, अमेय कुठे आहे ? अभय ने आधी आत येणाऱ्या सुधाकर ला विचारले.
येतोय मागून.जरा रागव त्याला". म्हणत ते पुढे गेले.
"हो.काका."
"अभ्या,जोरात धावत येऊन अमेय ने त्याला उचलून घेतले
"अरे, उतरव खाली .तो काय काय लहान आहे का".बाजूचे लोक बडबड करत होते.
"माझ्यासाठी तर लहानच आहे."
'एक महिन्यांनी मोठा आहेस अम्या, सोड खाली."
अमेय ने लगेच हात मोकळा केला.आणि आत रूममध्ये पळाला.तसा अभय जमिनीवर पडला.
" थांब.तुला बघतो म्हणत तो पण त्याच्यामागे धावत गेला.
सुमती कधी मोठे होणार काय माहित ". अभयची आई रेवती म्हणाली.
"वहिनी ,कशा आहात."
"छान, आता तू आलीस अजून छान ."
"जा तुम्ही सर्व फ्रेश होऊन या. '
"काही करायचं असेल तर सांगा ."
"वहिनी,तुम्ही त्या मुलीचा फोटो पाठवला होता ती येणार आहे ना नक्की.नाहीतर अमेयला आणून काही फायदा नाही."
हो.ते कालच आलेत. मिताच्या मावशी ची मुलगी आहे.
"बर ,मुलीबद्दल आता थोड सविस्तर सांगा की."
" मोनाली मुलीचं नाव आई,वडील आणि एक मोठी बहीण यांच्याबरोबर एरोलीला राहते. मोनाली आताच सी. ए. ची परीक्षा पास झाली आहे. आई गृहिणी आणि बाबांच किराणा मालाचे दुकान आहे.मोठी बहीण घरात लहान मुलाचे ट्युशन घेते."
"मोठी बहीण तीच लग्न नाही झालं."
"नाही ग.तिच्या लग्नाचं पण बघत आहेत.पण ती जरा मोठी आहे ना तर कुठे जमत नाहिये."
"का. ग.म्हणजे का जमत नाही."
"म्हटल ना. मोठी आहे.सोनाली थोडी जाडी आहे."
"अच्छा."
"अग आता तीच नाही तर हिच तरी."
"पण तुला कस कळलं."
"अग सांगितल ना. मिताच्या मावशीची मुलगी . लग्नाची बैठक होती ना तेव्हा आल्या होत्या. बोलताना विषय निघाला.तर लगेच अमेय साठी विचारून घेतल.तुला आवडल नाही का."
"अग नाही. न आवडल्यासारख काय आहे.तू पण तर त्याची आईच आहेस ."
"थांब.त्या बघ समोर दोघीजणी उभ्या आहेत. चल साखरपुडा व्हायला थोडा वेळ आहे.तोपर्यंत ओळख करून घेवू."
"मीनाताई,अहो, ही माझी छोटी जाऊ. "
रेवती ने सुमती ची दोघीशी ओळख करून दिली .
"तुम्हाला बोलले होते ना.मोनाली साठी माझा दुसरा मुलगा अमेय बद्दल. "
"हो. आलाय का तो". त्या इकडेतिकडे बघू लागल्या.
"हो.आलाय ना.साखरपुडा झाला की बोलूया

अमेय लग्नाला तयार होईल का?


क्रमशः