एक अनोखे मायाजाल भाग 1
" हॅलो, हॅलो आवाज येतोय का सतीश?" सुनंदा जीवाच्या आकांताने ओरडत होती.
पलीकडून फक्त खर्र असा आवाज येत होता. जवळपास पाच मिनिट सुनंदा तो विचित्र आवाज ऐकत होती. अचानक मोठा ओरडल्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला.
सुनंदा खूप घाबरली. सतीश काम आटोपून रात्री निघणार असे म्हणाला तेव्हाच तिने विरोध केला होता. आता फोनही लागत नव्हता. आता वाट बघणे एवढा एकच पर्याय बाकी होता. सुनंदा सरळ देवघरात गेली. तिने मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.
पहाटे पाच वाजता गाडीचा हॉर्न वाजला आणि सुनंदा धावतच बाहेर गेली. सतीश गाडीत नव्हताच. फक्त ड्रायव्हर होता गाडीत. त्याच्याही नजरेत बघूनच सुनंदा सावध झाली. घरातील लाईट लावून ती तशीच बसून राहिली.
ड्रायव्हर गाडीत तसाच बसून होता. त्याची नजर अगदी थंड आणि अनोळखी भाव असणारी होती. सुनंदाने सरळ पोलिसांना फोन केला.
पंधरा मिनिटात पोलीस हजर झाले. इन्स्पेक्टर आकाश आणि त्याची टीम गाडी पार्क करून खाली उतरली. गाडीत ड्रायव्हर तसाच बसून होता. आकाशने इशारा करताच सगळ्यांनी मिळून ड्रायव्हरला पकडले. त्याने पळून जायचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्याचे संपूर्ण अंग बर्फासारखे थंडगार पडलेले होते.
अशा परिस्थितीत अजूनही तो जिवंत होता. त्याची नजर पूर्ण थंड होती. पोलिसांनी ड्रायव्हरला पकडलेले बघून सुनंदा बाहेर आली. तिने पोलिसांना आपणच फोन केल्याचे सांगितले.
" इन्स्पेक्टर माझे मिस्टर सतीश पाटील गाडीत नाहीयेत. मी रात्री त्यांना फोन केल्यानंतर संपर्क तुटला."
असे म्हणून सूनंदाने सगळा प्रकार सांगितला.
रोझी ऑफिसात पोहोचलीच होती आणि फोन आला.
" हॅलो राजेश प्रधानांचे ऑफिस."
रोझीने ठराविक टोनमध्ये उत्तर दिले.
रोझीने ठराविक टोनमध्ये उत्तर दिले.
" इन्स्पेक्टर आकाश बोलतोय. राजेश सरांशी बोलता येईल?" पलीकडून प्रश्न आला.
" अजुन तासभर नाही. तुम्ही मला सांगू शकता काय काम आहे?"
रोझीने शांतपणे उत्तर दिले.
रोझीने शांतपणे उत्तर दिले.
आकाशने तिला सगळी हकीकत सांगितली आणि लवकरात लवकर संपर्क करावा असा निरोप ठेवला.
रोझीने सगळे एकदा नोट डाऊन केले. बरोबर तासाभराने राजेश ऑफिसला पोहोचला.
" सर इन्स्पेक्टर आकाशने फोन केला होता." रोझीने आपण लिहून घेतलेले सगळे राजेशला दाखवले.
" रोझी आपल्याला लगेच निघावे लागेल."
राजेशने पटापट काही वस्तू घेतल्या आणि बरोबर दहाव्या मिनिटाला ते बाहेर पडले.
राजेशने पटापट काही वस्तू घेतल्या आणि बरोबर दहाव्या मिनिटाला ते बाहेर पडले.
हॉस्पिटलमध्ये तो ड्रायव्हर दाखल केल्यावर त्याचे शरीर आपोआप सुकू लागले होते. जणूकाही कोणीतरी त्याचा जीव शोषून घेत होते. समोर एकटक बघून तो तसाच पडून होता. इंजेक्शन किंवा कोणतीच सुई टोचणे अशक्य होते. कारण शरीरात नसा दिसतच नव्हत्या.
" इन्स्पेक्टर असा प्रकार यापूर्वी मी कधीही पहिला नाहीय." डॉक्टर गोंधळले होते.
" डॉक्टर तो जगेल ना?" इन्स्पेक्टर आकाश आता चिंतेत पडले.
तेवढ्यात राजेश प्रधान आत आले.
" डॉक्टर मी राजेश प्रधान." त्यांनी ओळख करून दिली.
" डॉक्टर मीच बोलावले आहे त्यांना. प्लीज त्यांना त्यांचे काम करू द्या."
आकाशने विनंती केली.
आकाशने विनंती केली.
डॉक्टरांनी होकार दिला.
"सर्वांनी खोलीतून बाहेर जा." राजेशने सांगितले.
आता खोलीत फक्त तो ड्रायव्हर,राजेश आणि रोझी होते.
राजेशने शांतपणे आपला अंगठा त्याच्या कपाळावर मधोमध ठेवला आणि डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसे थंडगार पडलेले त्याचे शरीर आकसले जाऊ लागले.
" सोड मला,सोड मला." तो जोरजोरात ओरडत होता.
त्याचवेळी रोझीने सभोवती रिंगण आखले होते. मंत्र पूर्ण होताच ओम चिन्ह त्याच्या कपाळावर उमटले आणि राजेश त्याच्यापासून दूर झाला.
" हे शरीर तुझे नाहीय. त्याला मुक्त कर." राजेशने आज्ञा दिली.
" मुक्ती? कोणाला? ह्याला सोबत घेऊनच जाणार होतो पण हा वाचला." एक क्रूर आवाज आला.
" असे कोणालाही सोबत घेऊन जाऊ शकत नाहीस तू." राजेश परत शांतपणे म्हणाला.
" कोण थांबवणार मला? आजवर अनेक शक्ती पंथातले लोक आले आणि गेले." खर्जातला आवाज आला.
राजेशने डोळे मिटले. रुद्राक्ष माळ काढली आणि शिव तांडव स्तोत्र जपले. माळ सिद्ध होताच राजेशने ती त्याच्या गळ्यात टाकली आणि अचानक त्याच्या थंड शरीरात उष्णता निर्माण होऊ लागली. त्याचवेळी त्याने राजेशच्या हाताला घट्ट पकडले होते.
रोझी सावध होतीच तिने पवित्र जल शिंपडले आणि थोड्याच वेळात तो ड्रायव्हर शुध्दीवर आला आणि खाली कोसळला. राजेशच्या मनगटावर मात्र एक चिन्ह उमटलेले राजेशला भासले. परंतु पुन्हा पाहताच चिन्ह गायब झाले होते.
" रात्री कुठे थांबला होता तुम्ही?" राजेशने पहिलाच प्रश्न विचारला.
" सतीश साहेब! साहेबांना ते घेऊन गेले. त्यांना वाचवा." ड्रायव्हर मोठ्याने रडू लागला.
"तूझ्या मालकांना वाचवायचे असेल तर आपल्याला त्या जागेवर पुन्हा जावे लागेल."
राजेशने उत्तर दिले.
राजेशने उत्तर दिले.
ड्रायव्हरने होकारार्थी मान हलवली. राजेश बाहेर आला. त्याने सगळे ठीक असल्याचे सांगितले आणि.घराकडे वेगाने निघाला. सतीश अजूनही जिवंत असण्याची शक्यता होती. पुढील हालचाली लगेच करणे आवश्यक होते.
सतीश कुठे असेल?
राजेश त्याला वाचवू शकेल?
वाचत रहा.
चकवा.
©®प्रशांत कुंजीर.
राजेश त्याला वाचवू शकेल?
वाचत रहा.
चकवा.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा