दिवे-मशालींत मावळे रात्र
रात्रपाळी सुरू झाल्या
एडिसनच्या मेंदूने सर्वत्र
हेनरी फोर्ड क्रांती घडवली
गाड्यांच्या फॅक्टरीची कल्पना
सामान्यांच्या आवाक्यात आणलं
राबवून चारचाकी गाडीचं स्वप्ना
जॉर्ज इस्टमनच्या कोडॅक ने आणली
फोटोग्राफीच्या जगात लोकशाही
ब्लॅक व्हाइट नंतर आले डिजिटल
काढू लागलो आपण सेल्फीही
गॅजेटनं कॅल्क्युलेटर, कॅलेंडर, डायरी,
अनेक यंत्रांची जागा घेतली
लँडलाईन सेल्युलर झाला मोबाईल
त्याचीही "डीटॉक्स"बनलित हल्ली
पंचमहाभूतं आपली सारी
सृष्टी सुखरूप चालवत आली
पंचज्ञानेंद्रियांनी ही नेहमी
जाणीव आपणा करून दिली
शोधामुळे तर प्रगती झाली
विज्ञानाची धरता कास
पण आपल्या प्रगतीमुळे
नाही व्हावा निसर्गाचा ऱ्हास
©संध्या(श्री✍️)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा