Login

झेप तिची भाग -1

झेप तिची
" बाई..बाई, अग काय हे, किती वेळा सांगितलं तुला. तुझं हे कमनशिबी तोंड घेऊन येत जाऊ नकोस. आधी माझ्या मुलाला गिळलंस, आणि आता इथे येऊन माझ्या नातवावर तुझी काळी सावली पाडतेस का? त्याला काही झालं ना तर नव्हतीस कुठ तू.."

एवढं बोलून तिच्या सासूने तिला तिच्या लहानपणी जावेच्या खोलीतून हाताला धरून ओढत ओढत बाहेर काढलं, इकडे तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. पण तोंडातून उलटा शब्द बाहेर पडला नाही. पडेल तरी कसा? आता ती त्या घरात एक अश्रित होती ना..


" आई, अहो असुद्या ना? तेवढंच बाळाला बघून त्या त्यांचं दुःख विसरतील. "

तिची लहान जावं म्हणाली.

" हे बघ नीलिमा, तुला त्यातलं काही समजत नाही. तिने आधीच माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलं आहे. स्वतः तर वांझोटी आहेच पण आता माझ्या नातवावर तिची काळी सावली टाकते. "


" अहो आई असं काही नसत हो, अपशकून न अजून काही आजच्या काळात. "

"तुझं हे पाजणारे ज्ञान तू तुझ्याजवळच ठेव, शेवटचं तुला सांगून ठेवते नीलिमा, माझ्या गुड्डूला काही झालं तर तिच्याबरोबर तुलापण घराबाहेर काढेन समजलं. "


एवढं बोलून लीनाची सासू तणतण करत बाहेर पडली. लीना खिडकी जवळ जाऊन रडत होती, पण तिच्या कानावर सगळंच पडत असल्यामुळे डोळ्यातून वाहणारे अश्रू काही थांबत नव्हते. तिला तिथं उभ राहिलेलं पण तिच्या सासूला खटकल.

" बाई आता इथे तुझे अश्रू ढाळत बसू नकोस, तो भांड्याचा ढीग पडलाय तो आवर जा, आणि मग माझे पाय दाबून दे.. "


तसं ती निघून स्वयंपाक घरात गेली, भांडी घासता घासता तिच्या डोळ्यासमोर तिचं आधीच पूर्ण आयुष्यच उभ राहील. किती खुश होती ती आकाश सोबत. पण एका अपघाताने तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

ती स्वयंपाकघरात उभी असते, पण तिचं मन मात्र भूतकाळात गुरफटलेलं होत. आकाशच्या आठवणींनी तिचं मन भरून येतं.


लीना, 28 वर्षांची गृहिणी, आकाश सोबत 5 वर्षांपूर्वी लग्न करून ह्या घरात आली. प्रेमविवाह म्हणून लीनाच्या सासूने तिला कधीच डोळ्यात पाहिलं नाही. त्यांना ती आकाश साठी अजिबात पसंत नव्हती. कारण ती दुसऱ्या जातीची होती. आणि आकाश च्या आईला त्यांच्याच जाती मधली मुलगी सून म्हणून हवी होती. पण आकाश ने काही त्यांचं ऐकलं नाही. खरं तर लीना त्याच्यासोबत एकाच ऑफिस मध्ये काम करत होती.

लीना आणि आकाश एका ऑफिसमध्ये काम करत होते. रोज एकत्र कॉफी प्यायची, नवीन प्रोजेक्टवर काम करायचं, आणि हळूहळू झालेल्या ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.


असं काय झालं असेल लीनाच्या आयुष्यात??
क्रमश

🎭 Series Post

View all