आम्हाला मुलं नाहीत !!
सगळीकडे शोधून शोधून दमलेल्या लेकीला आई बाबा कुठे ही सापडले नव्हते..आता तर तिची पळता भुई थोडी झाली होती.. जीव जातो की काय असे तिला वाटत होते..त्यांची जबाबदारी घेऊ म्हणून तिने त्यांना आपल्या घरी बोलावले होते..
नको नको अग ताई तू तरी का आमची नसती जबाबदारी घेतेस..आम्ही आहे तसे ठीक आहोत..एकमेकांना सोबत करत आहोत..त्याने सोडले नाही आम्हाला पण आमच्या गरजा बघता आम्हाला आमचे हे छोटेसे घर बरे आनंदी आणि सुखदायी वाटते..नको आम्ही नाही येणार तुझ्या घरी..काय होते माहीत नाही, सून काही बोलत नाही ,मुलगा ही बोलत नाही..त्यांना आम्ही जड नाहीत पण का कोणास ठाऊक भिंतीतून आवाज येतात सारखे वाद होत असल्याचे हिला...ती म्हणते इथे ह्या आवाजाची तिला भीती वाटते..ते आवाज आपल्याला काही झोपू द्यायचे नाहीत ,सुखाने दोन घास खाऊ द्यायचे नाहीत..सन्मानाने म्हतारपणी लेकाच्या सुनेच्या राज्यात राहू द्यायचे नाहीत...
बाबा अहो हे तुमचे भ्रम असतील ,असे कोण का वाद घालत असतील..दादा वहिनी तर किती जीव लावतात तुम्हाला.. तुम्ही तर आदर्श आहात त्यांचे...मग ते असे का तुमच्यामुळे भांडण करतील..म्हणून म्हणते जरा मन प्रेश होईल या माझ्या घरी..मी तुमची लेक आहे मी सेवा करते ,चांगले खाऊ पियू घालते..तुमचे दिवस मजेत जातील..ह्यांना ही तुम्ही आल्यावर बरे वाटेल..हे म्हणत होते बोलव त्यांना..त्यांना ही तुम्ही घरात असल्यावर घर भरल्या सारखे वाटते..
लेकीने आग्रह केल्यावर आई वडील लेकीकडे आले ,काही दिवस मस्त राहिले..जावई भला होता ,लेक सेवा करत होती..आणि एक दिवस जावयाला लेकाचा फोन येतो ,तो आपल्या आई वडिलांना तुम्ही परस्पर कसे घेऊन जाऊ शकतात ह्यावरून लेक जावयाला बोलला..त्यात तिकडून सून लगेच म्हणाली..आता प्रॉपर्टी हवी असेल म्हणून ऐन मोक्याच्या वेळी लेक आणि जावई म्हतारा म्हतारीला घेऊन गेले असतील..बघा किती ही हुशारी..
हे ऐकून जावई चिडले ,त्यांनी लगेच बायकोला सांगितले ,आता तुझे आई बाबा आपल्या कडे रहाणार नाहीत..त्यांना इथे ठेवायचे नाहीत...दोघात वाद झाले आणि ते वाद आईला ऐकू गेले ,बाबांना ऐकू येत नव्हते म्हणून त्यांना बाहेर काय चालू आहे माहीत नव्हते...
इकडे आईला कळले की आपल्या लेकाने जावयाचा हेतू वर शंका घेऊन त्यांचा अपमान केला आणि म्हणून लेकी मध्ये आणि जावया मध्ये वाद सुरू झाले ,तेव्हा तिने ठरवले लेकाला सोडून जाऊ शकतो तर लेकीच्या सुखासाठी तिला ही सोडून जाऊ शकतो..दोघे हळूच निघून गेले ,कुठे गेले कोणाला ही कळले नाही..
आता लेक आणि जावई दोघांना शोधत होते..तिला आठवले आई किती काळजी करायची ,तिचा जिवाच्या पर्वा न करता मला अनवाणी पायाने शोधत फिरायची मग आता मी का शांत बसू ,मी घरी परत का फिरू..मी त्यांना शोधल्या शिवाय माघार घेणार नाही...
तिची जिद्द बघून नवरा ही हार मानणारा नव्हता ,त्याने सगळी कडे शोधले आणि कुठे त्यांना आई बाबा एका ठिकाणी बसलेले दिसले...जावयाने लगेच बायकोला फोन लावला आणि तिच्या जीवात जीव आला..ती पळत सुटली.. आणि आईच्या भेटीसाठी सैरभैर झालेली ती आई बाबाला बघून स्थिरावली...
तिने त्यांना पहातच मिठी मारली ,डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते..आई बाबा सांगत होते ,तुझ्या सुखासाठी आम्ही घर सोडायचे ठरवले होते ,तुझ्या सुखी संसाराला आमच्या सेवेचे गालबोट लागायला नको म्हणून रस्ता दिसेल तसे जाणार होतो पण हे म्हणाले ती सगळे जग शोधत बसेन..आपण जास्त लांब नको जायला..तिला आपण सापडलो नाही तर जीवाचे काही करून घेईल..तिच्या मुळे जावई त्यांना त्रास होईल..त्यांना आपला मुलगा आणि सून जाब विचारतील..त्यांना आपण हरवलो म्हणून दोष देतील... आधी मुलाला हवी ती प्रॉपर्टी देऊ मग निवांत कुठे ही निघून जाऊ..
हे म्हणताच जावई म्हणाले ,मला तुमचे काही ही नकोय पण ही प्रॉपर्टी त्यांना देऊन तुम्ही कुठे ही जायचे नाही ,मग मला कोणाच्या ही बोलण्याची भीती नाही..माझ्या वाट्याला फक्त तुमची निस्सीम सेवा लाभू द्या...आणि आमच्या सोबत कायम रहा...आम्हाला मुलं नाही म्हणून मी ठरवले आहे आम्ही तुमची आमच्या मुला प्रमाणे सेवा करू..बाकी काही नकोय...आम्हाला मुल नाही याची खंत आहे ,पण तुम्ही आहात ना ज्यांनी माझ्या बायकोला मुली सारखे सांभाळले ,अजून काय हवे आहे..आता तिला ह्याची परत फेड करणे तर शक्य नाही पण निदान तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिले ह्याचे मरतांना दुःख तर होणार नाही..तिच्या आणि माझ्या वतीने तुम्ही आमच्या घरी पुढचे आयुष्य जगावे..
तितक्यात बाबा म्हणाले ,आम्हाला मुल असून ही काय फायदा आहे ,त्यापेक्षा मुल नसते तर बरे झाले असते असे वाटत आहे...मला ही लेक लाभली ,देवाने दिली माझ्या पदरात हे माझे भाग्यच म्हणतो ,माझ्या मित्राने तिला माझ्या कडे सोपली ,म्हणून नेहमी त्याचे उपकार मानतो..तिची काळजी घेतली त्यापेक्षा जास्त काळजी ती घेते..परमेश्वराने माझी सोय करायची ठरवली होती म्हणून ती मला लेक म्हणून सोपवून गेला तो मित्र..
मुलगी लगेच म्हणते ,तुम्ही नसतात तर मी नसते..
नवरा म्हणाला ,आणि ही माझ्या आयुष्यात नसती तर कदाचित मी ही एक मोठा माणूस म्हणून घडलो नसतो ,एखादया अनाथ आश्रमात खितपत पडलो असतो..आज हे पांग फेडायची संधी तिनेच मला दिली आहे..तिच्या ह्या देव रुपी आई वडिलांची सेवा करून हे पांग फेडणार आहे ,त्यात अजून एक गोष्ट करायची आहे..मनात तुमचे हे नाते बघून वाटते रक्ताचे मुल नसले तरी चालेल पण एक मुलगी आम्हाला ही हवी आहे..
आता आई बाबांना काळजी नव्हती ,ते आनंदाने मुलीच्या घरी जायला तयार झाले होते...
©®अनुराधा आंधळे पालवे
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा