Login

ती परकी कुठे भाग 4

ती परकी
परकी कुठे

भाग 4

नवरा आहोत तर आपण होणाऱ्या बायकोला हवे ते तिच्या आवडीचे घेऊन देणे लागते हे तो विसरला ,आणि उलट तिच्या साठी हवे ते खरेदी करून देणाऱ्या वडिलांना त्याच्या आईने जे खरेदी करून आणायची मागणी केली ते मागत सुटला..

किती लाज वाटण्या सारखे वागणे होते नवरा म्हणून ह्या माणसाचे ??
-------

इकडे प्रिया आणि तिची आई बघतच राहिल्या ,खरंच हे नाते करून आपण फसलो तर नाही ना ?? आताच वेळीच माघार घ्यावी असे वाटत आहे..त्याचा ही स्वभाव आता हळूहळू कळत होता...त्याच्या आईचे ही वरचेवर काही ना काही मागण्यासाठी फोन येत होते..वरमाय यांना साड्या घ्या ,ताट घ्या...अमके घ्या ,तमके घ्या...आम्हाला असे लागणार ,तसे लागणार..नाहीतर गावातील लोक आम्हाला नावे ठेवणार...तुमच्या मुलीला इथे नांदायचे आहे..बघा नाते खराब नाही होणार पहा..."

सासूने आपला नेहमीच हुशार गुण दाखवला आणि सामान गावी वळते केले..

"मी काय म्हणतो प्रिया अग घर ते ही आपलेच आहे..तर राहूदे सामान तिकडे.."

"आज कात्रीत सापडले ,उद्या तू कात्रीत सापडशील हे नक्की...तुला आधीच सांगितले होते मी की सामान मुंबईला येईल गावी नाही.."

प्रिया रागात होती हे नवऱ्याला जाणवले होते ,पण आई जास्त रागात येऊ शकते त्यामुळे त्याने आपल्या फायदा घेणाऱ्या आईची बाजू सावरली


"आता होऊ नये पण झाले आहे शांत हो.."

प्रियाचे वडील प्रियाच्या आईला म्हणाले ,आणि त्यांना विधी वत वाटे लावण्यासाठी दोघे जड मनाने तयार झाले..आईला वाटत होते स्थळ स्वार्थी लाभले आहे..

"प्रिया छोट्या गोष्टी मनावर घेऊ नकोस ,सासर आहे ते..सासूबाई आई सारख्या आहेत..तर त्यांना दुखावले असे काहीच करू नकोस..हे समान क्षुल्लक आहे..मी परत घेऊन देईल.."

"प्रिया बाबा म्हणतात ते दरवेळी ऐकून घ्यावे असे नाही..ठीक आहे आज ते वाद नकोत पण तुम्ही मुंबईला आलात की बोलू.."

आता प्रियाला नाही म्हंटले तरी ह्याचा सोक्षमोक्ष लावायला भरीस पाडले होते..बघू पुढे काय होईल ते प्रियाने खरंच पाऊल पुढे उचलावे की मागे ठेवून जे होईल ते पहावे..द्यावे ते सामान सासूच्या ताब्यात आणि पुन्हा वडील म्हणाले तसे दुसरे सामान घ्यावे ??

लेकीने धाकात राहावे हे पटत नाही पण वेळीच बोलावे हे ही योग्य वाटत नाही ,पण काय करावे प्रियाने