चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
लघुकथा फेरी
तीच होती का ती?
रात्रीचा एक वाजला होता. मी माझ्या नाटकाचा प्रयोग संपवून साखळीहून फोंड्याच्या दिशेने चाललो होतो. तोच वाटेवर माझी गाडी अचानक बंद पडली. मी गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काही यश आले नाही.
मी माझ्या मित्राला फोन लावला. जो माझ्याच नाटकात काम करत होता.
"कुठे आहेस?"
"अजूनही थिएटरमध्येच आहे. तू पोहोचलास का घरी?"
"नाही रे. मध्येच अचानक गाडी बंद पडली आहे. आजूबाजूला कोणी दिसत पण नाही."
"नक्की कुठे बंद पडली आहे?"
"माहीत नाही आणि आता इथे यावेळी कोणी मॅकॅनिक मिळणार असे वाटत नाही. लवकर ये. मला वाटते गाडी इथेच ठेवून तुझ्याबरोबर यावे लागणार."
"ओके. तिथेच थांब. अर्ध्या तासात पोहोचतो." असे म्हणत त्याने फोन ठेवला.
"अजूनही थिएटरमध्येच आहे. तू पोहोचलास का घरी?"
"नाही रे. मध्येच अचानक गाडी बंद पडली आहे. आजूबाजूला कोणी दिसत पण नाही."
"नक्की कुठे बंद पडली आहे?"
"माहीत नाही आणि आता इथे यावेळी कोणी मॅकॅनिक मिळणार असे वाटत नाही. लवकर ये. मला वाटते गाडी इथेच ठेवून तुझ्याबरोबर यावे लागणार."
"ओके. तिथेच थांब. अर्ध्या तासात पोहोचतो." असे म्हणत त्याने फोन ठेवला.
मी पण गाडीच्या बाहेर थांबून माझ्या मित्राची वाट पाहू लागलो. दिवसा गजबजलेला हा रस्ता रात्रीच्या वेळी सुमसान वाटत होता.
मी माझ्या खिशातून एक सिगारेट काढली आणि पेटवली. तेव्हाच माझ्यापासून फक्त शंभर-दीडशे मीटर अंतरावर मला एक गाडी थांबलेली दिसली. त्यातून एक साधारण चाळीशीतली बाई उतरली.
ती उतरता क्षणीच गाडी यू-टर्न मारून निघून गेली. ती बाई माझ्या दिशेने येऊ लागली. ती माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. मध्येच हसली.
"साहेब, चालणार काय?" तिने एक डोळा मिचकावत विचारले. तिच्या विचारण्याच्या अंदाजावरून मला समजले की ती कोण आहे.
मी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
"काय झाले साहेब? अशी नजर का चोरत आहात?" तिने मादक आवाजात पुन्हा विचारले.
"हे बघा, मला तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाही." मी माझी सिगारेट रस्त्यावर टाकत पायाने विझवत म्हटले.
"मग इथे का थांबला आहात? म्हणजे ही जागा आमची आहे साहेब. इथे लोक आम्हालाच भेटण्यासाठी थांबतात."
"हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. माझी गाडी बंद पडली आहे, म्हणून मी इथे थांबलो आहे."
"मग विड्या काय फुंकत बसला आहात? मॅकॅनिकला बोलवा. मॅकॅनिक पाहिजे का? नाही म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्या तऱ्हेचे लोक आहेत."
"त्याची काही गरज नाही. माझा मित्र येत आहे."
"अस्सं होय. तुम्ही कुठे राहता?"
मी तिला काहीच उत्तर न देता तोंड फिरवले.
"काय साहेब? तुम्ही असे तिरस्कार केल्यासारखे काय वागत आहात? रात्र गडद आहे. तुम्ही पण एकटे आहात आणि मी पण. तुमची गाडी पण बंद पडली आहे, तुम्ही म्हणता तसे तुमचा मित्र येणार आहे, तोपर्यंत खूप वेळ आहे. तुमच्या गाडीत जागा पण आहे. मग विचार कसला करता?"
"हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" मी जरा संतापूनच म्हटले.
"पैसे नाहीत काय तुमच्याकडे? बरं, काही हरकत नाही, पण टाईमपास म्हणून बोलू तरी शकता तुम्ही माझ्याकडे. त्याचे पैसे नाही घेणार मी." ती हसली.
"मला तुमच्या असल्या स्त्रियांशी बोलावेसे पण वाटत नाही."
"तुमच्या असल्या म्हणजे काय साहेब? तुम्हाला म्हणायचे तरी काय आहे?"
"अरे बापरे! अब्रूनुकसानीचा दावा वगैरे करणार की काय माझ्यावर? सौ चुहे खाकर बिल्ली चली हज."
तिला माझे बोलणे समजले होते.
"साहेब, आम्ही पण माणसे आहोत. जर प्रेमाने दोन गोष्टी बोलल्या तर तोंड झिजणार नाही."
"रस्त्यावरचे किडे आहात तुम्ही. समाजाला लागलेली एक कीड. स्वतःची वासना शमविण्यासाठी किती संसार उध्वस्त करतात तुम्ही लोकं."
"वासना शमविण्यासाठी? काय बोलत आहात साहेब तुम्ही? आम्ही हे शरीर सुखासाठी किंवा वासना शमविण्यासाठी नाही विकत. आमची मजबुरी आहे."
"काय तर म्हणे मजबुरी आहे. जगात बाकीची सगळी कामे संपलीत की काय?"
"आता या उतार वयात कोण देणार काम साहेब? एक तर आमच्याकडे शिक्षण नाही. आता काम मिळालेच तर मोलमजुरीचे किंवा धुणीभांडी घासण्याचेच मिळणार."
"मग काय वाईट आहे त्यात? इज्जतीचे काम आहे. दोन पैसे कमी मिळणार, पण पोट भरण्यासाठी तेवढेसे पुरेसे आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या पुढे मागे आहे तरी कोण? ना घर ना संसार."
"काय म्हणता तुम्ही साहेब? माझ्या पुढे मागे आहे तरी कोण? अहो माझी पोर आहे. बारावीला मुलगी आहे माझी."
"मुलगी? नक्कीच कुणाचे तरी पाप असणार."
"तोंड सांभाळून बोला साहेब. पाप काय म्हणता? माझ्या पोटचा गोळा आहे तो."
"तुमच्या मुलीला तिच्या वडिलांचे नाव तरी माहीत आहे काय? नाही ना? कसे असणार? एका रात्री तुम्ही दहा जणांबरोबर..." मी बोलता बोलता थांबलो.
माझ्या या प्रश्नावर ती गप्पच राहिली. तिच्या त्या गप्प राहण्यामुळे मला माझे उत्तर मिळाले.
"साहेब, मी हे सगळे माझ्या मुलीसाठीच करते. तिला मला चांगले शिकवायचे आहे. चांगली चांगली कपडे द्यायची आहेत. ती माझ्यासारखा असा धंदा नाही करणार साहेब. डॉक्टर बनवीन मी तिला. म्हणून खूप पैसा कमावते."
"आणि तिला माहित आहे का हे सगळे?"
"नाही साहेब, तिला मी कसे सांगणार? ती समजते मी कुठेतरी रात्रीच्या कामाला जाते. शिक्षणाला पैसा खूप लागतो साहेब. चांगले शिक्षण मिळवायला श्रीमंताच्या घरातच जन्म घ्यावा लागतो. शाळा, कॉलेजना डोनेशन द्यावे लागते, ते पण लाख लाखभर. कसे होणार हे सगळे? म्हणून करावे लागते. शरीराची विक्री करून गाठीला चांगले पैसे येतात. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कमवायचे." असे म्हणत तिने आपले डोळे पुसले.
"आणि मुलीला कळले तर..."
"तिला कळले तर, तोंड नाही दाखवू शकणार मी. जीव देणार."
तेवढ्यात माझा मित्र येत असलेला मला दिसला.
"कशाला पुढे पुढे गेला होतास? सांगितले होते, रात्रीची वेळ आहे, एकटा जाऊ नकोस. शेवटी झालाच ना उशीर?" असे म्हणत तो आपल्या बाईकवरुन उतरला आणि माझ्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर येऊन बसला.
त्याने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात गाडी सहज स्टार्ट झाली.
"हे काय? गाडी तर उत्तम आहे. निदान प्रयत्न तरी करून बघायचा ना?"
"अरे मी केला होता..."
"चल बस गाडीत. ही जागा ठीक नाही. इथे एका वेश्येने आत्महत्या केली होती."
त्याने तसे म्हणताच मी आजूबाजूला पाहिले. मला ती कुठेच दिसली नाही. मला दरदरुन घाम फुटला. मी जरा घाबरूनच गाडीत बसलो. मनात एकच प्रश्न आला
‘तीच होती का ती?’
‘तीच होती का ती?’
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा