साहित्य
प्रत्येकी ५०ग्रॅम काजू
तीळ
खसखस
शेंगदाणे
टरबूज बी
खोबरा किस
३चमचे धनेपुड, दीड चमचा जिरेपूड
१००ग्रॅम तेल
मोहरी १चमचा, हिंग, १चमचा हळद, दीड चमचा तिखट, थोडी कस्तुरी मेथी, २चमचे मिरची पेस्ट, १चमचा आले पेस्ट, कोथिंबीर १जुडी, १पाव टोमॅटो, १पाव कांदे, मीठ
कृती
काजू, तीळ,खसखस, शेंगदाणे, टरबूज बी, खोबरे किस सर्व भिजत घाला व चांगले भिजल्यावर पेस्ट तयार करा. तसेच कांदा व टोमॅटोची वेगवेगळी पेस्ट करा. एका मोठ्या भांड्यात तेल घालून चांगले गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी घाला. चांगली तडतडल्यावर कांद्याचा किस घाला व तेल सोडेपर्यंत गुलाबी रंगावर परता. नंतर लसूण, आले, मिरची पेस्ट घालून थोडे परता. काजू खसखस वगैरेची पेस्ट थोडे परतून, हिंग, हळद, तिखट, धनेपुड, जिरेपूड घालून चांगले परतवून थोडी कस्तुरी मेथी घाला व टोमॅटोची पेस्ट घालून थोडी खदखदू द्या. खदखदल्यावर १लिटर पाणी घालून एक उकळी येऊ द्या व चविप्रमाणे मीठ घाला. झाला चमचमीत रस्सा. यावर भरपूर कोथिंबीर पेरा. वरील रस्सा एक किलो भाजीला पुरतो.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा