Login

झेप तिची भाग -2

झेप तिची
तिला आठवतं, आकाशने तिला पहिल्यांदा कसं प्रपोज केलं होतं,

लीना, तुझ्याशिवाय मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही. आपण लग्न करूया!"

मस्त सरप्राईझ दिल होत आकाशने तिला, तिला सुद्धा तो आवडत असल्याने तिने त्याला होकार दिला.
लिनाला आकाशवर पूर्ण विश्वास होता. पण आकाशच्या घरच्यांना त्यांचं हे लग्न अजिबात मान्य नव्हतं.

"आमच्या जातीबाहेरची मुलगी आम्हाला नको!" त्याच्या आईने स्पष्ट शब्दांत त्याला सांगितलं होत.

पण आकाशने हट्ट धरला. शेवटी घरच्यांच्या नाराजीमुळेही त्यांनी लग्न केलं.

त्यांचं लग्न, सुरुवातीचे आनंदाचे क्षण सगळं तिला आठवत होत. सुरुवातीचे काही महिने सुंदर होते. लीना आणि आकाश एकमेकांसाठी जगत होते.त्यांच्या लग्नाला जवळ जवळ आता पाच वर्ष होत आले होते पण त्यांच्या संसार वेळीला फुल काय फुलले नव्हते. लीनाला मूल होत नव्हतं.

"ही वांझ आहे! हिच्या मुळे आमचं घर वारसाविना राहील. "

सासूबाईंचे टोमणे सुरू झाले होते. यांचमुळे त्यांनी तिच्या धाकट्या दिराच लग्न त्यांच्याच जातीतल्या मुलीशी लावून दिल. निलिमा आणि लीनाच चांगलं पटायचं, तेही तिच्या सासूला आवडत नव्हतं. वर्षाभरात नीलिमाला एक मुलगा झाला आणि आधीच डोळ्यात खुपणारी लिना आता त्यांना नकोशी झाली होती. ह्यात आकाश मात्र तिला नेहमी आधार द्यायचा.

"आपण डॉक्टरांकडे जाऊया, काही उपाय नक्की मिळेल," तो म्हणायचा, तिला समजवायचा द्यायचा. त्याच्यामुळे तिला घरात राहायला तरी व्हायचं. सासूबाईंनी तिला मला कामे होत नाहीत म्हणून नोकरी सुद्धा करून दिली नाही. बिचारी आज न उद्या मला स्वीकारतील, मला बाळ होईल ह्या आशेवर राहिली पण पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं...


त्यादिवशीही ती आणि आकाश संध्याकाळी बाहेर पडले होते. अचानक समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांची कार धडकली. आकाशने शेवटच्या क्षणी तिला वाचवलं, पण स्वत:चा जीव गमावला. भयंकर अपघात झाला. लीना जिवंत राहिली, पण आकाश तिला सोडून गेला.
आकाशच्या मृत्यूनंतर लीनाचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं.

आकाशच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी तिला उघडपणे दोष द्यायला सुरुवात केली.तिला नवऱ्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं.

"तू अपशकुनी आहेस, तूच माझ्या मुलाला खाल्लंस!" – सासूबाईंचा रोजच उठता बसता आरोप करत असायच्या.

तिच्या अस्तित्वालाही घरात थारा नव्हता आता.तिचं बोलणं, हसणं, अगदी श्वास घेणंसुद्धा लोकांना नकोसं झालं.

"तुला कुणी सांभाळतंय म्हणून इथे आहेस. नाहीतर तुझी जागा रस्त्यावरच होती."

रोज काही बाही तिला ऐकावं लागायचं. आधी आकाशच्या असण्याने तिला बळ यायचं पण आता तर तो सुद्धा नव्हता. नीलिमाच्या बाळाजवळ जावं तर ते सुद्धा सासूबाईंना आवडत नव्हतं.


कोण काढेल तिला ह्यातून बाहेर?
क्रमश

🎭 Series Post

View all